Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jallakshmi Irrigation Scheme: जललक्ष्मी सिंचन योजनेची गळती यंदा तरी थांबणार का? पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे वाईत पाणी वाया!

Jallakshmi Irrigation Scheme: पश्चिम भागात तुलनेने मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने यापूर्वी या गळतीकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. मात्र बदलते पर्जन्यमान आणि गतवर्षी निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती पाहता आता पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा ठरत आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 05, 2026 | 01:50 PM
Satara, Jallakshmi Scheme, Swapnil Gaikwad, Irrigation Department

Satara, Jallakshmi Scheme, Swapnil Gaikwad, Irrigation Department

Follow Us
Follow Us:
  • वाई तालुक्यातील ‘जललक्ष्मी सिंचन योजने’ची पाईपलाईन गळती व नादुरुस्त व्हॉल्व्हचा प्रश्न गंभीर
  • स्वप्निल गायकवाड यांच्याकडून पाटबंधारे विभागाच्या कारभारावर आणि दुर्लक्षावर तीव्र ताशेरे
  • व्याहळी, कुसगाव, एकसर आणि पसरणी परिसरातील शेतकरी सिंचनापासून वंचित
Jallakshmi Irrigation Scheme: वाईच्या पश्चिम भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जललक्ष्मी सिंचन योजनेची अनेक वर्षांपासून सुरू असलेली गळती यंदा तरी थांबणार का, असा सवाल स्वप्निल गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. योजनेच्या पाइपलाइनला ठिकठिकाणी लागलेली गळती, नादुरुस्त व्हॉल्व्ह आणि वेळेवर न होणारी दुरुस्ती यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात असून, पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षाचा फटका पश्चिम भागातील शेतकऱ्यांना बसत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

जललक्ष्मी  जलसिंचन योजना (Jallakshmi Irrigation Scheme) ही व्याहळी, कुसगाव, एकसर आणि पसरणी परिसरातील शेतीसाठी महत्त्वाची मानली जाते. या भागात मोठ्या प्रमाणावर शेती असून, योजनेचे पाणी मिळाल्याने थेट सिंचनाबरोबरच विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यासही मदत होते. त्यामुळे या योजनेचे योग्य व्यवस्थापन आणि उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर होणे आवश्यक आहे.

CJP Leaders Claim Arrest Plan: अभिजीत, आशुतोष, सौरवसह CJP नेत्यांना अटक करण्याचे प्लॅनिंग; बड्या नेत्याचा

योजनेच्या पाइपलाइनला विविध ठिकाणी गळती

मात्र अनेक वर्षांपासून योजनेच्या पाइपलाइनला विविध ठिकाणी गळती लागलेली आहे. काही ठिकाणी व्हॉल्व्ह नादुरुस्त असून त्यांची वेळेत देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. परिणामी योजनेचा शंभर टक्के लाभ संबंधित गावांतील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे.

दुष्काळसदृश परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा

पश्चिम भागात तुलनेने मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने यापूर्वी या गळतीकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. मात्र बदलते पर्जन्यमान आणि गतवर्षी निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती पाहता आता पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा ठरत आहे. अशा परिस्थितीत सिंचनासाठी उपलब्ध असलेले पाणी केवळ व्यवस्थापनातील त्रुटी आणि दुरुस्तीच्या अभावामुळे वाया जाणे परवडणारे नाही.

विशेषतः व्याहळी, कुसगाव, एकसर आणि पसरणी या गावांपर्यंत योजनेचे पाणी पूर्ण क्षमतेने पोहोचणे गरजेचे आहे. गळती तातडीने रोखून पाइपलाइन आणि व्हॉल्व्हची आवश्यक दुरुस्ती केल्यास शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा आधार मिळू शकतो. तसेच विहिरींच्या पाणीपातळीवरही त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Nagpur Graduate Election: महायुतीत विधानपरिषद उमेदवारीवरून अंतर्गत वादाची ठिणगी;देवेंद्र फडणवीसांचा इशारा

वेळेत दुरुस्ती झाली नाही आणि पाण्याची नासाडी

जललक्ष्मी योजनेतील त्रुटींबाबत वारंवार प्रश्न उपस्थित होऊनही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. यंदाही वेळेत दुरुस्ती झाली नाही आणि पाण्याची नासाडी अशीच सुरू राहिली, तर कृष्णेच्या कुशीत असलेल्या वाईच्या पश्चिम भागालाही भविष्यात पाणीटंचाईच्या गंभीर संकटाला सामोरे जावे लागू शकते, असा इशारा गायकवाड यांनी दिला आहे.

याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून जललक्ष्मी सिंचन योजनेची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येणार आहे. तसेच योजनेच्या देखभाल-दुरुस्तीमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून योग्य ती कारवाई करण्यासाठीही पाठपुरावा करणार असल्याचे स्वप्निल गायकवाड यांनी सांगितले.

 

 

 

Web Title: Satara jallakshmi irrigation scheme water leakage issue swapnil gaikwad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • Satara

संबंधित बातम्या

Wai Mahaganpati Ghat: महागणपती घाटावर पार्किंगचा ‘खासगी’ कारभार; वाहनांच्या रांगा, पालिकेकडे अधिकृत व्यवस्थेची मागणी
1

Wai Mahaganpati Ghat: महागणपती घाटावर पार्किंगचा ‘खासगी’ कारभार; वाहनांच्या रांगा, पालिकेकडे अधिकृत व्यवस्थेची मागणी

Satara Crime: पोलीस दलाला मोठा धक्का! साताऱ्यातील कॉन्स्टेबलने उचललं टोकाचं पाऊल
2

Satara Crime: पोलीस दलाला मोठा धक्का! साताऱ्यातील कॉन्स्टेबलने उचललं टोकाचं पाऊल

साताऱ्यात शालेय कुस्तीचा थरार सुरू; ३५० मल्लांचा आखाडा रंगणार, शिवेंद्रसिंहराजेंकडून मल्लांना प्रोत्साहन
3

साताऱ्यात शालेय कुस्तीचा थरार सुरू; ३५० मल्लांचा आखाडा रंगणार, शिवेंद्रसिंहराजेंकडून मल्लांना प्रोत्साहन

Pune Teachers Voter List : मतदारयादीत ‘बॉम्बस्फोट’! मतदाराच्या नावाचा ‘बॉम्बस्फोट’ म्हणून उल्लेख, मतदार यादी पाहून सगळेच हैराण
4

Pune Teachers Voter List : मतदारयादीत ‘बॉम्बस्फोट’! मतदाराच्या नावाचा ‘बॉम्बस्फोट’ म्हणून उल्लेख, मतदार यादी पाहून सगळेच हैराण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.