
Eknath Shinde's reaction to Shaina N. C. tearing Balasaheb Thackeray's photo
Eknath Shinde on Shaina NC Balasaheb Thackeray Photo : शिंदे सेनेच्या महिला नेत्या शायना एन. सी. यांच्याकडून अनावधानाने त्यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला गेला. याचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने राजकारण तापले. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच ठाकरे गटातील नेत्यांना सुनावले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो चुकून फाडल्याने ठाकरे गटातील नेत्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून शायना एन. सी. यांच्यावर टीका केली जात आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला गेला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करूच शकत नाही, म्हणत ठाकरेंच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे म्हणाले, “बाळासाहेब हे आमचं दैवत आहेत. बाळासाहेबांचा अपमान कोणीही शिवसैनिक करु शकत नाही, करणारही नाही. त्याबाबतीत शायना एनसी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. बाळासाहेब हे मणिशंकर अय्यर यांना चप्पल मारतानाचा तो फोटो आहे. तो मी बघितला आहे. तो फोटो जो फाटला, त्यातं मणिशंकर अय्यरचं तोंड फाटलंय, त्यामुळे बाळासाहेंबांचा अपमान झाला नाही.”
शिवसेना अन् काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी? सोनिया गांधींच्या पुस्तकाऐवजी फाडला बाळासाहेब ठाकरेंचाच फोटो
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले, “त्यांना लोकांनी नाकारलेलं असल्यामुळे खोटे आरोप करुन बदनाम करण्याचे काम करत आहेत. पब्लिक है सब जानती हैं. फोटोवरुन राजकारण सुरु आहे. लोकांनी त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. उगाच राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करा. बाळासाहेब हे आमचं दैवत असून त्यांचा अवमान अशक्य आहे.”
शिवसेनेची मागणी काय?
सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव’ या आत्मचरित्रातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान होत असल्याचा दावा करत शिंदे सेनेने आक्रमक भूमिका घेतली. पत्रकार परिषद घेत त्यांनी तीव्र शब्दांत विरोध दर्शवला आहे. हा अपमान उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का? असा प्रश्न शिंदे गटाच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे. तसेच शिंदेसेनेच्या नेत्यांनी पुस्तकाच्या प्रती फाडल्या. यावेळी शायना एन. सी. यांनी पुस्तकाचे पान समजून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला.
Ans: सोनिया गांधी यांच्या पुस्तकाच्या प्रती फाडताना शायना एन. सी. यांनी अनावधानाने बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याचा व्हिडीओ समोर आल्याने वाद निर्माण झाला.
Ans: बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांचे दैवत असून त्यांचा अपमान कोणीही करू शकत नाही, असे शिंदे यांनी सांगितले. संबंधित फोटोमध्ये बाळासाहेबांचा नव्हे, तर मणिशंकर अय्यर यांचा चेहरा फाटल्याचा दावा त्यांनी केला.
Ans: या पुस्तकातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान होत असल्याचा दावा करत शिंदेसेनेने पुस्तकाला विरोध केला असून, त्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.