Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sharad Pawar : ‘आपण कुठेही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या’; शरद पवारांचा NDA चर्चेला पूर्णविराम

Sharad Pawar : NDAसोबत जाणार असल्याच्या चर्चांवर शरद पवारांनी अखेर स्पष्ट भूमिका मांडली आहे. ‘आपण कुठेही जाणार नाही, आम्ही कुणासोबत जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या’, असं पवार म्हणाले.

  • By विवेक
Updated On: Sep 28, 2026 | 05:40 PM
Sharad Pawar on Modi

Sharad Pawar on Modi

Follow Us
Follow Us:
  • NDAसोबत जाण्याच्या चर्चांना शरद पवारांनी पूर्णविराम दिला.
  • ‘यायचं असेल तर आमच्यासोबत या’ म्हणत अप्रत्यक्ष संदेश.
  • दुष्काळ, शेतकरी आणि AIच्या मुद्द्यावरही पवारांनी कार्यकर्त्यांना केलं मार्गदर्शन
 

Sharad Pawar : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या एका चर्चेला शरद पवारांनी अखेर स्पष्ट उत्तर दिलं आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपप्रणित NDAसोबत जाणार का? या चर्चांना सोमवारी मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत खुद्द शरद पवारांनी पूर्णविराम दिला. यावेळी त्यांनी थेट भूमिका मांडत, ‘आपण कुठेही जाणार नाही. आम्ही कुणासोबत जाणार नाही. यायचं असेल तर आमच्यासोबत या’, असं स्पष्ट केलं.

NDAच्या चर्चेवर शरद पवारांचं स्पष्ट उत्तर

शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर त्यांच्या पक्षाच्या राजकीय भूमिकेबाबत चर्चांना चांगलाच ऊत आला होता. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं विलिनीकरण होईल आणि शरद पवारांचा गट NDAमध्ये सहभागी होईल, अशा चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. याआधीही अशा शक्यतांवर विविध माध्यमांमध्ये चर्चा झाली होती.

मात्र, आता शरद पवारांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे. ‘यायचं असेल तर आमच्यासोबत या’ या त्यांच्या वक्तव्यामुळे हे विधान अजित पवार गटाच्या नेतृत्वालाही अप्रत्यक्ष संदेश असल्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. मात्र, सुनेत्रा पवारांना उद्देशूनच हे वक्तव्य होतं, असं पवारांनी थेट म्हटलेलं नाही.

‘त्यादिवशी राऊतांचं तोंड काळं करण्यासाठी..,’ राऊतांच्या आरोपांवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर, सिंधुदुर्गच्या जमिनीवरून राजकारण तापलं

दुष्काळावरून सरकारला इशारा

बैठकीत दुष्काळी परिस्थितीवरही सविस्तर चर्चा झाली. राज्यातील २६५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, उर्वरित भागातील परिस्थितीवरही लक्ष देण्याची गरज असल्याचं पवारांनी सांगितलं.

सरकारकडे काही मागण्या करण्यात आल्या असून, पुढील काही दिवसांत त्याबाबत पाठपुरावा केला जाईल, असं त्यांनी सांगितलं. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशाराही पवारांनी दिला.

AI आणि निवडणुकीबाबतही कार्यकर्त्यांना सल्ला

यावेळी शरद पवारांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापराबाबतही कार्यकर्त्यांना सावध केलं. बारामतीमध्ये AI शिकवण्यासाठी संस्था सुरू करण्यात आल्याचं सांगत त्यांनी भविष्यात निवडणूक प्रक्रियेत AIशी संबंधित साधनांचा वापर वाढू शकतो, असं मत व्यक्त केलं.

त्यामुळे पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी AI समजून घेण्याची गरज असल्याचं पवारांनी सांगितलं. राजकारणासोबत बदलत्या तंत्रज्ञानाचीही माहिती ठेवली पाहिजे, असा संदेश त्यांनी पक्षाच्या बैठकीत दिला.

एकूणच, NDAमध्ये जाण्याच्या चर्चांवर शरद पवारांनी सध्या स्पष्ट भूमिका मांडली असून, त्याचवेळी दुष्काळ आणि AIसारख्या मुद्द्यांवर पक्षाने लक्ष केंद्रित करण्याचे संकेत दिले आहेत.

Congress Protest Against Gyanesh Kumar: पुण्यापासून नागपूरपर्यंत…; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस रस्त्यावर

Web Title: Sharad pawar nda alliance ncp meeting maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 05:40 PM

Topics:  

  • BJP
  • NCP Sharad Pawar
  • Sharad Pawar
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis on Gokul milk: गोकुळ वादात फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट! ‘शिंदे-पवारांच्या संमतीनेच…
1

Devendra Fadnavis on Gokul milk: गोकुळ वादात फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट! ‘शिंदे-पवारांच्या संमतीनेच…

Hasan Mushrif ED Case : 2700 पानांची तक्रार कुठे गेली? हसन मुश्रीफ प्रकरणावरून काँग्रेसनं भाजपला घेरलं
2

Hasan Mushrif ED Case : 2700 पानांची तक्रार कुठे गेली? हसन मुश्रीफ प्रकरणावरून काँग्रेसनं भाजपला घेरलं

NCP Politics: रुग्णालयातील भेटीगाठींचा राजकीय सस्पेन्स! वेळ घेऊनही सुनेत्रा पवारांची भेट का टळली?
3

NCP Politics: रुग्णालयातील भेटीगाठींचा राजकीय सस्पेन्स! वेळ घेऊनही सुनेत्रा पवारांची भेट का टळली?

‘…तर मग आमचे पक्ष का फोडले?’; खासदार संजय राऊत यांचा सवाल
4

‘…तर मग आमचे पक्ष का फोडले?’; खासदार संजय राऊत यांचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.