Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवर केंद्राची बघ्याची भूमिका’; अटकेवर शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल

बारामती दौऱ्यात शरद पवार यांनी सोनम वांगचुक यांच्या अटकेवर तीव्र प्रतिक्रिया देत केंद्र सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. हा विषय संसदेतही उपस्थित केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

  • By विवेक
Updated On: Jul 18, 2026 | 07:41 PM
Sharad pawar

Sharad pawar

Follow Us
Follow Us:

बारामती, प्रतिनिधी: सोनम वांगचुक यांनी केलेल्या मागण्यांबाबत केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घेतली. वास्तविक पाहता केंद्र सरकारला हा प्रश्न योग्य पद्धतीने हाताळता आला नाही. वांगचुक यांना करण्यात आलेली अटक दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.

शरद पवार आज (दि. १८) बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी गोविंदबाग येथील निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधत विविध राजकीय विषयांवर भाष्य केले.

Satara : सामाजिक कार्यकर्त्यांचे आत्मक्लेश आंदोलन, सोनम वांगचूक यांना पाठिंबा देत पोलिसांच्या कारवाईबद्दल व्यक्त केली नाराजी

पवार म्हणाले, “सोनम वांगचुक यांना अटक होईल, अशी शक्यता आम्हाला गेल्या पाच-सहा दिवसांपासून वाटत होती आणि अखेर तसेच झाले. वांगचुक यांची मागणी नेमकी काय होती? मंत्र्यांच्या राजीनाम्याची? या संपूर्ण चळवळीतील परिस्थिती सरकारने अत्यंत काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. त्याचा परिणाम हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर झाला.”

“वांगचुक यांनी काही मागण्या केल्या होत्या; मात्र केंद्र सरकारने त्याकडे बघ्याची भूमिका घेतली. हा प्रश्न केवळ एका मागणीपुरता मर्यादित नव्हता, तर त्यामध्ये इतरही अनेक महत्त्वाचे विषय होते. विविध राजकीय पक्ष त्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ उभे राहिले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे तसेच इतर पक्षांचे लोकप्रतिनिधी सामूहिकपणे या मागण्यांना पाठिंबा देत होते. आपल्याला हा प्रश्न हाताळता येत नाही, हे लक्षात आल्यानंतर सरकारने वांगचुक यांना पहाटे अटक केली,” असे पवार म्हणाले.

सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक, ‘हे भ्याड सरकार आहे,’ म्हणत केला हल्लाबोल

“वांगचुक यांना अटक केली असली, तरी हे आंदोलन थांबणार नाही. त्यांची मागणी रास्त होती. दिल्लीमध्ये आंदोलन सुरू असतानाही सरकारमधील कोणीही त्यांची भेट घेण्यासाठी आले नाही. यावरून केंद्र सरकार पूर्णपणे बेजबाबदारपणे वागत असल्याचे दिसून येते. हा विषय येथेच थांबणार नाही. संसद अधिवेशनातही याबाबत चर्चा केली जाईल,” असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत विचारले असता, “राज्य सरकारने ज्या तारखा दिल्या होत्या, त्या पाळायला हव्या होत्या. सरकारने नवीन तारीख जाहीर करेपर्यंत आम्ही प्रतीक्षा करू,” असे पवार यांनी सांगितले.

Web Title: Sharad pawar on sonam wangchuk arrest centre government reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 07:41 PM

Topics:  

  • NCP Sharad Pawar
  • Sharad Pawar
  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

Eknath Khadse: ‘नाथाभाऊंनी पक्ष उभा केला’ शरद पवारांकडून एकनाथ खडसेंचं कौतुक; भाजपला दाखवला आरसा
1

Eknath Khadse: ‘नाथाभाऊंनी पक्ष उभा केला’ शरद पवारांकडून एकनाथ खडसेंचं कौतुक; भाजपला दाखवला आरसा

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 10 प्रवक्त्यांची नवी टीम जाहीर; जितेंद्र आव्हाडांसह ‘या’ नेत्यांवर मोठी जबाबदारी
2

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 10 प्रवक्त्यांची नवी टीम जाहीर; जितेंद्र आव्हाडांसह ‘या’ नेत्यांवर मोठी जबाबदारी

सुप्रिया सुळेंवरील वक्तव्यावरून काँग्रेस-शरद पवार गट आमने-सामने; वडेट्टीवारांच्या माफीनंतर वादावर पडदा?
3

सुप्रिया सुळेंवरील वक्तव्यावरून काँग्रेस-शरद पवार गट आमने-सामने; वडेट्टीवारांच्या माफीनंतर वादावर पडदा?

सुप्रिया सुळेंबाबतचं ‘ते’ वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी घेतलं मागे; म्हणाले, ‘अनावधानाने उल्लेख झाला…’
4

सुप्रिया सुळेंबाबतचं ‘ते’ वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी घेतलं मागे; म्हणाले, ‘अनावधानाने उल्लेख झाला…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.