Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महायुतीमध्ये पक्षांतर्गत फोडाफोडी! अंबरनाथमध्ये शिवसेनेला मोठा धक्का; ‘या’ नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान अंबरनाथमध्ये भाजपा स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता अधिक वाढली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 25, 2025 | 06:47 PM
महायुतीमध्ये पक्षांतर्गत फोडाफोडी! अंबरनाथमध्ये शिवसेनेला मोठा धक्का; ‘या’ नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
Follow Us
Follow Us:

अंबरनाथ: सेना भाजपात एकमेकांचे पदाधिकारी फोडण्याची स्पर्धा काही थांबत नसल्याचे दिसून येत आहे.महायुतीतील मित्र पक्षांनी विरोधकांचे पदाधिकारी फोडून कोंडी करण्यापेक्षा मित्र पक्षांचेच पदाधिकारी फोडाफोडीला जोमाने सुरुवात केली आहे. शिवसेनेचे मोहन पुरम परिसरातील पदाधिकारी दुर्गेश चव्हाण आणि रॉयल पार्क परिसरातील पदाधिकारी सचिन गुंजाळ यांनी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतून (शिंदे गट) थेट भाजपात प्रवेश केला आहे. या घडामोडींमुळे शहरात भाजपा स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता अधिक वाढली आहे.

मोहन पुरम परिसरात मनसेचे माजी नगरसेवक असलेले कुणाल भोईर आणि अपर्णा भोईर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर येथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले दुर्गेश चव्हाण यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत परिवारासह भाजपात प्रवेश केला. भाजपाचे उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचीही सदिच्छा भेट घेतली.

दुसरीकडे रॉयल पार्क परिसरातून इच्छुक असलेल्या सचिन गुंजाळ यांनीही भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला. रॉयल पार्क परिसरातून उमेश गुंजाळ हे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत. शिवसेनेतून भाजपात सुरू असलेल्या इन्कमिंगमुळे भविष्यात भाजपा अंबरनाथ पालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता वाढली आहे. तर शिंदे सेना आणि भाजप मध्ये सुरू झालेले हे पदाधिकारी खेचा-खेचीचे राजकारण पुढे कसे सुरू राहणार हे पहावे लागेल.

निवडणुकीत महायुती म्हणून लढणार? CM फडणवीसांचे विधान चर्चेत

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाहोणार आहेत. राज्यात सर्वच पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. भाजप, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि शिवसेना म्हणजेच महायुती आणि कॉँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट म्हणजेच महाविकास आघाडी एकत्रित लढणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान महायुती निवडणुका एकत्रित लढणार की नाही यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

Maharashtra Politics: निवडणुकीत महायुती म्हणून लढणार? CM फडणवीसांचे विधान चर्चेत; म्हणाले…

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. महायुती लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढणार की स्वबळावर? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता यावर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. भाजपने येणाऱ्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. विभागवार भाजप आढावा घेत आहे. आज नाशिकमदये भाजपची महत्वाची बैठक पार पडली. संघटनात्मक आढावा घेतला जात आहे. ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे महायुती म्हणून लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

Web Title: Shivsena leaders join bjp in ambarnath before local body elections 2025 maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 06:40 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Politics
  • shivsena

संबंधित बातम्या

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
1

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
2

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
3

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
4

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.