मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- सोशल मीडिया)
राज्यात लवकरच होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
महायुती एकत्रित लढणार का यावर फडणवीसांचे भाष्य
घटक पक्षांनी सुरू केली तयारी
Local Body Elections: राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाहोणार आहेत. राज्यात सर्वच पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. भाजप, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि शिवसेना म्हणजेच महायुती आणि कॉँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट म्हणजेच महाविकास आघाडी एकत्रित लढणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान महायुती निवडणुका एकत्रित लढणार की नाही यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. महायुती लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढणार की स्वबळावर? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता यावर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
🪷 CM Devendra Fadnavis at 'BJP – Uttar Maharashtra Sthanik Swarajya Sanstha Nivadnuk Niyojan Baithak'
BJP State President and MLA Ravindra Chavan and other BJP office bearers were present. 🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 'भाजपा – उत्तर महाराष्ट्र… pic.twitter.com/Y3M2bjfAt3 — @OfficeOfDevendra (@Devendra_Office) October 10, 2025
भाजपने येणाऱ्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. विभागवार भाजप आढावा घेत आहे. आज नाशिकमदये भाजपची महत्वाची बैठक पार पडली. संघटनात्मक आढावा घेतला जात आहे. ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे महायुती म्हणून लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
🕔 5.14pm | 10-10-2025📍Nashik. LIVE | Media Interaction#Maharashtra #Nashik https://t.co/QAPm8vleAF — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 10, 2025
युती कुठे होऊ शकते याचा आढावा घेत आहोत. ज्या ठिकाणी शक्य तिथे महायुती करणार आहोत. युती कशी करायची? कुठे-कुठे करायची? याबाबत आढावा घेतला जात आहे. कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही. एखाद्या ठिकाणी चांगला कार्यकर्ता असेल तर मैत्रीपूर्ण लढत होईल असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
महायुतीमध्येच नेत्यांची चोरी
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सुप्रीम कोर्टाने तसे निर्देश दिले आहेत. या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार की स्वतंत्र हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच त्याबाबत अजून अधिकृत घोषणा देखील झालेली नाही. मात्र निवडणुकीआधीच एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेत्याने त्यांची साथ सोडली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुडचे माजी नगराध्यक्ष आणि आणखी एका नेत्याने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला रामराम ठोकला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे महायुतीमध्येच पक्ष फोडाफोडी सुरू आहे की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सुप्रीम कोर्टाने तसे निर्देश दिले आहेत. या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार की स्वतंत्र हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.