Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मतदारांवर शंका असेल तर निवडणूक आयोगाकडे जा…”; महाराष्ट्राच्या निकालावरुन रंगलं राजकारण

दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संशय व्यक्त करण्यात आला. यामुळे सत्ताधारी महायुतीचे मित्रपक्ष आक्रमक झाले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 07, 2025 | 05:13 PM
Shivsena shambhuraj desai target congress Rahul Gandhi for doubting Maharashtra election result

Shivsena shambhuraj desai target congress Rahul Gandhi for doubting Maharashtra election result

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येऊन तीन महिने झाले आहेत. महायुतीने पूर्ण एकतर्फी बहुमताने सरकार देखील स्थापन केले आहे. मात्र यावरुन अजूनही राजकारण सुरु आहे. कॉंग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी खासदार संजय राऊत व खासदार सुप्रिया सुळे पत्रकार परिषद घेऊन मतदान प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे. यावर आता पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शंभूराज देसाई यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक विषयांवर भाष्य केले. विरोधकांकडून महाराष्ट्राच्या निकालावर संशय व्यक्त केला जात असताना शंभूराज देसाई म्हणाले की, “जो सज्ञान आहे जो पात्र आहे त्याला मतदान करायला कसं रोखायचं. त्यांना शंका असेल तर निवडणूक आयोगाकडे जावं. ज्या मतदान करणाऱ्या लोकांवर आक्षेप आहे त्यांची नावे निवडणूक आयोग चौकशी करेल. याची निवडणूक आयोग दखल घेईल. मतदान करणाऱ्या लोकांवर जर कोणाला आक्षेप असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे जावं,” असा सल्ला शंभूराज देसाई यांनी दिला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

त्याचबरोबर राज्याचा लवकरच अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. याबाबत माहिती देताना शंभूराज देसाई म्हणाले की, “राज्याचा अर्थसंकल्प येणारं आहे त्यापूर्वी ही बैठक झाली. वित्तमंत्री आढावा घेत असतात, सातारा जिल्ह्याचा आढावा आम्हीं सादर केला आहे.  ७१५ कोटी रूपयांचा प्रस्तावित आराखडा सादर केला आहे. सगळे प्रकल्प आम्ही अजित पवार यांना दाखवले आहेत. अजित पवार यांनी समाधान व्यक्त केल आहे. यापुढे तिन्ही नेते एकत्रित बसतील आणि निधी कसा द्यायचा हे ठरवतील. राज्याची आर्थिक घडी ठीक आहे. अनेक योजना आपण आणल्या आहेत लोकांसाठी योजना राबवल्या थोडासा वित्तीय बोजा वाढला असला तरी महाराष्ट्राचे ते पेलवण्याची क्षमता आहे. आमचं सरकार पूर्ण प्रयत्न करत आहेत की इन्कम सोर्स कसे वाढवता येतील,” असे मत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी मांडले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाच्या अपडेट घ्या एका क्लिकवर

मराठीमधील अभिनेते राहूल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली. याबाबत शंभूराज देसाई म्हणाले की,” हे वक्तव्य निंदनीय आहे आम्ही जाहीर निषेध करतो. गृह विभागाने राहुल सोलापूरकर यांच्या व्हिडिओची तपासणी करावी कडक भूमिका घ्या कडक धोरण राबवावंराहूल सोलापूरकरने नुसती दिलगिरी व्यक्त करून चालणार नाही.  रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर जाऊन नाक रगडत माफी मागितली पाहिजे,” अशी मागणी राहूल सोलापूरकर यांनी केली आहे.

Web Title: Shivsena shambhuraj desai target congress rahul gandhi for doubting maharashtra election result

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 05:13 PM

Topics:  

  • Rahul Gandhi
  • Sambhuraje desai

संबंधित बातम्या

Sharad Pawar : “काँग्रेस लवकरच फुटेल…”, बिहार निकालानंतर पंतप्रधानांच्या भविष्यवाणीवर शरद पवारांचे मोठे विधान
1

Sharad Pawar : “काँग्रेस लवकरच फुटेल…”, बिहार निकालानंतर पंतप्रधानांच्या भविष्यवाणीवर शरद पवारांचे मोठे विधान

आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; ‘या’ बड्या नेत्यांचा समावेश
2

आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; ‘या’ बड्या नेत्यांचा समावेश

TMC Congress Alliance: टीएमसी-काँग्रेस अलायन्सला लागणार पूर्णविराम? बिहारच्या निकालाने बंगाल निवडणुकांचा बिघडवला ‘गेम’
3

TMC Congress Alliance: टीएमसी-काँग्रेस अलायन्सला लागणार पूर्णविराम? बिहारच्या निकालाने बंगाल निवडणुकांचा बिघडवला ‘गेम’

निवडणूक आयोग अन् राहुल गांधींमध्ये बिनसलं; प्रतिज्ञापत्र मागताच काढतात पळ
4

निवडणूक आयोग अन् राहुल गांधींमध्ये बिनसलं; प्रतिज्ञापत्र मागताच काढतात पळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.