Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 1 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vidhan Parishad Election: भाजपनंतर ठाकरे गटाची मोठी खेळी! विधानपरिषदेसाठी उमेदवाराचे नाव निश्चित, तर महायुतीमध्ये नाराजीचा सूर

Vidhan Parishad Election News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी आमदार अंबादास दानवे यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 29, 2026 | 04:19 PM
भाजपनंतर ठाकरे गटाची मोठी खेळी! विधानपरिषदेसाठी उमेदवाराचे नाव निश्चित, तर महायुतीमध्ये नाराजीचा सूर

भाजपनंतर ठाकरे गटाची मोठी खेळी! विधानपरिषदेसाठी उमेदवाराचे नाव निश्चित, तर महायुतीमध्ये नाराजीचा सूर

Follow Us
Follow Us:

Vidhan Parishad Election News In Marathi : राज्यातील लक्षद्वीप विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची अधिकृत घोषणा सुरू झाली असून, भाजपनंतर आता ठाकरे यांच्या शिवसेनेतून महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नेते अंबादास दानवे याचं नाव यांना विधान परिषदेचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी चर्चेत होते. तसेच, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून त्यांनाच करण्याचा आग्रह केला जात होता. मात्र, अंबादास दानवे ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत दिल्याने आता सस्पेन्स संपला आहे.

राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने ६ उमेदवार जाहीर केल्यानंतर, आता ठाकरे गटानेही सस्पेन्स संपवला आहे.ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जागी आता अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांनी याबाबत माहिती दिली. उद्धव ठाकरे विधान परिषदेचे नेते व्हावेत, अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची इच्छा होती. यामध्ये ठाकरे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या निवडीसाठी आग्रह धरला होता.मात्र, आता उद्धव ठाकरे यांनी आपलं वजन अंबादास दानवे यांच्या पारड्यात टाकल्यामुळे, आता ते ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार असतील. अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील, उद्या सकाळी 11 वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

Diveagar Gram Panchayat: तटकरेंच्या बालेकिल्ल्याला भगदाड! दिवेआगारमध्ये राष्ट्रवादीचा धक्कादायक पराभव; विजय तोडणकर नवे सरपंच

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच अंबादास दानवे यांचा कार्यकाळ निश्चित झाला असता. यानंतर, विधान परिषदेतील उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्या जागी कोण जाणार याची उत्सुकता सर्वांनाच होती.

विधान परिषदेतील १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. १२ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे.

विधानसभेच्या संख्याबळानुसार, भाजपच्या वट्यालाला ६, शिवसेनेला २, राष्ट्रवादीला १ आणि महाविकास आघाडीला १ जागा मिळेल. विधान परिषदेवर आमदार निवडण्यासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक असतो.

महायुती भाजप (१३१ आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (५७ आमदार) आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी (४० आमदार) यांचे संख्याबळ पाहता, महाआघाडीचे ९ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ ४६ आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो.

भाजपकडून विधान परिषदेसाठी ६ उमेदवारांची यादी

दरम्यान, भाजपने विधान परिषदेसाठी ६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजप संसदीय समितीच्या मंजुरीनंतर, भाजपने महाराष्ट्रातील ५ विधान परिषदांच्या जागांसाठी पाच उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे, विधान परिषदेच्या एका पोटनिवडणुकीसाठी एकूण ६ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

भाजप उमेदवार

सुनील कर्जतकर,
माधवी नाईक,
संजय भेंडे,
विवेक कोल्हे,
प्रमोद जठार,
प्रज्ञा सावंत

विधान परिषद निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम –

निवडणूक अधिसूचना जारी करण्याची तारीख: २३ एप्रिल २०२६
उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस: ३० एप्रिल २०२६
उमेदवार छाननी: २ मे २०२६
उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख: ४ मे २०२६
मतदानाची तारीख: १२ मे २०२६
मतदानाची वेळ: सकाळी ९ ते सायंकाळी ४.
मतमोजणी: १२ मे २०२६ सायंकाळी ५ वाजता
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: १३ मे २०२६

नगर परिषदा महासंघाच्या अध्यक्षपदी रुचिता घोरपडे यांची निवड, 393 नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांचं करणार नेतृत्व

Web Title: Shivsena ubt vidhanparishad election ambadas danve candidate mva uddhav thackeray shivsena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 04:19 PM

Topics:  

  • Ambadas Danve
  • Shisena UBT
  • shivsena

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.