Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uddhav Thackeray Live : “आता रम्मी नाही तर आता तीन पत्ती खेळ…; सत्ताधारी कलंकित मंत्र्यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंचा ‘आक्रोश’

Uddhav Thackeray Andolan Live : शिवसेना उद्धव ठाकरे गटाने राज्यव्यापी जनआक्रोश आंदोलन सुरु केले आहे. दादरमधील शिवाजी पार्क येथील जनआक्रोश आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे हे देखील सहभागी झाले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 13, 2025 | 02:31 PM
Maharashtra Politics : 'उपमुख्यमंत्रिपद हे संवैधानिक पद नसले तरी ते...'; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विधान

Maharashtra Politics : 'उपमुख्यमंत्रिपद हे संवैधानिक पद नसले तरी ते...'; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विधान

Follow Us
Follow Us:

Uddhav Thackeray Mumbai Live : मुंबई : केंद्रामध्ये राहुल गांधी तर राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये झालेली मतांची चोरी आणि राज्यातील बेताल वक्तव्य करणारे राजकीय नेत्यांची हकालपट्टी करावी अशा मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक झाला आहे. याच मागणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने राज्यव्यापी जनआक्रोश आंदोलन सुरु केले आहे. दादरमधील शिवाजी पार्क येथील जनआक्रोश आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे हे देखील सहभागी झाले आहेत.

राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिवसेना ठाकरे गटाकडून जनआक्रोश आंदोलन करण्यात आले आहे. दादरमधील शिवाजी पार्क येथील आंदोलनामध्ये स्वतः उद्धव ठाकरे सहभागी झाले. यावेळी उपस्थितांनी या सरकारचे करायचे काय तर खाली डोकं वर पाय अशा घोषणा दिल्या. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही म्हणत आहात खाली डोकं वर पाय…पण ह्यांना डोकं तरी आहे का? हे बिनडोक्याचे आहेत. ह्यांना फक्त पाय आहेत सुरतेला आणि गुवाहटीला पळून जायला. डोकं कुठे आहे. त्यांच्याकडे फक्त खोके आहेत, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला,

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे ते म्हणाले की, “आज संपूर्ण महाराष्ट्र जागा झाला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक शहरात या भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करणारा मर्द आपल्या शिवसेनेमध्ये आहे. आज दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांचा मोर्चा निवडणूक आयोगावर चालला आहे. आपण सुद्धा भ्रष्टाचाराच्या विरोधात रस्त्यावर उतरलो आहे. ही जुलूमशाही सुरु आहे त्याच्या विरोधात आता जनतेला उतरावेच लागेल,” असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन! pic.twitter.com/geyb1VdNBW — ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) August 11, 2025

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, “लाज एका गोष्टीची वाटते की, आपण दरवेळी सांगतो की, हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. नेहमी देशाला दिशा दाखवणारा गौरवशाली असणारा आपला महाराष्ट्र…या भ्रष्ट आघाडीने कितव्या क्रमांकावर नेऊन बसवला आहे. भ्रष्टाचाराची रांगा लावली तर महाराष्ट्र आता पहिल्या रांगेत आहे. पण विकास आणि नितिमत्ता पाहिली तर महाराष्ट्र शेवट्या रांगेत आहे. आता खरोखर लाज वाटते आम्हाला तुमची…आत्ताचे सरकार जनताभिमुख नाहीच आता ह्यांचं सरकार पैसे गिळणारं मुख असलेलं आहे,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे उद्धव ठाकरे यांनी आरोप करण्यात आलेल्या आमदारांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, “आपण फक्त बोलत नाही तर पुराव्यानिशी या सर्व आमदारांची आपण सभागृहाबाहेर यांची लख्तरे वाळत घातली होती. महाराष्ट्राचा एक मंत्री डान्सबार चालवतो आहे. कोणी पैशांची बॅग घेऊन बसलं आहे. एका मंत्र्याला तर त्याच्या आवडीचं खातं मिळालं ते म्हणजे रम्मीमंत्री. हे क्रीडा मंत्री नाही तर रम्मी मंत्री आहेत. शेतकऱ्यांची चेष्ठा आणि थट्टा करतात.  भर सभागृहामध्ये तुम्ही रमी खेळता…शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी यांच्याकडे पैसे नाहीत. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही. देवेंद्र फडणवीस हे चौकशी करुन मंत्र्यांची हकालपट्टी करतील अशी अपेक्षा होती मात्र मुख्यमंत्री सांगतात की आम्ही त्यांना समज दिली आहे. रम्मी नाही तर आता तीन पत्ती खेळ…अशी समज दिली असेल,’ असे म्हणत उद्धव ठाकरे यांंनी महायुती सरकार आणि कलंकित मंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.

Web Title: Shivsena uddhav thackeray dadar andolan live marathi political news update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 02:09 PM

Topics:  

  • political news
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
1

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?
2

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
3

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका
4

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.