Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sudhakar Badgujar News: सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी

पक्षाने घेतलेल्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून, बडगुजर समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. बडगुजर यांची भूमिका, आगामी राजकीय वाटचाल आणि ते दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

  • By anuradha sagar
Updated On: Jun 04, 2025 | 12:38 PM
Sudhakar Badgujar News: सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी
Follow Us
Follow Us:

नाशिक जिल्ह्याचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे (UBT Shiv Sena Nashik)उपनेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. नाशिकमध्ये आज ठाकरे गटाच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांना फोन करून बजगुजर यांची हकालपट्टी केली जात असल्याची घोषणा केली. पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकऱणी बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

काही दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर यांनी स्वत: नाराज असल्याचे सांगितले होतेच, पण त्याचवेळी आपल्यासह महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह आणखी १०-१२ जणही नाराज असल्याचा दावा केला होता. त्यातच बडगुजर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतल्याने त्यांच्याविरोधात पक्षातूनही जाहीर नाराजी व्यक्त केली जात होती. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहत असतानाच बडगुजर यांच्या हकालपट्टीमुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पाकिस्तानची जुळवा जूळवी; भारताविरोधात मुस्लीम देशांना एकवटण्याचा सुरु आहे नापाक ‘प्लॅन’

दरम्यान, या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने आज पत्रकार परिषद बोलावली होती. ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी यांच्या नेृत्तृत्त्वात या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होते. पण सुधाकर बडगुजर मात्र या पत्रकार परिषदेला उपनेते सुधाकर बडगुजर हजर राहिले नाहीत. नियोजित कार्यक्रमासाठी नाशिक बाहेर असल्याचे सांगत बडगुजर यांनी पत्रकार परिषदेला जाणं टाळलं. त्यामुळे पत्रकार परिषदेदरम्यान संजय राऊत यांनी बडगुजर यांची हकालपट्टी करत असल्याची घोषणा केली.

कोण आहेत सुधाकर बडगुजर?

शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर सुधाकर बडगुजर हे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. वीस वर्षांपूर्वी नाशिकमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला असताना बडगुजर यांनी राजकारणात प्रवेश केला आणि ठेकेदारीतून सुरुवात करून महापालिकेतील प्रमुख पदांपर्यंत मजल मारली.

शिवसेनेचे तत्कालीन महापौर दशरथ पाटील यांच्याशी त्यांनी जवळीक साधून पतसंस्था स्थापन करत निष्ठा जपण्याचा प्रयत्न केला. मात्र पुढे दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले. या काळात बडगुजर यांनी महापालिकेतील व्यवहार समजून घेतले आणि २००७ साली सिडको प्रभागातून अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्षाच्या माध्यमातून आपली राजकीय वाढ सुरू ठेवली.

आनंद पोटात माझ्या मावेना! RCB च्या विजयात सामील झाले सेलिब्रिटी; पोस्ट शेअर करत म्हणाले, ‘अनेक प्रतीक्षेनंतर..’

महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांची सूत्रे आणि निवडणुका

शिवसेनेचे उमेदवार म्हणून ते पुन्हा महापालिकेत निवडून आले. त्यांनी सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेते यासारखी जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत नाशिक पश्चिम मतदारसंघातून त्यांनी शिवसेनेचे प्रतिनिधित्व केले, परंतु भाजपच्या सीमा हिरे यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

२०१९ मध्ये बडगुजर यांची नाशिक महानगरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर बडगुजर हे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाऊ लागले. मात्र शिवसेनेत फूट पडल्यावर स्थानिक पातळीवर बडगुजर यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले. अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले, यामागे बडगुजर यांचा अप्रत्यक्ष हात असल्याचा अनेकदा आरोप करण्यात आला.

 

 

Web Title: Sudhakar badgujar expelled from thackerays shiv sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 12:01 PM

Topics:  

  • sanjay raut
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

अमित शाहांनी शिंदेंना दिली फोडाफोडीची ‘सुपारी’; फडणवीसांच्या खुर्चीच्या रक्षणासाठी उद्धव ठाकरेंची साईचरणी प्रार्थना
1

अमित शाहांनी शिंदेंना दिली फोडाफोडीची ‘सुपारी’; फडणवीसांच्या खुर्चीच्या रक्षणासाठी उद्धव ठाकरेंची साईचरणी प्रार्थना

‘शिर्डीचा खासदार एक नंबरचा बदमाश’; साईबाबांची तीनदा शपथ घेतली अन् 100 कोटींना विकला गेला, संजय राऊतांचा भाऊसाहेब वाकचौरेंवर निशाणा
2

‘शिर्डीचा खासदार एक नंबरचा बदमाश’; साईबाबांची तीनदा शपथ घेतली अन् 100 कोटींना विकला गेला, संजय राऊतांचा भाऊसाहेब वाकचौरेंवर निशाणा

मोठी बातमी! 6 बंडखोर खासदार अपात्र होणार? उद्धव ठाकरेंचा मोठा दावा; लोकसभा अध्यक्षांकडे कारवाईची मागणी
3

मोठी बातमी! 6 बंडखोर खासदार अपात्र होणार? उद्धव ठाकरेंचा मोठा दावा; लोकसभा अध्यक्षांकडे कारवाईची मागणी

२०२९ च्या पंतप्रधानपदासाठी भाजपात रस्सीखेच; फोडाफोडीचे राजकारण सुरू – उद्धव ठाकरे
4

२०२९ च्या पंतप्रधानपदासाठी भाजपात रस्सीखेच; फोडाफोडीचे राजकारण सुरू – उद्धव ठाकरे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.