Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आधीच तरुण आपल्यावर ओरडतोय…’; TET पेपरफुटीवरून सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा आहेर; भर अधिवेशनात फटकारलं

TET पेपरफुटी प्रकरणावर विधानसभेत चर्चा सुरू असताना भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारलाच सुनावले. "आधीच तरुण आपल्यावर ओरडतोय," असे म्हणत त्यांनी परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवले.

  • By विवेक
Updated On: Jun 29, 2026 | 06:36 PM
‘आधीच तरुण आपल्यावर ओरडतोय...’; TET पेपरफुटीवरून मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर; भर अधिवेशनात फटकारलं

‘आधीच तरुण आपल्यावर ओरडतोय...’; TET पेपरफुटीवरून मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर; भर अधिवेशनात फटकारलं

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्रातील TET पेपरफुटी प्रकरण विधानसभेत चांगलेच गाजले. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणावर निवेदन सादर केल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या सरकारलाच घरचा आहेर दिला. परीक्षा झाल्यानंतर पेपरफुटी उघडकीस आली असती तर राज्यभर मोठा गोंधळ उडाला असता, असे सांगत त्यांनी पोलिसांच्या तत्पर कारवाईचे कौतुक केले.

सभागृहात बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, प्रश्नपत्रिका छपाईसाठी महाराष्ट्राबाहेरील राज्यांची निवड करण्याऐवजी त्या राज्यातच छापल्या पाहिजेत. पैसे महाराष्ट्रात ठेवले जातात आणि प्रश्नपत्रिका आग्र्यात छापल्या जातात, ही पद्धत बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “त्या पोलीस निरीक्षकाने वेळीच कारवाई केली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. परीक्षा झाल्यानंतर पेपरफुटी समोर आली असती तर आधीच सरकारवर नाराज असलेल्या तरुणांचा संताप आणखी वाढला असता.”

मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चा

महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी अर्थमंत्री असलेल्या मुनगंटीवार यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याला मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्यात आल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यांच्या विधानाकडे त्यामुळे अधिक लक्ष वेधले जात आहे.

‘शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा केलाच पाहिजे’; भाजप सरकारवर हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात, कर्जमाफीसाठी एल्गार तीव्र

TET पेपरफुटी प्रकरणात तीन आरोपी अटकेत

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सभागृहात माहिती देताना सांगितले की, गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून पेपर विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक केली. त्यांच्या चौकशीत TET परीक्षेची प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आली असून राजू प्रयाग शाम आणि अन्य दोघांविरुद्ध भिवंडीच्या कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरियाणा, बिहार आणि दिल्लीत तपास

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असून हरियाणा, बिहार आणि दिल्ली येथे तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणात मकोका लावण्याबाबतही तपास सुरू असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली.

‘अर्थखातं लवकरच राष्ट्रवादीकडे येणार’; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं आश्वासन, जय पवारांचा मोठा दावा

पुढील वर्षापासून परीक्षा ऑनलाइन करण्याची तयारी

शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, पुन्हा होणाऱ्या TET परीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच भविष्यात परीक्षा अधिक पारदर्शक करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार असून, पुढील वर्षापासून परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा सरकारचा विचार आहे.

Web Title: Sudhir mungantiwar slams government over tet paper leak maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 06:36 PM

Topics:  

  • dada bhuse
  • Sudhir Mungantiwar
  • TET Exam

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.