Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होणार? अजित पवारांचं स्वप्न पूर्ण होणार? खासदारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Sunetra Pawar as CM : अजित पवारांनंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याची व पक्षाची सुत्रे हाती घेत उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. मात्र त्या लवकर मुख्यमंत्री होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 13, 2026 | 01:03 PM
सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह? ज्येष्ठ नेत्याची कायदेशीर नोटीस

सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह? ज्येष्ठ नेत्याची कायदेशीर नोटीस

Follow Us
Follow Us:

 

  • खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद
  • बारामती ही शरद पवारांच्या कष्ट आणि पुण्याईमुळे
  • सुनेत्रा पवारांना भाजप मुख्यमंत्री करणार असेल तर – राऊत
Sunetra Pawar CM : मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. यामध्ये सुनेत्रा पवार बिनविरोध निवडून येणार आहेत. जोरदार राजकारण झाल्यानंतर काँग्रेसने अर्ज मागे घेतला. त्यामुळे सुनेत्रा पवारांविरोधात कोणताही प्रबळ नेता नसल्याने त्या निवडणूक जिंकणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. अजित पवारांनंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याची व पक्षाची सुत्रे हाती घेत उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. मात्र त्या लवकर मुख्यमंत्री होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये (Maharashtra Politics) रंगली आहे.

 

सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र त्यांना लवकरच राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री होण्याचा देखील मान मिळू शकतो अशा चर्चा रंगल्या आहेत. याचे कारण म्हणजे खासदार संजय राऊत यांनी केलेले सूचक विधान. खासदार संजय राऊत यांनी मुंबंईमध्ये माध्यमांशी संवाद साधून अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. त्यांनी महायुतीमध्ये समीकरणे बदलणार असून शिंदेंना धक्का देऊन भाजप सुनेत्रा पवारांना सोबत घेऊ शकतो अशी राजकीय भविष्यवाणी खासदार राऊतांनी केली.

हे देखील वाचा : Raj Thackeray यांची भावनिक श्रद्धांजली; आशाताईंची तुलना ‘रेनेसाँस’ कलाकारांशी, म्हणाले “एक युग संपलं…”

खासदार संजय राऊत यांनी बारामतीच्या निवडणुकीवर भाष्य केले. ते म्हणाले की,”भले, आज तुम्हाला मोदी आणि शाहांनी उभं केलं असेल पण जर पवारांनी जर बारामती उभी केली नसती तर त्यापुढच्या कोणत्याही पवारांना महाराष्ट्रात कोणतेच स्थान मिळाले नसते,शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का, तुम्ही कितीही मोठे झालात, अजित पवार, सुप्रिया सुळे, त्यांचे चिरंजीव असतील. तुम्ही आज राजकारणात पवार म्हणून उभे आहात, ते शरद पवारांमुळे आहात. याचा विसर पडता कामा नये. शरद पवारांची पुण्याई पाठीशी आहे. तुम्ही कितीही नाही म्हटलं, कितीही टाळण्याचा प्रयत्न केला, तरी पवारांची पुण्याई आहेच,” असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावला.

हे देखील वाचा : आमदारांच्या डॉक्टर मुलीने वडिलांना जीवनदान दिले! DCM शिंदे म्हणाले, “अशी मुलगी केवळ नशिबानेच मिळते…”

वारसदार म्हणून सुनेत्रा पवारांची निवड 

पुढे ते म्हणाले की, “हे बिनविरोध फक्त एका निवडणुकीपुरती आहे. पुढची निवडणूक बिनविरोध होणार नाही. ही निवडणूक आम्ही अजित दादांना श्रद्धांजली म्हणून पाहत आहोत. अजित दादांना मुख्यमंत्री होता आलं नाही, जर सुनेत्रा पवारांना भाजप मुख्यमंत्री करणार असेल तर तो भाजपचा मोठेपणा आहे. देवेंद्र फडणवीस जर त्यांचा वारसदार म्हणून एकनाथ शिंदे ऐवजी सुनेत्रा पवारांची निवड करतात की काय, असं मला जाणवत आहे,” असे सूचक वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

Web Title: Sunetra pawar become maharashtra cm said by mp sanjay raut maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • political news
  • sanjay raut
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

‘जात पडताळणी समिती रद्द केली तर…’; छगन भुजबळ यांचा जरांगेंच्या मागणीला विरोध
1

‘जात पडताळणी समिती रद्द केली तर…’; छगन भुजबळ यांचा जरांगेंच्या मागणीला विरोध

चाफ्याच्या फुलाने राजकीय ‘गुलदस्ता’; उदयनराजे-रामराजेंच्या भेटीने जिल्हा बँक सभेला रंग
2

चाफ्याच्या फुलाने राजकीय ‘गुलदस्ता’; उदयनराजे-रामराजेंच्या भेटीने जिल्हा बँक सभेला रंग

अकोल्यातील हिवरखेड नगर परिषदेच्या मासिक सभेत राडा; नगरसेवकासह काही जण जखमी
3

अकोल्यातील हिवरखेड नगर परिषदेच्या मासिक सभेत राडा; नगरसेवकासह काही जण जखमी

Government Decision : मुख्यमंत्र्यांचा मंत्र्यांनाच दणका; ‘त्या’ 314 नियुक्त्याच केल्या रद्द
4

Government Decision : मुख्यमंत्र्यांचा मंत्र्यांनाच दणका; ‘त्या’ 314 नियुक्त्याच केल्या रद्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.