Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह? ज्येष्ठ नेत्याची कायदेशीर नोटीस

सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर पक्षातील ज्येष्ठ नेते सच्चिदानंद सिंह यांनी आक्षेप घेत कायदेशीर नोटीस बजावली आहे. 26 फेब्रुवारी 2026 रोजी झालेली निवडणूक अवैध असल्याचा दावा करत पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 13, 2026 | 06:26 PM
सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह? ज्येष्ठ नेत्याची कायदेशीर नोटीस

सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह? ज्येष्ठ नेत्याची कायदेशीर नोटीस

Follow Us
Follow Us:
  • सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदावर कायदेशीर प्रश्नचिन्ह
  • राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी
  • 26 फेब्रुवारी 2026 ची निवडणूक अवैध असल्याचा दावा
 

राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासू मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अश्यातच आता राजकीय वर्तुळातून मोठी घडामोड समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवत राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. या नोटीसमुळे पक्षात आणि राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

26 फेब्रुवारीची निवडणूक अवैध असल्याचा दावा

9 जुलै रोजी पाठवलेल्या नोटीसमध्ये 26 फेब्रुवारी 2026 रोजी झालेली राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक अवैध असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे ही निवडणूक रद्द करून नव्याने निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी सच्चिदानंद सिंह यांनी केली आहे. त्यांच्या मते, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी स्वतंत्र आणि निपक्षपाती निवडणूक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली पाहिजे.

‘कॉकरोच पार्टी’त विलीन होण्याचे ‘उबाठा’ला लागले डोहाळे? भाजप नेत्याची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासह तिघांना नोटीस

या प्रकरणी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि पक्षाचे सचिव ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीसमध्ये नवीन निवडणूक होईपर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष आणि सुधारित पदाधिकाऱ्यांची यादी अमान्य मानावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या वैधतेवरच प्रश्न उपस्थित झाल्याने पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या नोटीसमुळे पुढील काळात पक्षाची भूमिका काय असेल आणि या मागणीवर काय निर्णय घेतला जाईल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार?

गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या विलीनीकरणाच्या चारचा सातत्याने रंगात आहेत. दिवंगत नेते अजित पवार यांच्या हयात असतानादेखील मोठ्या प्रमाणात या चर्चा होत होत्या.

’26/11 च्या वेळी गिरीश महाजन बंदूक घेऊन रस्त्यावर उतरले होते, हे मला आठवत नाही’; गिरीश महाजनांचा दावा एकनाथ खडसेंनी फेटाळला

नुकतेच अधिवेशन काळात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान भवनात भेट घेतल्याने या चर्चाना आणखी जोर चढू लागला. यावर मात्र शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मिश्किल वक्तव्य करत ‘आम्हाला टीव्हीवर रोज नवीन पक्षात पाठवले जाते. आता फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी राहिलंय,’ असं म्हणतत्यांनी राजकीय अफवांवर उपरोधिक भाष्य केले.

Web Title: Sunetra pawar national president legal notice sachchidanand singh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 06:26 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Ajit Pawar NCP
  • Sharad Pawar
  • Sunetra Pawar
  • supriya sule

संबंधित बातम्या

Shashikant Shinde Satara: मुंबईपासून पुण्यापर्यंत कोणी कुठले गुंड आणले हे माहीत आहे! जावळीच्या राजकारणावर शशिकांत शिंदे आक्रमक
1

Shashikant Shinde Satara: मुंबईपासून पुण्यापर्यंत कोणी कुठले गुंड आणले हे माहीत आहे! जावळीच्या राजकारणावर शशिकांत शिंदे आक्रमक

दोम्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पार पडणार हाय वोल्टेज मिटिंग!
2

दोम्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पार पडणार हाय वोल्टेज मिटिंग!

‘काँग्रेस नेते राष्ट्रवादीला चुकीच्या बॉक्समध्ये बसवतात’; पृथ्वीराज चव्हाणांच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचा पलटवार
3

‘काँग्रेस नेते राष्ट्रवादीला चुकीच्या बॉक्समध्ये बसवतात’; पृथ्वीराज चव्हाणांच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचा पलटवार

Wardha News : सिंचनासाठी २४ तास वीजपुरवठ्याची मागणी, माजी आमदार तिमांडे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना साकडे
4

Wardha News : सिंचनासाठी २४ तास वीजपुरवठ्याची मागणी, माजी आमदार तिमांडे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना साकडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.