Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवनीत राणांना मिळणार राज्यसभेची उमेदवारी? सुनील तटकरेंच मोठं वक्तव्य

नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याने राज्यसभेवर नवनीत राणा यांची वर्णी लागणार का याबाबत चर्चाना उधाण आले. मात्र आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत मोठे भाष्य करत या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

  • By विवेक
Updated On: Jun 07, 2026 | 04:16 PM
Sunil tatkare, Navneet Rana, Rajysabha, Chhagan Bhujbal, Sameer bhujbal.

Sunil tatkare, Navneet Rana, Rajysabha, Chhagan Bhujbal, Sameer bhujbal.

Follow Us
Follow Us:

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर आता कोणाची वर्णी लागणार यावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. अश्यातच काल (शनिवार, ६ जून) नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याने राज्यसभेवर नवनीत राणा यांची वर्णी लागणार का याबाबत चर्चाना उधाण आले. मात्र आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत मोठे भाष्य करत या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. “नवनीत राणा हा विषय राष्ट्रवादीसाठी संपलेला आहे,” असे म्हणत त्यांनी या चर्चाना पूर्णविराम दिला आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर छगन भुजबळ यांना राज्यसभा सदस्यत्व मिळणार, अश्या चर्चा होत्या. मात्र नवनीत राणा यांनी काल अचानक मुंबईत येऊन देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राज्यसभेच्या शर्यतीत नवनीत राणा देखील असल्याचे स्पष्ट झाले. नवनीत राणांसाठी राष्ट्रवादी हि जागा सोडेल यासाठी भाजपचे प्रयत्न असल्याचे बोलले जात होते. आता मात्र सुनील तटकरे यांनी या चर्चा पूर्णपणे फेटाळून लावल्या असून छगन भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांकडे अट

छगन भुजबळ यांनी शनिवारी (६ जून) पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी करत ‘मी राज्यसभेवर गेल्यानंतर माझ्या जागी पुतण्या समीर भुजबळ याना मंत्रिमंडळात घ्यावे,’ अशी मागणी केली. भुजबळांसह राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनीही फडणवीसांकडे तसा आग्रह केला. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतील वरिष्ठांशी चर्चा करून यासंदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे समजते. मात्र अजूनदेखील भाजपकडून याबाबत होकार मिळाला नसल्याचे समजत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्णयाची वाट बघत बसले आहेत. भाजप हायकमांडकडून भुजबळांच्या मागणीला ग्रीन सिग्नल मिळाल्यास भुजबळ सोमवारी आपला राज्यसभा निवडणुकीसाठीचा अर्ज दाखल करतील, अशीही माहिती मिळत आहे.

मोठी बातमी ! प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; भेटीदरम्यान केली ‘ही’ महत्त्वाची विनंती

समीर भुजबळ यांना मंत्रिपद मिळणार ?

आता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शनिवारी संध्याकाळपर्यंत छगन भुजबळ यांच्या नावाची अधिकृत घोषणा करतो की नाही, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे राजकीय लक्ष लागले आहे. याशिवाय, महायुतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेतृत्व छगन भुजबळ यांच्या आग्रहापुढे झुकून समीर भुजबळ यांचा राज्याच्या आगामी मंत्रिमंडळ विस्तारात समावेश करून त्यांना मंत्री म्हणून शपथ देतील की नाही, हे पाहणे अत्यंत रंजक आणि आव्हानात्मक असेल. जर हे सूत्र पूर्णपणे यशस्वी झाले, तर आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी ओबीसी राजकीय पटलावर महायुतीला मोठे बळ मिळू शकते.

Maharashtra Politics : विधान परिषद निवडणुकीत आघाडीत दिसून आली बिघाडी; पण युती मात्र सुसाट…

Web Title: Sunil tatkare denies news of navneet rana getting rajysabha ticket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 04:16 PM

Topics:  

  • Chhagan Bhujbal
  • Navneet Rana
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी; शिवसेना आणि राष्ट्रवादी ‘या’ मुद्यावरून आमनेसामने
1

महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी; शिवसेना आणि राष्ट्रवादी ‘या’ मुद्यावरून आमनेसामने

रामदास कदमांच्या टीकेला सुनील तटकरेंचे सडेतोड उत्तर; मुख्यमंत्र्यांकडे ठाण्यातील रुग्णालयात खाट राखीव ठेवण्याची करणार मागणी
2

रामदास कदमांच्या टीकेला सुनील तटकरेंचे सडेतोड उत्तर; मुख्यमंत्र्यांकडे ठाण्यातील रुग्णालयात खाट राखीव ठेवण्याची करणार मागणी

मुख्यमंत्र्यांच्या भेटीवरून सुनेत्रा पवार नाराज? सुनील तटकरे यांनी दिलं स्पष्ट उत्तर
3

मुख्यमंत्र्यांच्या भेटीवरून सुनेत्रा पवार नाराज? सुनील तटकरे यांनी दिलं स्पष्ट उत्तर

NCP Politics: पटेल-तटकरेंनी फडणवीसांची घेतलेली भेट वादात; सुनेत्रा पवारांनी विचारला जाब
4

NCP Politics: पटेल-तटकरेंनी फडणवीसांची घेतलेली भेट वादात; सुनेत्रा पवारांनी विचारला जाब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.