Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रामदास कदमांच्या टीकेला सुनील तटकरेंचे सडेतोड उत्तर; मुख्यमंत्र्यांकडे ठाण्यातील रुग्णालयात खाट राखीव ठेवण्याची करणार मागणी

रामदास कदम यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सुनील तटकरेंनी तीव्र शब्दांत पलटवार केला. दिवंगत वडिलांचा उल्लेख केल्याबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे कदमांसाठी रुग्णालयात खाट राखीव ठेवण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.

  • By विवेक
Updated On: Jul 19, 2026 | 08:57 PM
रामदास कदमांच्या टीकेला सुनील तटकरेंचे सडेतोड उत्तर

रामदास कदमांच्या टीकेला सुनील तटकरेंचे सडेतोड उत्तर

Follow Us
Follow Us:

रायगड: शिवसेना नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेनंतर आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या टीकेला सुनील तटकरे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिलं असून, रामदास कदम यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.

वडिलांवरील टीकेमुळे तटकरे भावूक आणि आक्रमक

माध्यमांशी संवाद साधताना सुनील तटकरे यांनी रामदास कदम यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, “माझ्या पक्षाच्या सहकाऱ्यांनी, मनोज शिंदे, समीर शेडगे आणि इतरांनी याआधीच त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. मी आजवर या विषयावर कधीही काही बोललो नव्हतो. परंतु, त्यांनी केलेल्या वक्तव्यात थेट माझ्या वडिलांचा उल्लेख केला आहे.”

तटकरे यांनी पुढे सांगितले की, “१९८४ साली, म्हणजेच जवळपास ४४ वर्षांपूर्वी माझ्या वडिलांचे दुःखद निधन झाले. त्यावेळी माझे वय २९ वर्षे होते. रामदास कदम यांनी केवळ माझ्यावरच नाही, तर माझ्या दिवंगत वडिलांचाही एकेरी भाषेत उल्लेख केला, हे अत्यंत दुर्दैवी आहे.”

‘एक कुत्रं लय पिसाळलंय!” जैन मुनी निलेशचंद्रांवर ठाकरेंच्या शिलेदाराचा घणाघात; वादग्रस्त पोस्टची राजकीय वर्तुळात चर्चा

‘आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला…’

रामदास कदम यांच्यावर थेट शब्दांत हल्ला चढवताना तटकरे यांनी एका मराठी म्हणीचा वापर केला. ते म्हणाले, “आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला आणि त्यातच विंचू दंश झाला” अशीच काहीशी अवस्था आज रामदास कदम यांची झाली आहे.

पुढे बोलताना त्यांनी पिसाळलेल्या श्वानाचा (कुत्र्याचा) संदर्भ देत म्हटले की, “मला कोणीतरी सांगितले की, पिसाळलेला श्वान चावल्यानंतर माणसावर त्याचे जे परिणाम होतात, तसेच काहीसे ते बोलू लागतात. रामदास कदम यांचे बोलणेही तसेच वाटत आहे.”

‘हे तर लोकशाहीचे सीरियल रेपिस्ट’; सहा खासदारांच्या विलिनीकरणावरून संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात

मुख्यमंत्र्यांना फोन करून रुग्णालयात खाट राखीव ठेवण्याची विनंती करणार

तटकरे यांनी या वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही साकडे घालणार असल्याचे सांगितले. “मी मुख्यमंत्री शिंदे साहेबांना फोन करून विनंती करणार आहे की, ठाण्यामध्ये जे रुग्णालय आहे, तिथे रामदास कदम यांच्यासाठी एखादी खाट (Cot) राखीव करता आली तर त्यांनी नक्की करावी. यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जे रोज धिंडवडे काढले जात आहेत, ते कुठेत्री थांबतील,” असा टोला तटकरे यांनी लगावला.

या संपूर्ण प्रकरणावरून महायुतीमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला असून, आगामी काळात याचे काय पडसाद उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Web Title: Sunil tatkare reply to ramdas kadam controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 08:57 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Ramdas Kadam
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल
1

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार
2

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार

Raigad Politics : ‘भरत गोगावलेंनी तटकरेंच्या घरी जाणं उचित नाही’; गोगावले – तटकरे भेटीवर महेंद्र दळवी नाराज
3

Raigad Politics : ‘भरत गोगावलेंनी तटकरेंच्या घरी जाणं उचित नाही’; गोगावले – तटकरे भेटीवर महेंद्र दळवी नाराज

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
4

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.