'एक कुत्रं लय पिसाळलंय!" जैन मुनी निलेशचंद्रांवर ठाकरेंच्या शिलेदाराचा घणाघात
अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील कथित चोरीच्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या मुद्द्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आंदोलनाची भूमिका घेतली असून, विविध ठिकाणी रामरक्षा आंदोलन आयोजित केले जात आहे. या आंदोलनावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत असताना जैन मुनी निलेशचंद्र यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी सोशल मीडियावरून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
जैन मुनी निलेशचंद्र यांनी आपल्या वक्तव्यात उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी राम मंदिरातील चोरीचा मुद्दा मंदिर प्रशासन हाताळेल असे सांगत, ठाकरे यांनी या विषयावर राजकारण करू नये, अशी भूमिका मांडली होती. तसेच त्यांच्या आंदोलनावरही उपरोधिक टिप्पणी केली होती.
या वक्तव्याला उत्तर देताना अखिल चित्रे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत निलेशचंद्र यांच्यावर टीका केली. राम मंदिरातील कथित चोरीच्या वेळी मौन बाळगणारे लोक आता आवाज उठवत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच संबंधित प्रकरणातील दोषींना संरक्षण देण्याचा प्रयत्न होत असल्याचाही दावा त्यांनी केला.
आपल्या अधिकृत ‘X ‘ अकाऊंटवरून ते म्हणाले, “ज्या कुत्र्यांनी चढावा चोरी होत असताना भुंकायला पाहिजे होतं, ते आता चोरी पकडल्यानंतर का भुंकत आहेत? याचा अर्थ इतकाच की, चढावा चोरीत फक्त ट्रस्टीच नव्हे, तर त्यांना पाठीशी घालणारी काही कुत्रीही सहभागी होती. त्यातलं एक कुत्रं मुंबईत “निलेशचंद्र” या नावाने मोकाट फिरत आहे. पवित्र धर्माच्या आड लपून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. लय पिसाळलंय!”
ज्या कुत्र्यांनी चढावा चोरी होत असताना भुंकायला पाहिजे होतं, ते आता चोरी पकडल्यानंतर का भुंकत आहेत?
याचा अर्थ इतकाच की, चढावा चोरीत फक्त ट्रस्टीच नव्हे, तर त्यांना पाठीशी घालणारी काही कुत्रीही सहभागी होती. त्यातलं एक कुत्रं मुंबईत “निलेशचंद्र” या नावाने मोकाट फिरत आहे. पवित्र… pic.twitter.com/ux0ZCXpxUB — Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) July 18, 2026
“@mybmc , याचा फोटो पाठवत आहे. वेळीच याच्या मुसक्या आवळा. #पिसाळलेला_निलेशचंद्र आणि हो… राम मंदिरासाठी रस्त्यावर उतरून लढणाऱ्या शिवसैनिकांचीच आम्ही लेकरं आहोत. आम्ही राम मंदिरातील दरोडेखोरीविरुद्ध आवाज उठवत आहोत. त्या आवाजाचा त्रास त्यांनाच होतोय, ज्यांना या दरोडेखोरीला पाठीशी घालायचं आहे.”
चित्रे यांनी आपल्या पोस्टमध्ये मुंबई महानगरपालिकेलाही टॅग करत निलेशचंद्र यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. शिवसैनिकांनी राम मंदिरासाठी संघर्ष केला असून मंदिरातील कथित गैरव्यवहाराविरोधात आवाज उठवणे हेच आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, राम मंदिर दानपेटी प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होताना दिसत आहेत. सोशल मीडियावरील आक्रमक पोस्ट आणि परस्परांवरील टीकेमुळे हा वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणावर संबंधितांकडून पुढे कोणती भूमिका घेतली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






