Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivsena Supreme Court Hearing: पक्षात एकाधिकारशाही वाढल्यानेच बंडखोरी! शिंदेंच्या वकिलांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

Shivsena Supreme Court Hearing: शिंदे गटाने असाही युक्तिवाद केला की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९९ मधील पक्षाच्या घटनेशी संबंधित प्रक्रियेत निवडणूक आयोगाच्या अधिकारांना मान्यता दिली होती. कौल यांच्या मते, नंतर २०१८ मध्ये पक्षाच्या घटनेत केलेले बदल हे योग्य प्रक्रियेनुसार नव्हते

  • By anuradha sagar
Updated On: Sep 03, 2026 | 11:02 AM
Real Shiv Sena Case Supreme Court, Election Commission Party Symbol Power,

Real Shiv Sena Case Supreme Court, Election Commission Party Symbol Power,

Follow Us
Follow Us:
  • निवडणूक आयोगाच्या अधिकाराचे समर्थन
  • उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
  • आयोगाच्या निर्णयाचे कायदेशीर रक्षण
 Shivsena Supreme Court Hearing: ‘शिवसेना’ पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हाबाबत सुरू असलेल्या विवादात बुधवारी सुप्रीम कोर्टात शिंदे गटाच्या वतीने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी गंभीर आरोप करताना सांगितले की, पक्षात एकाधिकारशाही वाढली होती आणि अंतर्गत निवडणुका घेतल्या जात नव्हत्या; याच असंतोषातून एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंडखोरी केली.

कौल यांनी दावा केला की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षात लोकशाही व्यवस्था कमकुवत झाली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, पक्षात झालेल्या नियुक्त्या या लोकशाही मार्गाने झाल्या नव्हत्या आणि अनेक निर्णय एकाच व्यक्तीच्या स्तरावर घेतले गेले. निवडणूक आयोगाकडून पक्षात अंतर्गत निवडणुका घेण्याबाबत वारंवार सांगण्यात आले, परंतु त्या पुढे ढकलल्या जात राहिल्या. कौल यांच्या युक्तिवादानुसार, निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबतचा निर्णय अचानक घेतला नाही. आयोगाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून आणि कागदपत्रांची पाहणी केल्यानंतरच हा निर्णय दिला आहे. शिंदे गटाने याच निर्णयाचे समर्थन करत तो योग्य असल्याचे स्पष्ट केले.

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद

 

बाळासाहेबांच्या निर्णयाचा दिला संदर्भ

शिंदे गटाने असाही युक्तिवाद केला की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९९ मधील पक्षाच्या घटनेशी संबंधित प्रक्रियेत निवडणूक आयोगाच्या अधिकारांना मान्यता दिली होती. कौल यांच्या मते, नंतर २०१८ मध्ये पक्षाच्या घटनेत केलेले बदल हे योग्य प्रक्रियेनुसार नव्हते, म्हणूनच निवडणूक आयोगाने त्या बदललेल्या घटनेला मान्यता दिली नाही.

भाजपसोबत युती तोडल्याचा मुद्दा

कौल म्हणाले की, शिवसेनेने भाजपसोबत मिळून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, निकालानंतर काँग्रेससोबत जाऊन सरकार स्थापन करण्यात आले. शिंदे गटाच्या मते, पक्षाच्या मूळ विचारधारेपासून दूर जाऊन वेगळी आघाडी केल्यामुळेही कार्यकर्ते आणि आमदारांमध्ये तीव्र असंतोष वाढला होता.

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा

१५ला पुढील सुनावणी

ठाकरे गट यापूर्वीच आपली बाजू मांडलेली आहे आणि धनुष्यबाण चिन्ह न मिळाल्यास ते गोठवण्याची मागणी त्यांनी केली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ सप्टेंबर रोजी होणार आहे. पुढील सुनावणीदरम्यान शिंदे गटाच्या वतीने आमदारांची अपात्रता, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आणि राजकीय पक्ष व विधिमंडळ पक्ष यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर अधिक युक्तिवाद केला जाण्याची शक्यता आहे.

 

 

Web Title: Supreme court hearing shinde camp defends eci decision on shivsena name and symbol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 11:02 AM

Topics:  

  • Supreme Court

संबंधित बातम्या

Supreme Court of India on NEET Protest: सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश
1

Supreme Court of India on NEET Protest: सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश

Supreme Court On CJP March: दिल्लीतील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या मोर्चाबाबत मोठी अपटेड; सुप्रीम कोर्टात मोठी खडाजंगी
2

Supreme Court On CJP March: दिल्लीतील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या मोर्चाबाबत मोठी अपटेड; सुप्रीम कोर्टात मोठी खडाजंगी

Ethanol Petrol: पेट्रोलमध्ये नेमके किती इथेनॉल? पावतीवर टक्केवारी नमूद करण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीस नकार
3

Ethanol Petrol: पेट्रोलमध्ये नेमके किती इथेनॉल? पावतीवर टक्केवारी नमूद करण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीस नकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.