Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supreme Court On CJP March: दिल्लीतील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या मोर्चाबाबत मोठी अपटेड; सुप्रीम कोर्टात मोठी खडाजंगी

Supreme Court On CJP March: सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सांगितले की, कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही सरकार आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांची जबाबदारी आहे. कोणती कृती कायद्याच्या कक्षेत आहे आणि कोणती बेकायदेशीर आहे, हे पोलीस आणि प्रशासनाने ठरवले पाहिजे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 31, 2026 | 03:36 PM
Supreme Court Limits Trial Court Powers, Remission Power Supreme Court, Life Imprisonment Laws India

Supreme Court Limits Trial Court Powers, Remission Power Supreme Court, Life Imprisonment Laws India

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीतील ५ सप्टेंबरच्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या मोर्चावर बंदी घालण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार.
  • १२-१३ सप्टेंबरच्या ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर मोर्चा रोखण्याची होती मागणी.
  • एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने ॲड. डॉ. रिझवान यांच्यामार्फत दाखल केली होती याचिका.
Supreme Court On CJP March:  “सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत ५ सप्टेंबर 2026 रोजी नियोजित असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या मोर्चाला बंदी घालण्यास नकार दिला आहे. या मोर्चामुळे कोणतीही अनुचित घटना घडू शकते, असे मानण्यास सध्या कोणतेही सबळ कारण नाही.” असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालायाने नोंदवले आहे. १२-१३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेनंतरपर्यंत, ल्युटियन्स दिल्लीत ५ सप्टेंबर रोजी होणारा हा मोर्चा थांबवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने या मोर्चाविरोधात याचिका दाखल केली होती. सुनावणीवेळी याचिकाकर्त्याचे करणारे वकील डॉ. रिझवान यांनी सांगितले की, निषेध करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे, परंतु कोणत्याही मोर्चा किंवा निदर्शनासाठी कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले पाहिजे. सीजेपी (CJP) ५ सप्टेंबर रोजी इंडिया गेटवर मोर्चा काढण्याची घोषणा सोशल मीडियावर आधीच करण्यात आली आहे. पण अद्याप दिल्ली पोलिसांकडून कोणत्याही परवानगी दिलेली नाही, असं अॅड रिझवान यांनी सांगितलं.

Amit Thackeray: पुण्यात अमित ठाकरेंच्या दौऱ्यात राड्याची ठिणगी? सरकारी महाविद्यालयातून मोदींचा फोटो

आपला आंदोलनाच्या अधिकाराला विरोध नाही. पण जर कोणत्याही गटाला सरकारकडे आपल्या मागण्या मांडण्यासाठी मोर्चा काढायचा असेल, तर त्यांनी विहित प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच, जर सरकारने आंदोलनासाठी परवानगी दिली नाही, तर संबंधित व्यक्ती तात्काळ सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात.” असंही अॅड. रिझवान यांनी म्हटलं आहे.

अॅड. रिझवान यांच्या युक्तीवादावर बोलताना सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले की, प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्था राखण्याची आणि सर्व पक्ष शांततेने, जबाबदारीने व कायद्यानुसार वागतील याची खात्री करण्याची अपेक्षा आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवणे आणि कायदा व सुव्यवस्थेच्या कोणत्याही समस्या टाळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. या भूमिकेनुसार, ५ सप्टेंबर रोजी प्रस्तावित असलेला सरन्यायाधीशांचा मोर्चा सध्या तरी थांबवला जाणार नाही.

“मागील अनुभवांवर आधारित कायदा व सुव्यवस्थेची चिंता”

यावर याचिकाकर्त्याच्या वकिलांनी म्हणाले, कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची भीती केवळ शक्यता नसून मागील अनुभवांवर आधारावर आपण बोलत आहोत, कधीकधी लहान घटनांचे रूपांतर मोठ्या कायदा व सुव्यवस्थेच्या समस्यांमध्ये होऊ शकते. विशेष म्हणजे, दिल्लीत येत्या १२ आणि १३ सप्टेंबर रोजी ब्रिक्स शिखर परिषद होणार असून, राजधानीत आंतरराष्ट्रीय पाहुणे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे, कोणत्याही अनुचित घटनेचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटू शकतात. अशी शक्यताही त्यांनी बोलून दाखवली.

Hockey World Cup 2026: ४४ व्या मिनिटाला Michel Struthoff चा ‘मॅजिक टच’! एकमेव गोल ठरला गेमचेंजर; 

“ब्रिक्स शिखर परिषदेपर्यंत आपण १० दिवस थांबू शकत नाही का?”

डॉ. रिझवान म्हणाले की, आंदोलकांच्या मागण्या असू शकतात आणि आपण त्यांचे महत्त्व नाकारत नाही. पण ब्रिक्स शिखर परिषद संपेपर्यंत ते १० दिवस थांबू शकणार नाहीत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, आंदोलकांनी या काळात सरकारसमोर आपल्या मागण्या मांडाव्यात. परवानगी न मिळाल्यास, ते तात्काळ सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात. असेही त्यांनी यावेळी सूचित केलं.

सरन्यायाधीश म्हणाले, “आत्ता काहीतरी चुकीचे घडेल असे मानण्याचे काही कारण नाही. या प्रकरणाला दोन पैलू आहेत. पहिला कायदा आणि सुव्यवस्था आणि दुसरा धोरणात्मक मुद्दे. संबंधित पक्षांना प्रथम सरकारसमोर आपली मते मांडण्याची संधी दिली पाहिजे. या मोर्चामुळे कोणतीही अनुचित घटना घडेल असा विश्वास ठेवण्यासाठी न्यायालयाकडे सध्या कोणतीही सबळ कारणे किंवा ठोस आधार नाही. त्यामुळे सर्व पक्ष जबाबदारीने, शांततेने आणि कायद्यानुसार वागतील. अस गृहित धरलं पाहिजे.

कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही सरकारची जबाबदारी

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सांगितले की, कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही सरकार आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांची जबाबदारी आहे. कोणती कृती कायद्याच्या कक्षेत आहे आणि कोणती बेकायदेशीर आहे, हे पोलीस आणि प्रशासनाने ठरवले पाहिजे. जर कोणतीही अनुचित घटना घडली किंवा परिस्थिती चिंताजनक झाली, तर संबंधित पक्ष न्यायालयाकडे दाद मागू शकतात. न्यायालयाने आशा व्यक्त केली की दोन्ही पक्ष कायद्याचा आदर करतील आणि त्यानुसार वागतील.

३ सप्टेंबर रोजी सुनावणीची विनंती

डॉ. रिझवान यांनी ३ सप्टेंबर रोजी खटल्याची सुनावणी घेण्याची विनंती केली. त्यांनी सांगितले की, ज्या पक्षाने मोर्चाची घोषणा केली आहे, त्यांनाही न्यायालयासमोर हजर राहण्याची संधी दिली पाहिजे. त्यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी प्रश्न विचारला की, जर संबंधित संघटना खटल्यातील पक्षकारच नसेल, तर न्यायालय तिला समन्स कसे बजावू शकते. त्यावर संबंधित गटाचे कोणतेही स्पष्ट कार्यालय किंवा लेटरहेड उपलब्ध नाही. सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला केंद्र सरकारसमोर आपली बाजू मांडण्याचे स्वातंत्र्य दिले.

 

Web Title: Supreme court refuses to ban cockroach janata party march in delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • Cockroach Janata Party
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Ulhasnagar News: भाजप-शिवसेना वाद चिघळला! ७ स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरील स्थगिती कायम, ४ आठवड्यांत निकालाचे निर्देश
1

Ulhasnagar News: भाजप-शिवसेना वाद चिघळला! ७ स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरील स्थगिती कायम, ४ आठवड्यांत निकालाचे निर्देश

Supreme Court on Reservation: धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीला जुन्या जातीच्या आधारावर आरक्षण नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल
2

Supreme Court on Reservation: धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीला जुन्या जातीच्या आधारावर आरक्षण नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल

Jantar-Mantar बाबत मोठी घडामोडी, थेट सुप्रीम कोर्टात याचिका, गुरुवारी सुनावणीची शक्यता
3

Jantar-Mantar बाबत मोठी घडामोडी, थेट सुप्रीम कोर्टात याचिका, गुरुवारी सुनावणीची शक्यता

India Alliance : निवडणूक आयोगाविरोधात राहुल गांधींसह ‘इंडिया’च्या ११ नेत्यांची सुप्रीम कोर्टात याचिका
4

India Alliance : निवडणूक आयोगाविरोधात राहुल गांधींसह ‘इंडिया’च्या ११ नेत्यांची सुप्रीम कोर्टात याचिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.