Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेसच्या ‘गुंगी गुडिया’ टीकेवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाच्या विधानावरून मोठे वक्तव्य

सुनेत्रा पवार यांच्यावरील ‘गुंगी गुडिया’ टीकेवर सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. हे वक्तव्य अयोग्य असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने भूमिका स्पष्ट केल्याचे म्हटले.

  • By विवेक
Updated On: Aug 08, 2026 | 05:47 PM
Supriya Sule Sunetra Pawar

Supriya Sule Sunetra Pawar

Follow Us
Follow Us:
  • ‘गुंगी गुडिया’ वक्तव्य अयोग्य असल्याचे सुप्रिया सुळे यांचे स्पष्ट मत
  • काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने भूमिका स्पष्ट केल्याचा दावा
  • महाराष्ट्रातील पाणी, शेतकरी आणि विकासाच्या प्रश्नांसाठी 8 खासदार PM मोदींची भेट घेणार
राज्यातील राजकीय वातावरणात सध्या विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच महाराष्ट्र काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडिया’ या उल्लेखावरून निर्माण झालेला वाद आता पुन्हा चर्चेत आला आहे. काँग्रेसच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलन करत निषेध नोंदवला होता. आता या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच स्पष्ट भूमिका मांडली आहे.

सुनेत्रा पवार यांच्याबाबत महाराष्ट्र काँग्रेसकडून करण्यात आलेले वक्तव्य अयोग्य असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी आपण काँग्रेसच्या नेतृत्वाशी चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने अवघ्या काही वेळात आपली भूमिका स्पष्ट केली, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला.

‘कुणाचा अपमान होईल असं बोलू नये’

“सुनेत्रावहिनींबद्दल महाराष्ट्र काँग्रेसने केलेलं वक्तव्य अयोग्यच होतं,” असे सांगत सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाचे आभार मानले. महाराष्ट्र काँग्रेसच्या स्थानिक IT सेलमधून हा प्रकार घडला असून हे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाचे मत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 8 खासदार सोमवारी प्रधानमंत्री मोदींची घेणार भेट; नेमकी काय चर्चा होणार?

महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या भूमिकांमध्ये फरक असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी नमूद केले. कोणाचाही अपमान होईल अशा पद्धतीने वक्तव्य करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने या प्रकरणात मनाचा मोठेपणा दाखवत भूमिका स्पष्ट केल्याचेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आठ खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

पाणी, शेतकरी आणि विकासाच्या प्रश्नांवर PM मोदींसोबत चर्चा

महाराष्ट्रातील गंभीर प्रश्न संसदेत मांडण्यास अडचणी येत असल्याने थेट पंतप्रधानांकडे हे मुद्दे घेऊन जाण्याचा निर्णय खासदारांनी घेतल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील पाणीप्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वाढते शहरीकरण आणि मतदारसंघातील विकासकामांशी संबंधित अडचणी यावर या भेटीत चर्चा होणार आहे. खासदारांना मिळणाऱ्या विकासनिधीच्या अंमलबजावणीतही अनेक अडथळे येत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र सरकारकडून खासदारांना अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

‘Gen Z शी बोलण्याआधी अमित शाहांचा राजीनामा घ्या’; उद्धव ठाकरेंचा मोहन भागवतांना खोचक टोला

या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आठ खासदारांनी पंतप्रधान मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती. त्यानुसार सोमवारी सकाळी 11 वाजता संसदेतील कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आठ खासदारांची भेट घेणार आहेत, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. यावेळी त्यांनी “एकनाथ शिंदे यांच्या खासदारांना नाश्त्यासाठी बोलावण्यात आलं होतं, आम्हाला नाश्त्यासाठी बोलावलं नाही,” असेही सांगितले. त्यामुळे या भेटीमागील राजकीय चर्चांनाही आता वेग आला आहे.

Web Title: Supriya sule first reaction congress gungi gudiya comment sunetra pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 05:47 PM

Topics:  

  • Congress
  • Sunetra Pawar
  • supriya sule

संबंधित बातम्या

Goa News  : गोय राखण यात्रेच्या पार्श्वभूमीवर ‘खोका रन’ उपरोधिक गेमद्वारे गोवा काँग्रेसवर निशाणा
1

Goa News : गोय राखण यात्रेच्या पार्श्वभूमीवर ‘खोका रन’ उपरोधिक गेमद्वारे गोवा काँग्रेसवर निशाणा

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं
2

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं

Harshwardhan Sapkal : SIR वरून निवडणूक आयोगावर हल्लाबोल; ‘३ कोटी २८ लाख मतदारांची नावे वगळली,’ हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
3

Harshwardhan Sapkal : SIR वरून निवडणूक आयोगावर हल्लाबोल; ‘३ कोटी २८ लाख मतदारांची नावे वगळली,’ हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

Congress Criticized SIR Program: SIRमध्ये ७.८ कोटी मतदारांची नावे वगळली; काँग्रेसचा गंभीर आरोप
4

Congress Criticized SIR Program: SIRमध्ये ७.८ कोटी मतदारांची नावे वगळली; काँग्रेसचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.