Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुप्रिया सुळेंची पंतप्रधान मोदींशी भेट; राजकीय चर्चांना संजय राऊतांनी दिलं स्पष्टीकरण, ‘कोणीही महाविकास आघाडी…’

सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आठ खासदार सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं असताना संजय राऊतांनी भेटीमागचं कारण स्पष्ट केलं आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 09, 2026 | 02:37 PM
Manoj Jarange, Sanjay Raut, Maratha Reservation, Mumbai News

Manoj Jarange, Sanjay Raut, Maratha Reservation, Mumbai News

Follow Us
Follow Us:
  • सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीचे 8 खासदार मोदींची भेट घेणार.
  • भेटीचा उद्देश खासदारांच्या मतदारसंघातील प्रश्न मांडणे असल्याचं संजय राऊतांचं स्पष्टीकरण.
  • ‘महाविकास आघाडी सोडण्याचा प्रश्नच नाही’, राऊतांचा दावा
 

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह आठ खासदार सोमवारी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली. या भेटीची बातमी समोर येताच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. राष्ट्रवादीचा गट महाविकास आघाडीपासून दूर जाणार का, अशा चर्चाही सुरू झाल्या.

मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी सुप्रिया सुळे यांच्याशी स्वतःचं बोलणं झाल्याचं सांगितलं.

‘खासदारांच्या प्रश्नांसाठी मोदींची भेट’

संजय राऊत यावेळी माध्यमांशी संवाद साधत म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी केवळ दोन खासदारांचे प्रश्न न मांडता राष्ट्रवादीच्या सर्व आठ खासदारांचे प्रश्न एकत्रितपणे पंतप्रधानांसमोर मांडण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेऊन ते पंतप्रधानांसमोर मांडले जाणार आहे. त्यामुळे या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही,” असं त्यांनी सूचित केलं.

मोठी बातमी ! संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता; राघव चड्ढांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी?

‘कोणीही महाविकास आघाडी सोडत नाही’

या भेटीवरून महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण होऊ नये, असंही राऊत म्हणाले. “कोणीही कुठेही जात नाही. कोणीही महाविकास आघाडी सोडत नाही,” असं स्पष्ट करत त्यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही महाविकास आघाडीतील महत्त्वाची घटक असल्याचं सांगितलं. तसेच शरद पवार हे आपले मार्गदर्शक असल्याचंही राऊत यांनी नमूद केलं.

महायुतीतील कथित मतभेदांवरही राऊत यांनी भाष्य केलं. शिंदे गट आणि अजित पवार गटाबाबत त्यांनी भाजप आणि केंद्रीय नेतृत्वावर जोरदार टीका केली. तसेच आगामी काळात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाच्या राजकीय अस्तित्वाबाबतही त्यांनी दावा केला. सुप्रीम कोर्टातील प्रलंबित प्रकरणाचा संदर्भ देत या गटाला भविष्यात भाजपमध्ये विलीन व्हावं लागू शकतं, असं राऊत म्हणाले.

‘उद्धव ठाकरेंना जळी स्थळी काष्ठी पाषाणी शिंदेच दिसतात’; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना टोला

एकूणच, सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या खासदारांची मोदींसोबत होणारी भेट ही मतदारसंघातील प्रश्नांसाठी असल्याचं स्पष्टीकरण देत राऊत यांनी महाविकास आघाडीतील संभाव्य राजकीय समीकरणांच्या चर्चांना तूर्तास विराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

Web Title: Supriya sule meets pm modi sanjay raut reaction mva

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • Mahavikas Aghadi
  • sanjay raut
  • shivsena
  • Shivsena UBT
  • supriya sule

संबंधित बातम्या

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
1

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत
2

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत

Sushma Andhare : ‘शेतकरी उपाशी मरतोय, नेते काजू-बदामावर ताव मारतायत,’ सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल
3

Sushma Andhare : ‘शेतकरी उपाशी मरतोय, नेते काजू-बदामावर ताव मारतायत,’ सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल

Sanjay Raut : संजय राऊत यांनी लिहले आयुक्तांना पत्र ? घडलेल्या घटने मागे राजकीय पाठबळ ….
4

Sanjay Raut : संजय राऊत यांनी लिहले आयुक्तांना पत्र ? घडलेल्या घटने मागे राजकीय पाठबळ ….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.