अजित पवार यांंच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना (फोटो - इन्स्टाग्राम)
एक्सवर अजित पवार यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्याचा फोटो शेअर करत पुतळ्याचे अनावरण होत असताना त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणी दाटून आल्याचे सांगितले. सुप्रिया सुळे यांनी लिहिले, “पुणे जिल्हा परिषदेच्या परिसरात आज लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आणि प्रवेशद्वाराचा नामकरण सोहळा पार पडला. या सोहळ्याला उपस्थित राहून दादांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.”
अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांना मिळाली धमकी’; ‘या’ गँगस्टरच्या नावाचा होतोय उल्लेख
“याप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य, पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.”
पुणे जिल्हा परिषदेच्या परिसरात आज लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आणि प्रवेशद्वाराचा नामकरण सोहळा पार पडला. या सोहळ्याला उपस्थित राहून दादांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. याप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शहा, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य, पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. अजितदादांचे पुण्यावर विशेष प्रेम होते. अनेक वर्षे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करताना त्यांनी जिल्ह्याच्या विकासाकडे जातीने लक्ष दिले. प्रत्येक विकासकाम दर्जेदार व्हावे, यासाठी ते नेहमीच आग्रही असायचे. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. पुणे जिल्ह्याच्या विकासात त्यांचे योगदान अतिशय मोलाचे राहिले आहे. आज दादांच्या पुतळ्याचे अनावरण होत असताना त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणी दाटून आल्या. पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याची आठवण हा पुतळा कायम करून देत राहील. 🙏 — Supriya Sule (@supriya_sule) November 16, 2026
भावना व्यक्त करत सुप्रिया सुळे यांनी लिहिले की, “अजितदादांचे पुण्यावर विशेष प्रेम होते. अनेक वर्षे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करताना त्यांनी जिल्ह्याच्या विकासाकडे जातीने लक्ष दिले. प्रत्येक विकासकाम दर्जेदार व्हावे, यासाठी ते नेहमीच आग्रही असायचे. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. पुणे जिल्ह्याच्या विकासात त्यांचे योगदान अतिशय मोलाचे राहिले आहे. आज दादांच्या पुतळ्याचे अनावरण होत असताना त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणी दाटून आल्या. पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याची आठवण हा पुतळा कायम करून देत राहील.”
Ans: पुणे जिल्हा परिषदेच्या परिसरात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
Ans: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
Ans: सुप्रिया सुळे यांनी पुतळ्याला अभिवादन करत अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्याच्या विकासातील योगदानाच्या आठवणींना उजाळा दिला.






