Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘काँग्रेस नेते राष्ट्रवादीला चुकीच्या बॉक्समध्ये बसवतात’; पृथ्वीराज चव्हाणांच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचा पलटवार

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून पृथ्वीराज चव्हाण आणि सुप्रिया सुळे यांच्यात शाब्दिक संघर्ष पाहायला मिळाला. राज्य आणि केंद्रातील काँग्रेस नेत्यांमधील संवादावरही सुळेंनी भाष्य केले.

  • By विवेक
Updated On: Aug 21, 2026 | 05:52 PM
Supriya Sule

Supriya Sule

Follow Us
Follow Us:
  • पृथ्वीराज चव्हाणांच्या ‘मनुस्मृतीवाद्यांसोबत जाऊ नका’ या वक्तव्याला सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर.
  • राज्यातील काँग्रेस नेते राष्ट्रवादीला चुकीच्या बॉक्समध्ये बसवतात, असा टोला.
  • बजरंग सोनावणे यांच्या कुटुंबावरील आरोपांवर सुप्रिया सुळे आक्रमक
 

देशभरात सध्या राजकीय वातावरणात चांगलीच धामधूम पाहायला मिळत असून राज्यातदेखील असेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे. राजकीय विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना आता राज्यात मित्रपक्षांमध्येही जुंपली असल्याचे दिसत आहे. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून (Delimitation) महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात शाब्दिक संघर्ष पाहायला मिळत आहे.

माध्यमांशी संवाद साधत सुप्रिया सुळेंनी आज (शुक्रवार, 21 ऑगस्ट) पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मनुस्मृतीवादी विचारांच्या लोकांसोबत जाण्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.

पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर साधला निशाणा

राज्यातील काँग्रेसचे काही नेते राष्ट्रवादी काँग्रेसला सातत्याने चुकीच्या राजकीय चौकटीत बसवतात, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. केंद्रातील काँग्रेस नेत्यांशी राष्ट्रवादीचा नियमित संवाद असल्याचे सांगत राज्य आणि दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाच्या संवादामध्ये काही प्रमाणात अंतर असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांना राष्ट्रवादीची भूमिका वेगळ्या पद्धतीने दिसत असल्याचे सुळे यांच्या वक्तव्याचा सूर होता.

‘भाजपाने राहुल गांधींचा धसका घेतला’; पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमावर कन्हैया कुमारांचा दावा

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मालकी आणि पक्षाच्या संविधानाचा मुद्दाही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोगात अजित पवार गटाला यश मिळाले असले तरी सर्वोच्च न्यायालयातील लढाई अद्याप सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष काढणाऱ्या शरद पवारांकडून पक्ष काढून दुसऱ्याला देणे हा अन्याय असल्याचेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, बीडमधील विलास घुले प्रकरणाचा संदर्भ देत बजरंग सोनावणे यांच्या कुटुंबावर होणाऱ्या आरोपांवर सुळे यांनी आक्रमक भूमिका घेतली. राजकीय संघर्ष घरापर्यंत नेऊ नये, तसेच खोट्या पद्धतीने गुन्हे दाखल केले गेल्यास ते सहन केले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. बजरंग सोनावणे यांच्या पाठीशी शरद पवार आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यावरून प्रशासनावर प्रश्न उपस्थित

राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याबाबतही सुप्रिया सुळे यांनी प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी लोकशाही मार्गाने कार्यक्रम घेत असताना त्यांच्या कार्यक्रमासाठी एवढ्या अटी का घातल्या जात आहेत, असा सवाल त्यांनी केला.

‘घंट्याचा निष्ठावान! ज्या काँग्रेसने याच्या कुटुंबाला सगळं दिलं त्याच काँग्रेसला सोडून..,’ निलेश राणेंची वैभव नाईकांवर सडकून टिका

याचदरम्यान, 2014 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव आल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. मात्र, त्यावेळी शिवसेनेसोबत जाण्यास काँग्रेस तयार नसल्याने प्रस्ताव फेटाळल्याचे त्यांनी सांगितले. 2019 मध्ये बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर महाविकास आघाडीचा मार्ग मोकळा झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

या पार्श्वभूमीवर मविआतील घटक पक्षांमध्ये सुरू असलेली वक्तव्यांची देवाणघेवाण आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.

Web Title: Supriya sule reply prithviraj chavan ncp congress seat delimitation bill

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 05:52 PM

Topics:  

  • Congress
  • pruthviraj chavhan
  • supriya sule

संबंधित बातम्या

काँग्रेस कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड, ‘पोलिसांनी गुन्हेगारांसारखी वागणूक दिली’; NSUIचा गंभीर आरोप
1

काँग्रेस कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड, ‘पोलिसांनी गुन्हेगारांसारखी वागणूक दिली’; NSUIचा गंभीर आरोप

अटक केलेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ सोडा, अन्यथा वर्षा बंगल्याला…; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला इशारा
2

अटक केलेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ सोडा, अन्यथा वर्षा बंगल्याला…; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला इशारा

Congress on Caste Census : जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुन्हा तापला, ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसचा भाजपाविरोधात एल्गार
3

Congress on Caste Census : जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुन्हा तापला, ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसचा भाजपाविरोधात एल्गार

Rahul Gandhi Launch Satyagrah Manch: देशभरातील सर्व आंदोलने एकाच नकाशावर! राहुल गांधींनी लाँच केला ‘सत्याग्रह’ मंच
4

Rahul Gandhi Launch Satyagrah Manch: देशभरातील सर्व आंदोलने एकाच नकाशावर! राहुल गांधींनी लाँच केला ‘सत्याग्रह’ मंच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.