Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed News : बीडमध्ये काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन! काँग्रेसची विचारधारा घराघरांत पोहोचवा, हर्षवर्धन सपकाळांचे नेत्यांना आवाहन

Beed News : काँग्रेसची संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. बीडमध्ये झालेल्या मराठवाडा विभागीय बैठकीत संघटनात्मक बांधणीसोबतच SIR प्रक्रिया आणि मतदारांच्या हक्कांबाबत चर्चा करण्यात आली.

  • By विवेक
Updated On: Nov 19, 2026 | 08:51 PM
harshwardhan sapkal at beed

harshwardhan sapkal at beed

Follow Us
Follow Us:
  • बीडमध्ये काँग्रेसची मराठवाडा विभागीय आढावा बैठक
  • काँग्रेसची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवा : हर्षवर्धन सपकाळ
  • SIR प्रक्रियेवरून काँग्रेसचा निवडणूक आयोगाला सवाल
 

Beed News : काँग्रेस पक्षाची संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने कामाला लागावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवून पक्षाची विचारधारा आणि ध्येयधोरणे सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवा, असेही त्यांनी सांगितले. बीड येथे मराठवाडा विभागातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक आढावा बैठक पार पडली.

या बैठकीला काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित होते. याशिवाय सहप्रभारी रेहाना चिस्ती, खासदार डॉ. कल्याण काळे, खासदार शिवाजी काळगे यांच्यासह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

बैठकीत पक्षाची सध्याची संघटनात्मक स्थिती, सुरू असलेले उपक्रम आणि आगामी काळातील पक्षविस्ताराचे नियोजन यावर चर्चा करण्यात आली. बूथपासून जिल्हास्तरापर्यंत संघटना अधिक सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात आला.

रायगडमधून मोठी बातमी! भाजप आमदाराला न्यायालयाचा दणका! 3 वर्षे कारावासाची शिक्षा, अलिबाग कोर्टाच्या निकालाने राजकीय वर्तुळात चर्चा

SIR प्रक्रियेवरून निवडणूक आयोगाला सवाल

दरम्यान, SIR प्रक्रियेच्या अंमलबजावणीतील अडचणी जाणून घेण्यासाठी सपकाळ आणि डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी जालना जिल्ह्यातील झिरपी येथे काँग्रेसच्या BLA-2 प्रतिनिधींशी संवाद साधला.

यावेळी प्रतिनिधींनी सरकारी BLO यांच्याकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी मांडल्या. काही पात्र मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली. SIR प्रक्रियेत एकाही पात्र मतदाराचे नाव वगळले जाऊ नये. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष असणे आवश्यक आहे, असे सपकाळ म्हणाले. प्रतिनिधींच्या अडचणींचा गांभीर्याने पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

११४ मतदारसंघांच्या आकडेवारीवरून प्रश्न

सपकाळ यांनी संध्याकाळी ५ नंतरच्या मतदानाच्या आकडेवारीचा मुद्दाही उपस्थित केला. त्यांच्या दाव्यानुसार, देशातील २०० मतदारसंघांमधील ही माहिती निवडणूक आयोगाकडे उपलब्ध नाही. त्यामध्ये महाराष्ट्रातील ११४ मतदारसंघांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण मतदानाची आकडेवारी सार्वजनिक करावी आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

मतदारांचे हक्क सुरक्षित ठेवण्यावर भर

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक कामासोबतच मतदारांच्या हक्कांबाबतही सजग राहावे, असा संदेश या बैठकीत देण्यात आला. आता मराठवाड्यात काँग्रेस संघटना अधिक सक्रिय करण्यासाठी पदाधिकारी कोणती पावले उचलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Harshwardhan Sapkal : वाढवण बंदर कायमचे रद्द करा! हर्षवर्धन सपकाळांची महायुती सरकारकडे मोठी मागणी

💡

Frequently Asked Questions

  • Que: हर्षवर्धन सपकाळ यांची बैठक कुठे पार पडली?

    Ans: काँग्रेसच्या मराठवाडा विभागातील लोकसभा, विधानसभा प्रभारी आणि जिल्हाध्यक्षांची संघटनात्मक आढावा बैठक बीड येथे पार पडली.

  • Que: बैठकीत SIR प्रक्रियेबाबत काय चर्चा झाली?

    Ans: SIR प्रक्रियेदरम्यान BLA प्रतिनिधींना येणाऱ्या अडचणी, सरकारी BLO यांच्याकडून मिळणारे सहकार्य आणि पात्र मतदारांची नावे मतदार यादीत कायम ठेवण्याबाबत चर्चा झाली.

  • Que: हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोगाकडे कोणती मागणी केली?

    Ans: संध्याकाळी ५ नंतरच्या मतदानाची संपूर्ण आकडेवारी सार्वजनिक करावी आणि संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Web Title: Beed news harshwardhan sapkal congress organisational meeting beed sir process vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 08:51 PM

Topics:  

  • Beed News
  • Congress
  • Harshwardhan Sapkal
  • Marathwada

संबंधित बातम्या

Harshwardhan Sapkal : वाढवण बंदर कायमचे रद्द करा! हर्षवर्धन सपकाळांची महायुती सरकारकडे मोठी मागणी
1

Harshwardhan Sapkal : वाढवण बंदर कायमचे रद्द करा! हर्षवर्धन सपकाळांची महायुती सरकारकडे मोठी मागणी

Sonia Gandhi Book Controversy : सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसने शिंदेसेनेला घेरलं! गोलवलकरांचं  पुस्तक फाडणार का? थेट सवाल!
2

Sonia Gandhi Book Controversy : सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसने शिंदेसेनेला घेरलं! गोलवलकरांचं पुस्तक फाडणार का? थेट सवाल!

‘हे पुस्तक जर्नी ऑफ लव्ह नाही तर लव्ह जिहाद…’; शिवसेनेकडून सोनिया गांधींच्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी
3

‘हे पुस्तक जर्नी ऑफ लव्ह नाही तर लव्ह जिहाद…’; शिवसेनेकडून सोनिया गांधींच्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी

Satej Patil : गोकुळ गाजवलं, आता गोव्याची जबाबदारी! बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठं गिफ्ट, राष्ट्रीय राजकारणात दमदार एन्ट्री?
4

Satej Patil : गोकुळ गाजवलं, आता गोव्याची जबाबदारी! बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठं गिफ्ट, राष्ट्रीय राजकारणात दमदार एन्ट्री?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.