Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुप्रिया सुळेंना डॉक्टरांचा ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला, 1-2 आठवडे भाषण-मुलाखती टाळणार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घशाला सूज आल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे. डॉक्टरांनी त्यांना पुढील एक ते दोन आठवडे पूर्णपणे व्हॉइस रेस्ट घेण्याचा आणि व्हॉइस थेरपी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्या काही काळ भाषण, मुलाखती आणि सार्वजनिक संवाद टाळणार आहेत.

  • By विवेक
Updated On: Jul 18, 2026 | 06:01 PM
Supriya Sule

Supriya Sule

Follow Us
Follow Us:
  • डॉक्टरांनी सुप्रिया सुळेंना 1-2 आठवडे पूर्ण व्हॉइस रेस्टचा सल्ला दिला
  • काही दिवस भाषण, मुलाखती आणि दीर्घकाळ बोलणे टाळणार
  • लवकर बरे होण्यासाठी व्हॉइस थेरपी घेणार असल्याची माहिती स्वतः दिली
 

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या आरोग्याबाबत महत्त्वाची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे. घशात सूज आल्याचे निदान झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील एक ते दोन आठवडे पूर्णपणे आवाजाला विश्रांती देण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्या काही काळ सार्वजनिक भाषणे, मुलाखती आणि दीर्घकाळ बोलणे टाळणार आहेत.

सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, त्यांनी डॉ. मिलिंद कीर्तने यांची भेट घेतली असता घशात सूज असल्याचे निदान झाले. उपचाराचा भाग म्हणून त्यांना ‘व्हॉइस रेस्ट’ आणि ‘व्हॉइस थेरपी’चा सल्ला देण्यात आला आहे. नागरिकांनी ही परिस्थिती समजून घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली.

‘जनाब’ ते ‘बारा बुद्धीचे साहेब’; गोपीचंद पडळकरांचे संजय राऊतांना जहरी खुले पत्र, सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

सुप्रिया सुळे यांचा ‘X’ पोस्टवरून खुलासा

आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून सुप्रिया सुळे म्हणाली, “माझ्या घशाच्या आणि आवाजाच्या समस्येबाबत मी नुकतीच डॉ. मिलिंद कीर्तने यांची भेट घेतली. त्यांनी माझ्या घशात थोडी सूज असल्याचे निदान केले असून, मला पूर्णपणे ‘व्हॉइस रेस्ट’ (आवाजाला पूर्ण विश्रांती) घेण्याचा सल्ला दिला आहे. यावर उपाय म्हणून मी ‘व्हॉइस थेरपी’ घेणार आहे आणि पुढील १-२ आठवडे भाषणे, मुलाखती व दीर्घकाळ बोलणे टाळण्याचा सल्ला मला देण्यात आला आहे. आपण ही परिस्थिती समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.”

Just met Dr. Milind Kirtane regarding my throat and voice. He has diagnosed a little swelling in my throat and has advised complete voice rest. I will be undergoing voice therapy, and have been advised to avoid speeches, interviews, and prolonged speaking for the next 1/2 weeks.… — Supriya Sule (@supriya_sule) July 18, 2026

संसदेच्या अधिवेशनापूर्वी आरोग्याची चिंता

20 जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हा आरोग्यविषयक अपडेट समोर आला आहे. काही दिवस त्या सार्वजनिक व्यासपीठांवरून बोलणार नसल्याने पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी इतर खासदारांवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

‘भरत गोगावले पालकमंत्री झाले तरी..,’, रायगडच्या पालकमंत्रीपदावर आदिती तटकरेंचं मोठं विधान

सोनम वांगचुक आंदोलनाला दिला होता पाठिंबा

अलीकडेच सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला भेट देत पाठिंबा जाहीर केला होता. तसेच या विषयावर संसदेत आवाज उठवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. आता मात्र आरोग्याच्या कारणास्तव त्या काही दिवस सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहणार असून उपचारानंतर नियमित कामकाजात सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Supriya sule voice rest throat swelling health update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 06:01 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • NCP Sharad Pawar
  • supriya sule

संबंधित बातम्या

Maharashtra MLC Election 2026: मोठी बातमी! राज्यातील ५  शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर, वाचा सविस्तर
1

Maharashtra MLC Election 2026: मोठी बातमी! राज्यातील ५ शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर, वाचा सविस्तर

Maharashtra Today’s Live News in Marathi: मान्सूनचा परतीचा प्रवास, एशियन गेम्समधील भारतीय महिला संघाची मुसंडी
2

Maharashtra Today’s Live News in Marathi: मान्सूनचा परतीचा प्रवास, एशियन गेम्समधील भारतीय महिला संघाची मुसंडी

Maharashtra Drought Declaration: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात १०० टक्के दुष्काळ जाहीर होणार
3

Maharashtra Drought Declaration: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात १०० टक्के दुष्काळ जाहीर होणार

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा
4

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.