Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा

Maharashtra Political: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत भाजप नेते जयकुमार गोरे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढेल, असे त्यांनी म्हटले. तसेच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भाजपचा झेंडा फडकविण्याचा दावा करत त्यांनी मोहिते पाटलांना ‘पावसाळ्यातील छत्री’ असा टोला लगावला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 21, 2026 | 12:32 PM
मोठी बातमी! IIT बॉम्बेच्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या 18 मागण्या मान्य; 3 तासांच्या बैठकीनंतर आरोपी प्राध्यापक निलंबित

मोठी बातमी! IIT बॉम्बेच्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या 18 मागण्या मान्य; 3 तासांच्या बैठकीनंतर आरोपी प्राध्यापक निलंबित

Follow Us
Follow Us:
  • पदवीधर-शिक्षक मतदारसंघासह सोलापूर DCC बँकेवर भाजपचा दावा
  • जयकुमार गोरेंचे मोठे वक्तव्य
  • मोहिते पाटलांना ‘पावसाळ्यातील छत्री’चा टोला
शिवाजी हळणवर / पंढरपूर : आगामी पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक महायुती म्हणूनच लढविण्याचा प्रयत्न आहे. मात्र, वेळ आली तर भाजप दोन्ही मतदारसंघात स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल, असे स्पष्ट संकेत राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलताना दिले. याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्ष व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील राजकीय हालचालींना वेग आला असतानाच गोरेंच्या या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा प्रयत्न असला तरी परिस्थिती निर्माण झाल्यास भाजप स्वतंत्रपणे दोन्ही जागांवर मैदानात उतरण्याची तयारी ठेवत असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले. मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. भाजपकडून महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविली जाईलच; परंतु वेळ आली तर पक्ष स्वतंत्रपणेही लढेल. मी जिल्ह्याचा पालकमंत्री असून पक्षाचा एक कार्यकर्ता आहे, अशी भूमिका गोरे यांनी यावेळी मांडली.

Exclusive: काशिमीरात मेट्रो ब्रिजखाली थरार! तरुणाच्या अंगावर कोसळला सिमेंटचा ब्लॉक; घटनेचा थरारक CCTV व्हिडिओ ‘नवराष्ट्र’च्या हाती

‘पावसाळा आला की छत्र्या उगवतात’; मोहिते पाटलांना टोला

दरम्यान, सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा सक्रिय झालेल्या रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या गाठीभेटींबाबत विचारले असता जयकुमार गोरे यांनी मिश्कील टिप्पणी केली. ‘पावसाळा आला की छत्र्या येतात आणि उगवतात,’ असे म्हणत त्यांनी मोहिते पाटील यांच्या राजकीय सक्रियतेवर टोला लगावला.

मोहिते पाटील यांच्या जुन्या सहकाऱ्यांच्या भेटीगाठी आणि जिल्ह्यातील वाढलेल्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर गोरेंच्या या वक्तव्याची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. आगामी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही विविध राजकीय गटांकडून मोर्चेबांधणी सुरू असल्याचे चित्र आहे.

‘डीसीसी’वर भाजपचा झेंडा फडकविण्याचा निर्धार

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीबाबतही गोरे यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली. जिल्ह्यातील मातब्बर नेते एकत्र बसून बँकेच्या निवडणुकीबाबत योग्य निर्णय घेतील. आवश्यकता भासल्यास समविचारी नेत्यांना आणि घटकांनाही सोबत घेतले जाईल; मात्र जिल्हा बँकेवर भाजपचा झेंडा फडकविण्याचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले.

डीसीसी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मित्रपक्षांमधील प्रमुख नेत्यांच्या बैठकांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत कोणकोणते राजकीय गट एकत्र येतात आणि कोणती नवी समीकरणे आकार घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

एकीकडे पुणे शिक्षक-पदवीधर मतदारसंघात वेळ पडल्यास स्वतंत्र लढण्याचे संकेत, तर दुसरीकडे सोलापूर जिल्हा बँकेवर भाजपचा झेंडा फडकविण्याचा निर्धार आणि मोहिते पाटलांच्या सक्रियतेवर केलेली टिप्पणी, यामुळे जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने सोलापूरच्या राजकारणात चर्चेला चांगलीच रंगत आली आहे.

Mira Bhayandar Schools: चार महिने उलटले, तरी विद्यार्थ्यांच्या हातात पाण्याची बाटली नाही! महापालिका शाळांचा ढिसाळ कारभार

Web Title: Jaykumar gore bjp contest graduate teacher constituencies solapur dcc bank mohite patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 12:31 PM

Topics:  

  • BJP
  • Jaykumar Gore
  • maharashtra
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर
1

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या हालचाली वाढल्या; भाजप करणार घटक पक्षांशी चर्चा,  सम्राट महाडिक यांच्यावर समन्वयाची जबाबदारी
2

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या हालचाली वाढल्या; भाजप करणार घटक पक्षांशी चर्चा, सम्राट महाडिक यांच्यावर समन्वयाची जबाबदारी

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
3

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
4

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.