Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरण काय म्हणताय? हा पोलिसांच्या नाकर्तेपणा अधोरेखित…”; महिला नेत्यांकडून वाल्मिक कराड सरेंडरवर संशय व्यक्त

वाल्मिक कराड याचे सरेंडरवर महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर त्यांनी संशय घेतला असून हे सर्व पोलिसांना माहित असल्याचा गंभीर आरोप देखील केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 31, 2024 | 03:45 PM
Sushma andhare and supriya sule on Walmik Karad surrender

Sushma andhare and supriya sule on Walmik Karad surrender

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपरहण करुन निर्घुणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये 20 दिवसांनंतर मास्टरमाईंड वाल्मिक कराड याने आत्मसमर्पण केले आहे. पुण्यातील पाषाण रोडवरील सीआयडी ऑफिसमध्ये येऊन वाल्मिक कराड याने अचानकपणे सरेंडर केले. त्यापूर्वी त्याने व्हिडिओ देखील जारी केला असून यामध्ये हत्येचे आरोप फेटाळण्यात आले आहे. वाल्मिक कराड याचे सरेंडरवर महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून रोष व्यक्त केले आहे.

पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये वाल्मिक कराड हा समर्पण करणार असल्यामुळे सकाळपासून बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली होती. वाल्मिक कराड हा दोन नगरसेवकांसह सीआयडी ऑफिसमध्ये स्वतःहून गाडीमध्ये आला. आणि सीआयडी ऑफिसरने त्याला ताब्यात घेतले. मात्र हे आत्मसमर्पण पूर्णपणे ठरवून केले असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. त्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

वाल्मिक कराडच्या आत्मसमर्पणावर शरद पवार गटाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “परभणी आणि बीड या दोन्ही घटना महाराष्ट्राच्या सुसंस्कृत समाजाला काळिमा फासणाऱ्या आहेत. या कुटुंबांना न्याय देण्याची नैतिक जबाबदारी सरकारचीही आहे आणि आम्हीही ती घेतली आहे. मला शरण वगैरे शब्द योग्य वाटत नाही. अटक झाली असती तर मनाला थोडंसं समाधान वाटलं असतं. माझी अपेक्षा होती की सरकारनं त्यांना अटक करायला हवी होती. शरण काय म्हणताय? एका माणसाची हत्या झाली आहे. संतोष देशमुख यांच्या लेकीचे अश्रू आयुष्यात कुणीच विसरणार नाही” अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “पोलीस यंत्रणा त्यांना शोधतच होती. एक माणूस व्हिडीओ व्हायरल करतो. पण तो आपल्याला सापडत नाही. हे फार धक्कादायक आणि वेदना देणारं आहे. माझा महाराष्ट्रातल्या पोलिसांवर प्रचंड विश्वास आहे. एखाद्या व्यक्तीची हिंमत कशी होऊ शकते? ज्याच्याबद्दल गेल्या अनेक आठवड्यांपासून सगळीकडे एवढा रोष आहे, तो एक व्हिडीओ काढतो. तो पोस्ट करतो आणि तरी त्याला अटक होत नाही. यावर गृहमंत्रालयाचं काय निवेदन येतं याची वाट बघूयात. पोलिसांना कसं कळलं नाही की हे कुठे होते? असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वाल्मिक कराडच्या आत्मसमर्पणावर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील संशय व्यक्त करुन आक्रमक पवित्रा घेतला आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की, “शरण येणं किंवा आत्मसमर्पण करणे हा शब्दप्रयोग प्रसारमाध्यमे वापरत आहेत. या कृतीला आत्मसमर्पण हा शब्दप्रयोग होत असेल तर हा पोलिसांच्या नाकर्तेपणा अधोरेखित करणार आहे. कारण ज्या प्रकरणाने अधिवेशन गाजवलं होतं, असंख्य आमदारांनी यावर भाष्य केलं होतं. सत्ताधारी पक्षातील  नेत्यांनी ही त्यावर भाष्य केलं. तसेच लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले. त्यानंतर चौकशी संदर्भात उपायोजना केल्याचं सांगण्यात आले.  त्या घटनेचा कुणालाही माघमुस लागला नाही. मात्र शरण येणार आहेत याचे मेसेज सर्वत्र प्रसारित झाले. म्हणजे पोलीस सोडून सर्वांना सगळं काही माहिती होतं,” असा संशय सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Sushma andhare and supriya sule on walmik karad surrender to pune cid office pashan raod beed santosh deshmukh murder

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2024 | 03:45 PM

Topics:  

  • MP Supriya Sule
  • Santosh Deshmukh Murder
  • Walmik Karad

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.