Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुषमा अंधारे-जयकुमार गोरे वाद चिघळला; ‘कॉप्या करून पास झालेले मंत्री असावेत’, अंधारेंचा बोचरा टोला

जयकुमार गोरे यांच्या टीकेनंतर सुषमा अंधारे यांनी सोशल मीडिया पोस्टमधून जोरदार प्रत्युत्तर दिले. गोरेंच्या भाषेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी ‘ज्येष्ठ भगिनी’ उल्लेखावरूनही बोचरा सवाल केला.

  • By विवेक
Updated On: Aug 16, 2026 | 09:50 PM
सुषमा अंधारे-जयकुमार गोरे वाद चिघळला; ‘कॉप्या करून पास झालेले मंत्री असावेत’, अंधारेंचा बोचरा टोला

सुषमा अंधारे-जयकुमार गोरे वाद चिघळला; ‘कॉप्या करून पास झालेले मंत्री असावेत’, अंधारेंचा बोचरा टोला

Follow Us
Follow Us:
  • सुषमा अंधारे आणि जयकुमार गोरे यांच्यातील शाब्दिक संघर्ष अधिक तीव्र झाला.
  • अंधारेंनी गोरेंना ‘कॉप्या करून पास झालेले मंत्री’ असा टोला लगावला.
  • ‘मोठ्या किंवा छोट्या बहिणीशी याच भाषेत बोलता का?’ असा अंधारेंचा सवाल.
 

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि भाजप नेते तथा मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील राजकीय वाद आता अधिक चिघळताना दिसत आहे. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जात असून, सोशल मीडिया आणि पत्रकार परिषदांच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

या वादाला सुरुवात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर झाली. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत गोरेंवर गंभीर आरोप केले. गोरेंनीही त्याला प्रत्युत्तर देताना अंधारेंचा उल्लेख ‘ज्येष्ठ भगिनी’ असा केला होता. आता गोरेंच्या या भूमिकेला सुषमा अंधारे यांनी सोशल मीडिया पोस्टमधून जशास तसे उत्तर दिले आहे.

‘कॉप्या करून पास झालेले मंत्री असावेत’

सुषमा अंधारे यांनी जयकुमार गोरे यांच्या वक्तव्यावर टीका करत त्यांच्या ज्ञान आणि संस्कारांवरही प्रश्न उपस्थित केला. जयकुमार गोरे हे निश्चितपणे ‘कॉप्या करून पास झालेले मंत्री असावेत’, असा टोला त्यांनी लगावला. त्यांच्या संस्कारांबाबतही शंका असल्याचे अंधारे यांनी म्हटले.

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

आपल्या पोस्टमध्ये अंधारे यांनी पत्रकार परिषदेत गोरेंच्या वर्तनावरही निशाणा साधला. पत्रकार परिषद घेताना थोडे संयमाने वागावे आणि एखाद्या व्यक्तीच्या पत्रकार परिषदेवर उत्तर देण्यापूर्वी ती पूर्णपणे ऐकावी, असा सल्ला त्यांनी दिला.

‘माझा उल्लेख ज्येष्ठ भगिनी असा केला, मग अशी भाषा का?’

आपल्या पत्रकार परिषदेत आपण वापरलेल्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचा दावा अंधारे यांनी केला. गोरेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी म्हटले की, त्यांच्या पत्रकार परिषदेत संबंधित आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जयकुमार गोरे हे निश्चितपणे कॉप्या करून पास झालेले मंत्री असावेत. आणि संस्कार असतील की नाही याबद्दल तर शंकाच आहे…
जयकुमार, पत्रकार परिषद घेत असताना थोडी कमी पीत चला… आणि हो एखाद्याच्या पत्रकार परिषदेचे उत्तर द्यायचं असेल तर आधी त्याने घेतलेली पत्रकार परिषद पूर्ण बघत…
— SushmaTai Andhare (@andharesushama) August 15, 2026

याशिवाय गोरेंच्या आजूबाजूच्या व्यक्तींनी त्यांना चुकीची माहिती दिल्याचा आरोपही अंधारेंनी केला. भाजपच्या मंत्र्याकडून अशा भाषेची फार वेगळी अपेक्षा करता येणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

या वादातील सर्वात बोचरा सवाल करताना अंधारे म्हणाल्या की, जयकुमार गोरे यांनी आधी आपला उल्लेख ‘ज्येष्ठ भगिनी’ असा केला होता. त्यानंतर मात्र टीका करताना वापरलेल्या भाषेवरून त्यांनी प्रश्न उपस्थित केला. ‘तुम्ही तुमच्या मोठ्या किंवा छोट्या बहिणीशी याच भाषेत बोलता का?’ असा सवाल त्यांनी केला.

जातनिहाय जनगणनेवरून छगन भुजबळ – हरिभाऊ राठोड आमनेसामने; 2011 च्या जनगणनेवरून ओबीसी नेत्यांमध्ये जुंपली

आता गोरेंच्या उत्तराकडे लक्ष

सुषमा अंधारे यांच्या या टीकेनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. संजय राऊत यांच्या टीकेपासून सुरू झालेला हा वाद आता अंधारे आणि गोरे यांच्यातील थेट शाब्दिक संघर्षात बदलला आहे. अंधारेंच्या ताज्या टीकेला जयकुमार गोरे काय उत्तर देतात आणि हा वाद आणखी किती तीव्र होतो, याकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Sushma andhare jaykumar gore controversy political war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 09:50 PM

Topics:  

  • Jaykumar Gore
  • sushma andhare

संबंधित बातम्या

Satara Jaykumar Gore : सातारा जिल्हा बँकेत बेकायदेशीर निर्णय?; मंत्री जयकुमार गोरेंचे गंभीर आरोप
1

Satara Jaykumar Gore : सातारा जिल्हा बँकेत बेकायदेशीर निर्णय?; मंत्री जयकुमार गोरेंचे गंभीर आरोप

महायुतीत पुन्हा खदखद? ‘आम्ही बंडखोरीचे बादशाह’ म्हणत उमेदवारीसाठी ‘बंडखोरी’चा इशारा
2

महायुतीत पुन्हा खदखद? ‘आम्ही बंडखोरीचे बादशाह’ म्हणत उमेदवारीसाठी ‘बंडखोरी’चा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.