Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महायुतीत पुन्हा खदखद? ‘आम्ही बंडखोरीचे बादशाह’ म्हणत उमेदवारीसाठी ‘बंडखोरी’चा इशारा

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगेश चिवटेंच्या उमेदवारीचा मुद्दा चर्चेत आला आहे. बच्चू कडूंनी चिवटेंना पाठिंबा देताना गरज पडल्यास बंडखोरीचा सूचक इशारा दिला आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 26, 2026 | 09:33 PM
Bachchu Kadu with Eknath shinde

Bachchu Kadu with Eknath shinde

Follow Us
Follow Us:
  • मंगेश चिवटे पुणे शिक्षक मतदारसंघातून इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे.
  • बच्चू कडूंनी चिवटेंच्या उमेदवारीला पाठिंबा देत बंडखोरीचा सूचक इशारा दिला.
  • पुणे विभागातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. 
 

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून पुणे विभागातील दोन्ही मतदारसंघांवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघातून मंगेश चिवटे हे उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचेही या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. दुसरीकडे भाजपकडूनही पुणे विभागातील मतदारसंघांवर दावा केला जात असल्याने महायुतीमध्ये उमेदवारीचा प्रश्न चर्चेत आला आहे.

महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात असतानाच, भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी वेळ पडल्यास भाजपच्या चिन्हावर दोन्ही मतदारसंघांत निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे जागावाटपावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये मतभेद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Ramdas Aathvale : निवडणूक आयोग स्वतंत्र संस्था, एसआयआर वादावर रामदास आठवले थेटच बोलले

मंगेश चिवटेंच्या उमेदवारीसाठी बच्चू कडू आक्रमक

दरम्यान, या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी मंगेश चिवटे यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत सूचक विधान केले आहे. अमरावतीतील आरोग्य शिबिरात बोलताना त्यांनी चिवटेंनी रुग्णसेवेत दाखवलेल्या कामाचा उल्लेख केला.

“मंगेश चिवटे यांनी रुग्णसेवेमध्ये जो चिवटपणा दाखवला, त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये ते आमदार झाल्याशिवाय राहणार नाहीत,” असे बच्चू कडू म्हणाल्याचे सांगितले जात आहे.

तसेच मंगेश चिवटेंना पाठिंबा दिला गेला नाही आणि बंडखोरी करण्याची वेळ आली, तर “आम्ही बंडखोरीचे बादशाह आहोत,” असा सूचक इशाराही त्यांनी दिला. चांगल्या व्यक्तीच्या मागे आपण उभे राहतो आणि नेत्यांचा विरोध असला तरी त्याची पर्वा करत नाही, असेही कडू यांनी म्हटले.

महायुतीत उमेदवारीचा तिढा?

पुणे विभागातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी महायुतीतील घटक पक्षांकडून उमेदवारांबाबत चर्चा सुरू आहे. निवडणूक आयोगाने पुणे पदवीधर, पुणे शिक्षक यांच्यासह महाराष्ट्रातील पाच विधान परिषद मतदारसंघांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. २३ ऑक्टोबरला मतदान, तर २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी कोणाला मिळणार आणि महायुतीतील घटक पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवणार की स्वतंत्र भूमिका घेणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरे-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र! 4 ऑक्टोबरला मुंबईत मोठा जनमोर्चा; SIR विरोधात रणशिंग

Web Title: Pune teacher constituency mangesh chivate bachchu kadu mahayuti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 09:33 PM

Topics:  

  • Bachchu Kadu
  • Jaykumar Gore
  • shivsena

संबंधित बातम्या

Shambhuraj Desai : ‘अघोरी बाबा कुठे मिळतो?’ शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना खोचक टोला; साताऱ्यात राजकारण तापलं!
1

Shambhuraj Desai : ‘अघोरी बाबा कुठे मिळतो?’ शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना खोचक टोला; साताऱ्यात राजकारण तापलं!

Maharashtra Politics : ‘शिवसेनेत या, मंत्रीपदही देतो,’ शिंदे गटाच्या मंत्र्याची शरद पवारांच्या आमदाराला थेट ऑफर
2

Maharashtra Politics : ‘शिवसेनेत या, मंत्रीपदही देतो,’ शिंदे गटाच्या मंत्र्याची शरद पवारांच्या आमदाराला थेट ऑफर

Satara DCC Bank Election : ‘वरिष्ठांच्या सूचना देऊनही वेगळा निर्णय घेतला’; शिवेंद्रराजेंचा राष्ट्रवादी-शिवसेनेबाबत मोठा खुलासा!
3

Satara DCC Bank Election : ‘वरिष्ठांच्या सूचना देऊनही वेगळा निर्णय घेतला’; शिवेंद्रराजेंचा राष्ट्रवादी-शिवसेनेबाबत मोठा खुलासा!

Mumbai Bank Election : शिंदे गटाचा निर्णय ठरला! स्वबळावर लढणार की महायुतीसोबत? पुरंदर बंगल्यावर राजकीय खलबतं!
4

Mumbai Bank Election : शिंदे गटाचा निर्णय ठरला! स्वबळावर लढणार की महायुतीसोबत? पुरंदर बंगल्यावर राजकीय खलबतं!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.