Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील निकाल धक्कादायक; उच्च न्यायालयात अपील करणार – तानाजी जाधवर

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील निकाल धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया तानाजी जाधवर यांनी दिली. न्यायासाठी उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • By विवेक
Updated On: Jun 20, 2026 | 04:39 PM
पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील निकाल धक्कादायक; उच्च न्यायालयात अपील करणार – तानाजी जाधवर

पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील निकाल धक्कादायक; उच्च न्यायालयात अपील करणार – तानाजी जाधवर

Follow Us
Follow Us:

धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने सर्व नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर विविध स्तरांवर प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी न्यायालयाच्या निकालाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत हा निर्णय धक्कादायक असल्याचे म्हटले आहे.

तानाजी जाधवर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले की, न्यायालयाने दिलेला निकाल स्वीकारणे कायद्याच्या चौकटीत आवश्यक असले तरी या निर्णयाशी सहमत होता येणार नाही. तब्बल दोन दशकांहून अधिक काळ चाललेल्या या बहुचर्चित खटल्यात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याने पवनराजे निंबाळकर यांच्या समर्थकांमध्ये निराशा आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे.

“कोर्टाचा निकाल अत्यंत दुर्दैवी”

“कोर्टाने जो निकाल दिला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे. न्यायालयाचा निर्णय प्रत्येकाला मान्य करावाच लागतो आणि आम्हीही तो स्वीकारत आहोत. मात्र न्याय मिळविण्याची लढाई येथे संपलेली नाही. या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्यात येणार असून न्यायालयासमोर सर्व बाबी प्रभावीपणे मांडल्या जातील,” असे जाधवर यांनी स्पष्ट केले.

निकाल लागताच ओमराजे निंबाळकर यांचं मोठं वक्तव्य, ‘पोलीस, सीआयडीवर प्रचंड दबाव..,’

“न्यायासाठी शेवटपर्यंत संघर्ष”

ते पुढे म्हणाले की, पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण हे केवळ एका व्यक्तीच्या हत्येपुरते मर्यादित नसून त्याच्याशी अनेकांच्या भावना आणि न्यायाची अपेक्षा जोडलेली आहे. त्यामुळे या प्रकरणात सत्य बाहेर यावे आणि न्याय मिळावा यासाठी शेवटपर्यंत संघर्ष सुरू राहील.

मुंबई सत्र न्यायालयाच्या निकालानंतर जिल्ह्यात आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली असून पुढील काळात उच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या अपिलाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना (उबाठा) पक्षानेही न्यायालयीन लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील निकालानंतर समर्थकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत असून न्याय मिळविण्यासाठी कायदेशीर पर्यायांचा अवलंब करण्याची मागणी जोर धरत आहे.

‘शिंदे गटात जाण्याबाबत निर्णय..,’ कोर्टाच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकर घेणार मोठा निर्णय

Web Title: Tanaji jadhavar reacts on pawanraje nimbalkar murder case verdict high court appeal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Dharashiv News
  • Mp Omraje Nimbalkar

संबंधित बातम्या

Dharashiv News: १५ कृषी अधिकारी निलंबित; धाराशिवच्या निविष्ठा घोटाळ्यात मोठी कारवाई, आता गुन्हे दाखल होणार का?
1

Dharashiv News: १५ कृषी अधिकारी निलंबित; धाराशिवच्या निविष्ठा घोटाळ्यात मोठी कारवाई, आता गुन्हे दाखल होणार का?

Dharashiv News: महायुतीतच तुफान राडा! तानाजी सावंत-राहुल मोटे समर्थक आमनेसामने; दगडफेकीत 12 गाड्यांची तोडफोड
2

Dharashiv News: महायुतीतच तुफान राडा! तानाजी सावंत-राहुल मोटे समर्थक आमनेसामने; दगडफेकीत 12 गाड्यांची तोडफोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.