
Thackeray group Bhaskar Jadhav meets Shinde group Minister Pratap Sarnaik at Hotel Nagpur
मीडिया रिपोर्टनुसार, शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेत्यांची भेट घेतली आहे. भास्कर जाधव यांना शिवसेना ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेते पद देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात सभागृहातील जागा रिक्त राहिल्या आहेत. मागील एक वर्षापासून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद रिकामे राहिले आहे. यावरुन भास्कर जाधव हे शिवसेनेमध्ये नाराज असल्याचे बोलले जात आहे.
हे देखील वाचा : विरोधकांना उरला नाही आवाज? इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही
ठाकरे गटाचे भास्कर जाधव आणि शिंदे गटाचे प्रताप सरनाईक यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नाशिकच्या एका हॉटेलमध्ये या दोन्ही नेत्यांची भेट झाली. हॉटेलच्या लॉबीत बोलत असतानाचा या दोघांचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे उरलेसुरले शिलेदार गळाला लावण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा सुरु केल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे ठाकरे गटामध्ये उरले सुरले नेते देखील सुरक्षित नसल्याचे बोलले जात आहे.
हे देखील वाचा : नाशिकच्या तपोवनासाठी सयाजी शिंदेंनी गाठली मुंबई; मनसे नेते राज ठाकरेंची घेतली भेट
या भेटीचा फोटो समोर आल्यानंतर राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रताप सरनाईक म्हणाले की, नगरविकास राज्यमंत्री असताना मी भास्कर जाधव यांच्याकडे माझी कामं घेऊन जायचो. आमदार हा मंत्र्यांकडे जात असतो. मंत्री कुठल्या पक्षाचा आहे, हे आमदार बघत नसतो. भास्कर जाधवांच्या विधानसभा मतदारसंघात एसटी बससंदर्भात काही अडचणी आहेत. त्यांच्या भागात एसटी बस सुरु करायची आहे. एसटी महामंडळातंर्गत त्यांना माझ्याकूडन काही मदत हवी असेल तर मी मदत करेन. त्याचा ऑपरेशन टायगरशी संबंध नाही. ऑपरेशन टायगर हे सुरु आहे. मात्र, आमची भेट त्यासाठी नव्हती, असे सूचक विधान प्रताप सरनाईक यांनी केले.