नाशिकच्या तपोवन वृक्षतोडीच्या संदर्भात सयाजी शिंदे यांनी मनसे नेते राज ठाकरेंची भेट घेतली (फोटो सौजन्य - एक्स)
राज्य सरकारकडून साधूग्राम उभारण्यासाठी हजारो झाडे कापली जाणार आहेत. भलीमोठी ही झाडे कापल्याने जैवविविधता, प्राणी आणि पक्षांचे मोठे नुकसान होणार आहे. याविरोधात सह्याद्री देवराई संघटनेचे सर्वेसर्वा सयाजी शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली. सयाजी शिंदे यांनी सरकारवर टीका करत मोठे जनआंदोलन उभे केले. याच पार्श्वभूमीवर आता सयाजी शिंदे हे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. सयाजी शिंदे हे सोमवारी (दि. 08) सकाळी मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्यासोबत राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी आले.
हे देखील वाचा : विरोधकांना उरला नाही आवाज? इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही
नाशिकमध्ये मनसेनेही वृक्षतोडीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता वृक्षतोडीच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे आणि सयाजी शिंदे एकत्र येऊन तपोवनातील लढा आणखी तीव्र करणार असल्याचे चित्र आहे. सयाजी शिंदे यांनी नाशिकच्या वृक्षतोडीविरोधात आवाज उठवला. मनसे नेते राज ठाकरे यांच्या साथीमुळे सयाजी शिंदे यांच्या आंदोलनाला बळकटी येणार आहे.
नाशिकमधील “तपोवन वाचवा” मोहिमेला वेग मिळला असून आज प्रसिद्ध अभिनेते श्री. सयाजी शिंदे यांनी मा. राजसाहेब ठाकरे यांची विशेष भेट घेतली. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष श्री. अमेय खोपकर देखील यावेळी उपस्थित होते.
बैठकीत तपोवनचे जतन, परिसरातील जैवविविधतेचे रक्षण आणि… pic.twitter.com/0diLpHEnjk — MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) December 8, 2025
हे देखील वाचा : विरोधकांचा चहापानवर बहिष्कार! विजय वडेट्टीवारांनी थेट वाचली रखडलेल्या प्रकल्पांची यादी
नाशिकच्या वृक्षतोडीविरोधात सयाजी शिंदे म्हणाले की, राजकारणाबदल माझा अभ्यास नाही, पण झाडाबद्दल राजकारण करू नका. अजितदादांनी पाठिंबा दिला तसा भाजपच्याही काही लोकांनी पाठिंबा दिला आहे. 50 फूटी झाडं तोडायची आणि त्या बदल्यात नवी झाडं लावायची.. एवढी मोठी पळवाट शोधू नका. चुकीचा निर्णय होता कामा नये. सगळी झाडे जगली पाहिजेत. झाडांचा आधी विचार नंतर माणसांचा विचार केला पाहिजे. साधू आले-गेले काही फरक पडत नाही, पण झाडं गेली तर फरक पडतो, अशी आक्रमक भूमिका सयाजी शिंदे यांनी घेतली आहे.






