
शिवसेना राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष; 'उबाठा'ला जनतेने जागा दाखवली! (Photo Credit- X)
रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत महायुतीचा विजयी झंझावात. रत्नागिरी नगरपरिषदेच्या 32 जागापैकी 23 जागांवर शिवसेना आणि 6 जागांवर भाजपचे नगरसेवक विजयी होण्यासह शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे यांनी विजयी मोहोर उमटवली आहे. शहरातून काढण्यात आलेल्या विजय रॅलीत विजयी… pic.twitter.com/VFfB1g2mN2 — Uday Samant (@samant_uday) December 21, 2025
शिवसेनेला निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बाळासाहेब भवन येथे जल्लोष केला. मंत्री सामंत म्हणाले की, शिवसेनेचे ५५ नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. मात्र पुढील दोन दिवसांत सुमारे ७० ते ७२ ठिकाणी शिवसेनेचा नगराध्यक्ष होईल. शिवसेनेचे ८७५ सदस्य निवडून आले. शिवसेनेच्या पदरात महाराष्ट्राच्या जनतेने मोठं यश टाकले आहे. निवडणुकीत वेगवेगळे लढलो असलो तरी मतदारांनी महायुतीच्या बाजूने कौल दिला. त्याबद्दल नागरी भागांमधील मतदारांचे मंत्री सामंत यांनी आभार मानले.
एकनाथ शिंदे सरस ठरले
उबाठा २८८ ठिकाणी लढले मात्र जेमतेम ७ ते ८ ठिकाणी त्यांचा निसटता विजय झाला. तिथं महायुतीने व्यवस्थित लक्ष घातलं असते तर हा आकडा ५ वर गेला नसता, असे मंत्री सामंत म्हणाले. पूर्वी शिवसेना वरच्या क्रमांकावर असायची आता उबाठाची कामगिरी खालच्या क्रमांकावरुन सुरु होते, अशी टीका मंत्री सामंत यांनी केली. मुख्यमंत्री असताना नगर परिषदांसाठी केलेलं काम, लाडक्या बहिणींची योजना यामुळे एकनाथ शिंदे सरस ठरले. त्यामुळे आजचे यश हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारे आहे, असे मंत्री म्हणाले. आजच्या निकालांनी महापालिका निकालांची नांदी असून सर्व २९ महापालिकांमध्ये महायुतीचे महापौर बनतील, असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.