
महापौर पदासाठी हालचालींना वेग; पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपमधील अंतर्गत राजकारण तापले
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निडणुकीत भाजपने पुन्हा एकदा बिनविरोधाची प्रक्रिया सुरू केली आहे. खारेपाटण जिल्हा परिषदेच्या उमेदवार प्राची इस्वालकर यांची पहिली बिनविरोध निवड झाली आहे. कारेपाटन जिल्हा परिषदेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे समोर आले आहे. याशिवाय भाजपचा दुसराही उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती आहे. बांदा जिल्हा परिषद्तील भाजपचे उमेदवार आणि माजी सभापती प्रमोद कामत हेदेखील बिनविरोध निवडून आले आहेत. जिल्हा परिषदेच्या गटातील अपक्ष उमेदवार सुशांत पांगम यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने प्रमोद सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्यामुळे भाजपने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून २ उमेदवार विजयी करत इथेही विजयाचे खाते उघडले आहे.
राज्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी असून, त्याच दिवशी निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यास भाग पाडून भाजपकडून जिल्हा परिषदेतही ‘बिनविरोध’चा पॅटर्न राबवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.
Vikram Bhatt Fraud News: विक्रम भट्ट आणि त्यांच्या मुलीवर फसवणुकीचा आरोप, पोलिस तक्रार दाखल;
निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी आपापले बालेकिल्ले राखण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. २७ जानेवारीपर्यंत उमेदवारांची मनधरणी करणे, अर्ज मागे घ्यायला लावणे किंवा युती-आघाडीची गणिते जुळवणे यामध्ये नेते व्यस्त आहेत. भाजपने अनेक ठिकाणी ‘बिनविरोध’ निवडीवर भर दिला असला तरी, महाविकास आघाडी आणि इतर स्थानिक आघाड्यांनी त्यांना कडवे आव्हान देण्याची तयारी केली आहे.