Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kokan Road News: फोंडाघाट: ‘ब्लॅक स्पॉट’ की पर्यटन केंद्र?

वाहतुकीचा ताण रस्ता खराब असल्यामुळे प्रवासी आता गगनबावडा (करूळ घाट) किंवा आंबोली मार्गाचा अवलंब करत आहेत. परिणामी करूळ घाटावर वाहतुकीचा प्रचंड ताण वाढला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 06, 2026 | 04:50 PM
Kokan Road News: फोंडाघाट: ‘ब्लॅक स्पॉट’ की पर्यटन केंद्र?
Follow Us
Close
Follow Us:

निसर्गाचे वरदान लाभलेला परिसर विकासाच्या प्रतीक्षेत
फोंडाघाट : ‘ब्लॅक स्पॉट’ की पर्यटन केंद्र ?
रस्त्याची दुरवस्था आणि निधीचा ‘दुष्काळ’

फोंडाघाट:  सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार, निसर्गाचा अनमोल खजिना आणि ऐतिहासिक व्यापारपेठेचा वारसा लाभलेला ‘फोंडाघाट’ आज एका वळणावर उभा आहे. सह्याद्रीच्या कुशीत २००० फूट उंचीवर वसलेला हा घाट केवळ रस्ता नसून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. पण दुर्दैवाने, हा दुवा सध्या खिळखिळा झाला आहे. पावसाळ्यात धबधबे आणि दाट धुक्याने नटलेला हा परिसर राधानगरी वन्यजीव अभयारण्याचा भाग आहे. दाजीपूर अभयारण्यातून खाली उतरताना मिळणारा आनंद अवर्णनीय असतो. मात्र, याच निसर्गाच्या कुशीत दरडी कोसळणे आणि भू-स्खलनाच्या घटना प्रवाशांच्या पाचवीला पुजलेल्या आहेत.

एकेकाळी पुणे, सोलापूर, साताऱ्याहून गोव्याकडे जाण्यासाठी फोंडाघाट हा सर्वात जवळचा आणि सोयीचा मार्ग मानला जात असे. मात्र, आज चित्र उलटे आहे. निधीचा अभाव गेल्या दोन वर्षात या मार्गाच्या नूतनीकरणासाठी सार्वजनिक बांधकामा विभागाकडे स्वतंत्र निधीच आलेला नाही. डागडुजीवर मलमपट्टी जिल्हा नियोजन मंडळाच्या तोकड्या निधीतून केवळ खड्डे भरण्याचे काम होत आहे, जे पहिल्या पावसात ताइन जाते.

वाहतुकीचा ताण रस्ता खराब असल्यामुळे प्रवासी आता गगनबावडा (करूळ घाट) किंवा आंबोली मार्गाचा अवलंब करत आहेत. परिणामी करूळ घाटावर वाहतुकीचा प्रचंड ताण वाढला असून तिथेही सुरक्षेचे प्रश्न निर्माण होत आहेत. खाऊच्या पानांची बाजारपेठ संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात खाऊच्या पानांचा सर्वात मोठा व्यापार याच ठिकाणी होतो.

हृदयद्रावक! ट्रक-कारच्या धडकेत 18 वर्षीय तरुणीचा अपघाती मृत्यू

ऐतिहासिक उलाढाल सुपारी, नारळ, साखर आणि किराणा मालाची ही होलसेल बाजारपेठ आजही पुनरुज्जीवनाची वाट पाहत आहे. आपल्या येथे कोट्यवधींची उलाढाल व्हायची, पण रस्ते खराब झाल्याने आणि रोजगाराच्या संधी कमी झाल्याने हे वैभव कमी होत चालले आहे. फोंडाघाट रस्त्यासाठी शासनाने स्वतंत्र आणि भरीव निधी मंजूर करावा. रस्ता केवळ डागडुजी न करता त्याचे कायमस्वरूपी
नूतनीकरण करावे. होलसेल हबचे पुनरुज्जीवनः ब्रिटीशकालीन बाजारपेठेला आधुनिक रूप देऊन अॅग्रो दुरिझम’ ‘मसाले पदार्थांचे मार्केटिंग केंद्र’ विकसित करावे.

Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक अपघात चालक ठार

18 वर्षीय तरुणीचा अपघाती मृत्यू

खारेपाटण मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर नडगिवे धुरीभाटलेवाड़ी बसस्टॉपजवळ मंगळवारी कार व ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. यात खारेपाटण जिजामातानगर येथील तनिषा पुरुषोत्तम शेट्ये (वय १८) हिचा जागीच मृत्यू झाला. तर तिचा भाऊ ऋतुपर्ण पुरुषोत्तम शेट्ये (वय २३) हा गंभीर जखमी झाला आहे. होळी आणि शिमग्याच्या सणादिवशीच घडलेल्या या दुर्घटनेमुळे खारेपाटण परिसरात शोककळा पसरली आहे.

Web Title: Bad condition to fonda ghat connect western maharashtra and konkan sindhudurga news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 04:44 PM

Topics:  

  • Road Work
  • Sindhudurg
  • Sindhudurg News

संबंधित बातम्या

Nitesh Rane :  नितेश राणेंना मोठा धक्का ; अभियंत्यावर चिखलफेक प्रकरणी एक महिन्याचा कारावास, मात्र…
1

Nitesh Rane : नितेश राणेंना मोठा धक्का ; अभियंत्यावर चिखलफेक प्रकरणी एक महिन्याचा कारावास, मात्र…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.