Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: चारित्र्यावर संशय, हुंड्यासाठी छळ अन् पतीचे अनैतिक संबंध; विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

नागपूरच्या पारडी परिसरात चारित्र्यावर संशय, हुंड्याची मागणी आणि सातत्याने होणाऱ्या मानसिक-शारीरिक छळाला कंटाळून 31 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत महिलेच्या भावाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पतीला अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 19, 2026 | 10:38 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • चारित्र्यावर संशय आणि हुंड्यासाठी होत असलेल्या छळामुळे विवाहितेने आत्महत्या केल्याचा आरोप.
  • मृत महिलेच्या भावाच्या तक्रारीनंतर पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल.
  • आरोपी पतीला अटक करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास पारडी पोलीस करत आहेत.
नागपूर: नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पारडी परिसरातून कौटुंबिक छळाची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. चारित्र्यावर संशय, हुंड्यासाठी सातत्याने होणारा मानसिक आणि शारीरिक छळ याला कंटाळून 31 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सुरुवातीला या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र, मृत महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पतीला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात पतीचे कथित अनैतिक संबंध आणि त्यावरून घरात सतत वाद होत असल्याची बाबही समोर आली आहे.

Kalyan Crime: प्रेयसीसमोर ‘पेंद्या भाई’चा The End…! 16 वार करून निर्घृण हत्या; 36 तासांत आरोपी जेरबंद

काय नेमकं प्रकरण?

आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव पिंकी (३१) असे आहे. सुमारे ११ वर्षांपूर्वी पिंकीचा आशिष झा याच्याशी लग्न झाला होता. लग्नानंतर काही काळातच पती तसेच सासू-सासरे यांनी हुंड्यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरु केला. तिच्या चारित्र्यावरही वारंवार संशय घेतला जात होता. आशिषचे बाहेर अनैतिक संबंध होते. त्यावरूनही पिंकीसोबत नेहमी त्याचा वाद होत होता. संशयावरून घरात सतत वाद आणि मारहाण होत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

याच सततच्या कौटुंबिक कलह आणि छळाला कंटाळून पिंकीने १४ जुलै रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली होती. मात्र मृत पिंकीचा भाऊ राजीवकुमार मोहन पाठक यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये आशीष झा (३५), गयानाथ झा (६५) आणि इंद्रासन झा (६०, तिघेही श्यामनगर, पारडी) यांचा समावेश आहे. शुक्रवारी रात्री आशीष झा याला अटक करण्यात आली. शनिवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

‘सोबत जगू शकलो नाही तर सोबत मरू…’; मोकळ्या मैदानात जाऊन प्रेमीयुगुलाने घेतला टोकाचा निर्णय

 नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला दोन्ही कुटुंबीयांनी विरोध केल्याने निराश झालेल्या प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. उपचारादरम्यान २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर एका तरुणीची प्रकृती गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांचे चार वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरु होते. त्यांना लग्न करायचे होते. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी लग्नास नकार दिल्याने त्यांनी हा टोकाचा पाऊल उचलला समोर आले आहे. घडलेली घटना नागपूरच्या वानाडोंग्री परिसरात घडली.

Bihar Crime : सासरा-सुनेच्या अफेअरने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त, पत्नीला विष देऊन मारले; बाप-लेक गळफास अवस्थेत सापडले

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: नागपूरच्या पारडी परिसरात.

  • Que: आत्महत्येमागील प्राथमिक कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: चारित्र्यावर संशय, हुंड्यासाठी छळ आणि मानसिक-शारीरिक अत्याचार.

  • Que: पोलिसांनी कोणावर कारवाई केली?

    Ans: पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पतीला अटक केली.

Web Title: Nagpur crime suspicion regarding character harassment for dowry and husbands illicit affair married woman takes drastic step

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 10:38 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nagpur Crime : ५०० कॅमेऱ्यांनी उलगडला गोळीबाराचा थरार; नगरसेवकावरील हल्ल्यात ७ जेरबंद!
2

Nagpur Crime : ५०० कॅमेऱ्यांनी उलगडला गोळीबाराचा थरार; नगरसेवकावरील हल्ल्यात ७ जेरबंद!

Ukraine War: नागपूरकडून 770 कोटी रुपयांचा दारुगोळा खरेदी करून एस्टोनियाच्या संरक्षण मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
3

Ukraine War: नागपूरकडून 770 कोटी रुपयांचा दारुगोळा खरेदी करून एस्टोनियाच्या संरक्षण मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
4

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.