Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : बारामती, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची उत्सुकता शिगेला; उमेदवारी मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस

काँग्रेसने अचानक आकाश मोरे यांची उमेदवारी जाहीर करून 'जातीय कार्ड' खेळले आहे. काँग्रेसच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यापुढील आव्हान वाढले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 09, 2026 | 08:02 AM
Maharashtra Politics : बारामती, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची उत्सुकता शिगेला; उमेदवारी मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस

Maharashtra Politics : बारामती, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची उत्सुकता शिगेला; उमेदवारी मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस

Follow Us
Follow Us:

पुणे : महाराष्ट्रातील राहुरी आणि बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. बारामती उमेदवारी अर्जाच्या छाननीमध्ये दाखल झालेल्या ५९ अजर्जापैकी ५३ अर्ज वैध ठरले आहेत, तर ६ अर्ज फेटाळण्यात आले. आज, गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने, नेमके किती उमेदवार माघार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बारामती व राहुरीत २३ रोजी मतदान होणार असून, निकाल ४ मे रोजी आहे. त्यामुळे या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी उमेदवार न देता या निवडणुकीपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, काँग्रेसने अचानक आकाश मोरे यांची उमेदवारी जाहीर करून ‘जातीय कार्ड’ खेळले आहे. काँग्रेसच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यापुढील आव्हान वाढले असून, ही लढत आता वाटते तितकी सोपी राहिलेली नाही.

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत आहे. सुरुवातीपासूनच ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू होते. मात्र, ५९ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने बिनविरोधची शक्यता धूसर झाली आहे. बारामतीत उमेदवारांमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे तसेच ‘बिग बॉस’मधील स्पर्धक अभिजित बिचुकले यांचाही समावेश आहे.

भाजपकडून ठोस पाठिंब्याचा शब्द

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजपकडून ठोस पाठिंब्याचा शब्द देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

निवडून येण्यासाठी सर्वतोपरी मदत करू

राज्यसभा खासदार पार्थ पवार यांच्यासोबत सुनेत्रा पवार या मुख्यमंत्र्यांच्या भेटीस गेल्या होत्या. यावेळी फडणवीस यांनी पोटनिवडणुकीत भाजप मोठा भाऊ म्हणून पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करेल, असे आश्वासन दिले.

NCP Politics : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या पुन्हा सुरु झाल्या चर्चा; सुनेत्रा पवार राजी, पण प्रफुल्ल पटेल अन् तटकरे…

Web Title: Today is the final day for the withdrawal of nominations for baramati and rahuri assembly by elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati news
  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत
1

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात
2

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात

Maharashtra Politics: महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? राज्यात दुष्काळाचे संकट, पण फडणवीसांच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री गायब!
3

Maharashtra Politics: महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? राज्यात दुष्काळाचे संकट, पण फडणवीसांच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री गायब!

Baramati News :सोमेश्वर कारखाना मतमोजणीचा वाहतुकीला फटका; शारदानगर ते राजहंस चौक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करा!
4

Baramati News :सोमेश्वर कारखाना मतमोजणीचा वाहतुकीला फटका; शारदानगर ते राजहंस चौक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.