छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेचे दोन उमेदवार राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग बेपत्ता झाले आहेत (फोटो - सोशल मीडिया)
महाराष्ट्रात महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा झाल्यापासून उमेदवारांबाबत गुप्तता पाळली जात आहे. बंडखोरी होऊ नये, उमेदवार नाराज होऊ नये यासाठी पक्षांकडून योग्य ती काळजी घेण्यात येत होती. मात्र आता अहिल्यानगरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अहिल्यानगरमधील मनसेचे दोन उमेदवार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. याबद्दल पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कालपासून त्यांचा कोणताही फोन आला नसून त्यांचा फोन देखील लागत नाहीये. यामुळे आता उमेदवारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हे देखील वाचा : Marathi Sahitya Sammelan : अवघी सातारानगरी साहित्यमय! ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची भव्य ग्रंथदिंडी
अहिल्यानगरमध्ये मनसेच्या उमेदवारांसोबत हा प्रकार घडला आहे. अहिल्यानगरमधील प्रभाग क्रमांक १७ हा चर्चेमध्ये होता. याच प्रभागातील मनसेचे उमेदवार राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग हे दोन उमेदवार कालपासून बेपत्ता आहेत. मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी आरोप केला आहे की, “आमच्या उमेदवारांवर दबाव टाकला जात आहे. कालपासून त्यांचा फोन लागत नाही आणि कुटुंबाचाही संपर्क तुटला आहे. कुटुंबात सध्या भीतीचे वातावरण आहे. या गायब झालेल्या उमेदवारांपैकी एकाची लढत भाजपच्या उमेदवाराशी होती. तर दुसऱ्याची लढत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवाराशी होणार होती. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी या प्रकारची गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणाची कार्यकर्त्यांसह कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू केला आहे. मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि उमेदवारांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
हे देखील वाचा :संभाजीनगरमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली मोठी फसवणूक! १२.५% परताव्याच्या नादात ४४ लाखांचा गंडा






