पिंपरीत राष्ट्रवादीचा धडाकेबाज प्रचार! (Photo Credit - X)
‘घड्याळ’ चिन्हासमोर बटन दाबण्याचे आवाहन
यावेळी लहू तोरणे, जय आसवानी, मंगल जाधव, अविष्कार बनसोडे, सोनू म्हात्रे, छाया भडकुंबे, मंगल पवार, राजाराम जाधव, रेश्मा खरात, सलोनी सूर्यवंशी, साखराबाई बोरुडे, कोमल तडसरे, केसरबाई तडसरे, स्वाती सूर्यवंशी, केसरबाई तुरुकमारे, पुनम रोकडे, श्रद्धा रोकडे यांनी प्रभाग क्रमांक १९ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना घड्याळ चिन्ह पुढील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन केले.
यावेळी उमेदवारांनी महिला भगिनींशी संवाद साधला आणि सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता येणार आहे. यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महिला बालकल्याण विभाग अंतर्गत महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या विविध योजना आणि प्रशिक्षण, प्रकल्पाचा लाभ तळागाळातील युवती, महिला भगिनींना मिळवून दिला जाईल. यावेळी उपस्थित असलेल्या मतदारांनी राष्ट्रवादी जिंदाबाद च्या घोषणा दिल्या.






