
राज्यात लवकरच होणार महापालिकेच्या निवडणुका
ठाकरे बंधू एकत्रित लढणार निवडणूक
महाविकास आघाडीचा मनसेचा विरोध मावळणार
राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये नवीन राजकीय समीकरणे पाहायला मिळाली. मनसे आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष एकत्रित आले आहेत. जवळपास 20 वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आले आहेत. राज्यातील अनेक महापालिकेच्या निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढणार आहे. त्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र मनसेला सोबत घेण्याला महाविकास आघाडीचा विरोध असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता मविआ काय निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित काही महापालिकांच्या निवडणुका लढणार आहेत. मनसे आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष मुंबई महापालिका, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे महापालिकेची निवडणूक एकत्र लढणार आहेत. त्यामुळे राज्यात नवीन समीकरणे पाहायला मिळणार आहे.
मनसे पक्षाला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीने विरोध केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गट काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात नगर पंचायत आणि नगरपरिषद निवडणुका जाइर झाल्या आहेत. 2 तारखेला मतदान तर 3 तारखेला निकाल जाहीर होणार आहेत.
कॉंग्रेस आऊट तर मनसे इन?
मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपसह सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाकडून देखील त्यांची 25 वर्षांची सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची राज ठाकरेंसोबत सूत जुळलेले आहे. हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा समोर घेत दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आले. मराठी भाषेसाठी एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या या मनोमिलनाची संपूर्ण राज्यामध्ये जोरदार चर्चा रंगली. दोन दशकांनंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या मागे मराठी माणूस उभा राहिला. याच पाठिंब्याचे रुपांतर मतांमध्ये करण्याचा प्रयत्न ठाकरे बंधूंचा प्रयत्न आहे.
Maharashtra Politics : अशी ही बनवाबनवी! कॉंग्रेस आऊट तर मनसे इन? शरद पवारांचा नवा डाव
राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होत आहेत. यामुळे राजकीय हालचालींना देखील वेग आला आहे. पालिका निवडणुकांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद सुरु झाले असल्याचे दिसून आले आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस नाराज असल्याचे उघड झाले. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये कॉंग्रेसने एकला चलो रे चा नारा दिला आहे. यानंतर राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये नवीन युती होण्याची देखील शक्यता आहे.