Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Top Live Stories Today: महाराष्ट्र वेगळे राष्ट्र असते तर जगातील ३० वी मोठी अर्थव्यवस्था राहिली असती. ऑस्ट्रीया, थायलंड, बांगलादेश आदी देशांपेक्षा आपली अर्थव्यवस्था मोठी झाली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 12, 2026 | 06:56 PM
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Follow Us:

Maharashtra to World Breaking News:

‘महाराष्ट्र जगात 30 वी अर्थव्यवस्था; ऑस्ट्रिया, थायलंड, बांगलादेशला टाकले मागे

मुंबई : जगातील देशांचा विचार केला तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आज ३० व्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रीया, थायलंड, बांगलादेश या देशांना आपण मागे टाकले आहे. देशाच्या जीडीपीमध्ये सर्वाधिक म्हणजे १४.९ टक्के हिस्सा आपला आहे. देशाच्या जीडीपीपेक्षा आपला ग्रोथ रेट जास्त आहे. एफडीआय, स्टार्टअप, यूनिकॉन, वृक्षकांच्या बीजांतीसटी देशात पहिल्या क्रमांकावर आहोत.

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आता ६६० बिलियनवर पोहोचली आहे. आता ३४० बिलियन अजून पाहिजेत. २०२९ पर्यंत आपली अर्थव्यवस्था १ ट्रिलियनपर्यंत पोहोचणारच. २०४७ मध्ये आपण ५ ट्रिलियनपर्यंतदेखील निश्चित पोहोचू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

 

 

The liveblog has ended.
  • 12 Mar 2026 06:53 PM (IST)

    12 Mar 2026 06:53 PM (IST)

    कामाची बातमी! ‘UMANG’ ॲपवर आता मिळणार ‘मेरा राशन’ची सुविधा; रेशन कार्डचे सर्व तपशील एका क्लिकवर उपलब्ध

    डिजिटल इंडिया मोहिमेला अधिक गती देत केंद्र सरकारने (Central Goverment) सर्वसामान्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सरकारी सेवांचा लाभ सुलभ व्हावा, या उद्देशाने ‘उमंग’ (UMANG) ॲपमध्ये आता ‘मेरा राशन’ (Mera Ration) हे नवीन फिचर जोडण्यात आले आहे. या सुविधेमुळे रेशन कार्डधारकांना आता कार्यालयांचे चकरा न मारता आपल्या मोबाईलवरच सर्व माहिती पाहता येणार आहे.

  • 12 Mar 2026 06:48 PM (IST)

    12 Mar 2026 06:48 PM (IST)

    ‘RTE’ प्रवेशासाठी १८ मार्चपर्यंत मुदतवाढ! 25% जागा राखीव, लवकर करा अर्ज

    बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत (RTE) दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी खासगी स्वयंअर्थसहाय्यित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागांवर प्रवेश दिला जातो. या प्रवेशासाठी सुरू असलेल्या ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेला शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी आठ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता पालकांना १८ मार्चपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.

  • 12 Mar 2026 06:41 PM (IST)

    12 Mar 2026 06:41 PM (IST)

    चिपळूणमध्ये दोन ज्वेलरी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

    चिपळूण: शहरातील नक्षत्र फॉमग ज्वेलरी येथे खासगी बिल बुक तयार करून व स्वतःचा क्यूआर कोड वापरून ग्राहकांकडून पैसे स्वतःच्या खात्यात जमा करून तब्बल १३ लाख १६ हजार ५८७ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे शहरातील व्यापारी व ग्राहकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

  • 12 Mar 2026 06:31 PM (IST)

    12 Mar 2026 06:31 PM (IST)

    Malegaon Sugar Factory : माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड

    माळेगाव : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे कारखान्याच्या सभासद, कामगार व परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली.

  • 12 Mar 2026 06:24 PM (IST)

    12 Mar 2026 06:24 PM (IST)

    Pune शहरात कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद; केवळ रूग्णालये अन्...; कोणाला होणार पुरवठा?

    पुणे: सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने कमर्शियल गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत महत्त्वाच्या सूचना जारी केल्या असून, अत्यावश्यक सेवांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सध्या कमर्शियल गॅसचा पुरवठा मर्यादित करण्यात आला असून, प्राधान्याने केवळ विद्युत दाहिनी (स्मशानभूमी) तसेच रुग्णालयांना गॅस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधालकर यांनी दिली.

  • 12 Mar 2026 06:10 PM (IST)

    12 Mar 2026 06:10 PM (IST)

    Shivam Dube: “माझ्या आयुष्यातील खरा हिरो”, घरी पोहोचताच शिवम दुबेने वडिलांना घातले वर्ल्ड कपचे मेडल; भावूक Video व्हायरल

    भारतीय क्रिकेट संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ८ मार्च रोजी न्यूझीलंडचा पराभव करून टी-२० वर्ल्ड कप २०२६ वर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक विजयानंतर मायदेशी परतलेल्या खेळाडूंचे जंगी स्वागत होत असतानाच, टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर शिवम दुबे (Shivam Dube) याचा एक अत्यंत हृदयस्पर्शी व्हिडिओ समोर आला आहे. वर्ल्ड कप जिंकून घरी परतल्यावर शिवमने विजयाचे मुख्य श्रेय आपल्या वडिलांना देत त्यांच्या गळ्यात सुवर्णपदक घातले, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  • 12 Mar 2026 06:05 PM (IST)

    12 Mar 2026 06:05 PM (IST)

    इराणमध्ये अजूनही अडकले हजारो भारतीय; कशी होणार सुटका? परराष्ट्र मंत्रालयाने सांगितला ‘मास्टरप्लॅन’


    Iran war Indian citizens stranded : नवी दिल्ली : मध्यपूर्वेत सुरु असलेल्या इस्रायल-अमेरिका आणि इराणमधील संघर्ष सध्या तीव्र झाला आहे. यामुळे तेथील भारतीयंच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सध्या ९००० भारतीय मध्यपूर्वेत अडकले असल्याचे सांगितले जात आहे.  याच पार्श्वभूमीवर भारत सरकाने आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली आहे. गुरुवारी(१२ मार्च) परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) भारतायंना परत आणण्याचा आराखडा जाहीर केला आहे.

  • 12 Mar 2026 05:59 PM (IST)

    12 Mar 2026 05:59 PM (IST)

    नालासोपाऱ्यात हार्दिक पांड्या व माहिका शर्मा यांच्याविरोधात तक्रार

     

    भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या महिला आणि त्यांची मैत्रीण माहिका शर्मा यांच्याविरोधात राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करत नालासोपारा तुलिंज पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

    नालासोपारा पूर्व येथील समाजसेवक कुमार हरिश्चंद्र काकडे यांनी ही तक्रार दाखल केली असून, या प्रकरणात राष्ट्र प्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम १९७१ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

    तक्रारदार कुमार हरिश्चंद्र काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे राष्ट्रीय ध्वजाचा अपमान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

    दरम्यान, तक्रार प्राप्त झाल्यानंतर नालासोपारा पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती मिळत आहे.

  • 12 Mar 2026 05:56 PM (IST)

    12 Mar 2026 05:56 PM (IST)

    कर्जत शहरातील पेट्रोल पंपावर मारहाणीची घटना..

    कर्जत शहरात एका राजकीय नेत्याच्या मुलाची कथित दबंगगिरी समोर आली आहे. कर्जत येथील पेट्रोल पंपावर आपली दुचाकी घेऊन पेट्रोल भरण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या तरुणाला रांग मोडून पुढे जात मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्याच्या हातातून नोजल हिसकावून स्वतःच पेट्रोल भरण्याचा व एका तरूणाच्या कानशिलात मारल्याचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. हा संपूर्ण प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे असून कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

  • 12 Mar 2026 05:45 PM (IST)

    12 Mar 2026 05:45 PM (IST)

    खोपोली, खालापुरात गॅस सिलेंडर ची आणीबाणी...?

    आखाती देशात सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम म्हणून गॅस चा तुटवडा होणार असे गृहीत धरून सध्या व्यावसाईक गॅस चा तुटवडा निर्माण झाल्याने घरगुती गॅस ही मिळणार नाही म्हणून नागरिकांमध्ये घबराट.

    गॅस सिलेंडर साठी नागरिकांच्या लागल्या रांगा.. तर घरगुती गॅस चा कोणताच तुटवडा नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये. प्रत्येकाला गॅस घरपोच मिळणार असल्याचे एच पी गॅस, खोपोली चे स्पष्टीकरण.

  • 12 Mar 2026 05:32 PM (IST)

    12 Mar 2026 05:32 PM (IST)

    चिपळूण तालुक्यात ग्रामस्थांना नदीतील मचुल पाणी प्यावे लागत

    चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे सुतारवाडीत तीन वर्षांपूर्वी जलजीवन मिशन योजनेअर्गत 51 लाखाची विहीर बांधून गावाला नळपाणी योजनेचे काम मंजूर झाले होते. सुरुवातीला ठेकेदार अनिल मोहिरेकर यांनी विहीर बांधली मात्र ते काम सुद्धा निकृष्ट दर्जाचे केले. तसेच काम पूर्ण होण्यापूर्वीच ठेकेदार यांनी 41 लाख रुपये बिल घेऊन मोकळा झाला आहे . मात्र आता तेथील ग्रामस्थ यांना नदीतील मचुल पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत याबाबत जिल्हा परिषद सदस्य शिवानी सावंत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली ग्रामस्थानी चिपळूण पंचायत समितीच्या बी डी ओ उमा भारती पाटील यांची भेट घेऊन सध्याची परिस्थिती कथन केली. यावेळी बी डी ओ यांनी उद्या गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत त्यानंतर सोमवारी जलसिंचन विभागाचे डेप्युटी इंजिनिअर, ठेकेदार व ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक घेऊन प्रश्न निकाली काढणार असल्याचे ग्वाही बी डी ओ यांनी दिले आहे मात्र पाण्याचा प्रश्न निकाली निघाला नाहीतर चिपळूण पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य शिवानी सावंत यांनी दिला ..

  • 12 Mar 2026 05:24 PM (IST)

    12 Mar 2026 05:24 PM (IST)

    "विरोधी पक्षनेत्यांना कुठलाही विशेष अधिकार नाही"

    लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पदावरून हटवण्याचा प्रस्ताव बुधवारी लोकसभेत आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला. त्यानंतर, आज ओम बिर्ला सभापतींच्या खुर्चीत पुन्हा विराजमान झाले.

    ते म्हणाले, "स्वतंत्र भारताच्या संसदीय इतिहासात लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर तिसऱ्यांदाच चर्चा झाली. सभागृहातील प्रत्येक सदस्याने नियम आणि प्रक्रियेच्या चौकटीत राहून मुद्द्यांवर आपले मत मांडावे. त्यादृष्टीने मी नेहमीच प्रयत्न केला आहे. सभागृहाचे नेते असोत, विरोधी पक्षनेते असोत किंवा कोणतेही मंत्री असोत; सर्वांना नियम आणि प्रक्रियेनुसारच सभागृहात बोलण्याचा अधिकार आहे. काही जणांचा असा समज आहे की विरोधी पक्षनेते नेहमी इतरांपेक्षा वरचढ असतात आणि कोणत्याही विषयावर बोलू शकतात; मात्र असा कोणालाही विशेष अधिकार नाही."

  • 12 Mar 2026 05:13 PM (IST)

    12 Mar 2026 05:13 PM (IST)

    मध्य रेल्वेकडून उन्हाळी सुट्यांसाठी 1484 विशेष गाड्या

    मध्य रेल्वे द्वारे प्रवाशांना उन्हाळी सुट्ट्यांसाठी 1484 उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा, 749 आरक्षित आणि 735 अनारक्षित विशेष गाड्यांचा समावेश आहे.

  • 12 Mar 2026 05:06 PM (IST)

    12 Mar 2026 05:06 PM (IST)

    PMPML बस खरेदीत भ्रष्टाचार; अधिकाऱ्यांविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन

    Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) मधील अधिकाऱ्यांनी भ्रष्ट पद्धतीने राबविलेल्या ज्युनियर क्लार्क पदोन्नती व पदभरती प्रक्रियेतील गैरप्रकार, बस खरेदीतील अनियमितता, कंत्राट प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव, स्टोअर विभागामार्फत साहित्याची भ्रष्ट पद्धतीने खरेदी तसेच बसस्टॉपवरील जाहिरात कंत्राटातील कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने पुण्यातील PMPML मुख्य कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.

  • 12 Mar 2026 04:50 PM (IST)

    12 Mar 2026 04:50 PM (IST)

    नागरिकांच्या जीवाशी होतोय खेळ; पिण्याच्या पाण्याच्या टाकीत शेवाळ

    जामखेड शहरातील तपनेश्वर परिसरात पिवळसर व दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. नागरिकांच्या तक्रारीनंतर पदाधिकाऱ्यांनी भुतवडा रोड येथील पाण्याच्या टाकीवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता टाकीत शेवाळ साचल्याचे व पाणी दूषित अवस्थेत असल्याचे दिसून आल्याचा दावा करण्यात आला. स्वच्छ पाणीपुरवठा तातडीने सुरू न केल्यास तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा युवा नेते शहाजी राळेभात यांनी दिला आहे. आज बुधवार (दि. 11मार्च) रोजी तपनेश्वर भागात नळाचे पाणी सुटले असता नळातून पिवळसर व दूषित पाणी येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. याबाबत नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना माहिती दिल्यानंतर पदाधिकारी व नगरसेवकांनी भुतवडा रोड येथील पाण्याच्या टाकीवर जाऊन पाहणी केली. यावेळी टाकीमध्ये अस्वच्छता असून पाण्यात शेवाळ असल्याचे दिसून आल्याचा दावा करण्यात आला.

  • 12 Mar 2026 04:45 PM (IST)

    12 Mar 2026 04:45 PM (IST)

    हिंगोलीच्या बाजारपेठेत हळदीचे भाव घसरले

    आखाती देशामध्ये युद्ध सुरु असल्याने भारतीय बाजारपेठांवर याचा परिणाम होत आहे. एकीकडे एलपीजी गॅसचा तुटवडा भासत असताना फळ आणि भाज्यांवर देखील युद्धाचा (Iran-Israel War) परिणाम होत आहे. घरगुती एलपीजी गॅस मिळत नसल्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. तर व्यावसायिक गॅस उपलब्ध होत नसल्यामुळे हॉटेल इंडस्ट्रीवर विपरित परिणाम झाला आहे. यानंतर आता हिंगोलमध्ये (Hingoli News) हळद उत्पादन आणि विक्रीवर देखील युद्धाचे सावट आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.मराठवाडा आणि विदभांतील हळद खरेदी-विक्रीचे प्रमुख केंद्र असलेल्या हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन हळदीची आवक सुरू झाली असली तरी भाववाढीवर आखाती देशांतील युद्धाचे सावट असल्याचे चित्र आहे. सध्या हळदीचे दर घसरले असून युद्धस्थिती कायम राहिल्यास भाव आणखी कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सावध भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मार्केट यार्डात दरवर्षी हंगामात सुमारे ५ ते ७ हजार क्विंटल हळदीची आवक होते. हंगामाच्या प्रारंभी सध्या दररोज एक ते दीड हजार क्विंटल हळद विक्रीसाठी दाखल होत आहे.

  • 12 Mar 2026 04:35 PM (IST)

    12 Mar 2026 04:35 PM (IST)

    सगळं संपणार! पुण्यात हॉटेल्स, मेसचे लॉकडाउन?

    पुणे शहराला ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ म्हणून ओळखले जाते. शिक्षणासाठीराज्यातील तसेच ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी शहरात येतात.याशिवाय रोजगारासाठी अनेक कामगारही शहरात वास्तव्यास असून, मात्र सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेल्या इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम इंधन पुरवठ्यावर होत असून त्याचा फटका शहरातील हॉटेल,मेस आणि खानावळी व्यवसायाला बसू लागला आहे.कमर्शियलगॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात मर्यादा येत असल्याने अनेक हॉटेल आणि मेस चालकां समोर मोठे संकट निर्माण झाले आहे. काही हॉटेलमध्ये फक्त दोन दिवसांचा गॅस साठा उरला असून काही मेसमध्ये केवळ एका दिवसापुरता साठा असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. त्यामुळे काही ठिकाणी तात्पुरता पर्याय म्हणून इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर करून स्वयंपाक सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.विजेवर स्वयंपाक केल्यास वीजबिल मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने हा पर्यायही दीर्घकाळ टिकणे कठीण असल्याचे हॉटेल आणि मेस चालकांनी सांगितले. गॅसचा पुरवठा लवकर सुरळीत झाला नाही, तर काही हॉटेल आणि मेस बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

  • 12 Mar 2026 04:25 PM (IST)

    12 Mar 2026 04:25 PM (IST)

    एसटीच्या जागांचा पीपीपी तत्त्वावर विकास, प्रवाशांना आधुनिक सुविधा

    महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) ताब्यातील अतिरिक्त व मोकळ्या जागांचा अधिक परिणामकारक वापर करून महसूल वाढविणे, प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे आणि स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती साध्य करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या विषयावर महाराष्ट्र विधानपरिषदेत अर्धा तास चर्चेची सूचना देण्यात आली होती. त्यासंदर्भातील सविस्तर माहिती शासनाने सभागृहात मांडली आहे.परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मालकीच्या सुमारे १५०० हेक्टरहून अधिक जमिनी राज्यभर विविध आगार व बसस्थानक परिसरात उपलब्ध आहेत. या जमिनींचा नियोजनबद्ध विकास करून महसूलवाढ साधण्यासाठी शासनाने त्या सार्वजनिक -खाजगी- सहभाग (PPP) तत्त्वावर खासगी विकासकांना देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या अंतर्गत संबंधित जागा ९८ वर्षांच्या भाडेकरारावर देऊन त्यांचा पुनर्विकास करण्याची योजना आहे.

  • 12 Mar 2026 04:20 PM (IST)

    12 Mar 2026 04:20 PM (IST)

    भाड्याच्या उत्पन्नावरील जाचक घरपट्टी रद्द करण्याची शिवसेनेची मागणी

    अहिल्यानगर महानगरपालिकेने मालमत्ता पुनर्मूल्यांकनासाठी नियुक्त केलेल्या 'सि.ई. इन्फो सिस्टीम लि.' या संस्थेमार्फत आकारण्यात आलेली नवीन घरपट्टी अन्यायकारक असल्याचा आरोप अहिल्यानगर शहर शिवसेनेने केला आहे. निवासी मालमत्तेचा काही भाग भाड्याने दिल्यास प्रत्यक्ष भाड्याच्या रकमेवर आधारित कर आकारणी केल्यामुळे घरपट्टीच्या रकमेत भरमसाठ वाढ झाली आहे..यामुळे मध्यमवर्गीय घरमालकांच्या उत्पन्नातील ५० टक्के हिस्सा करापोटी जात असून कर्ज हप्ते आणि देखभाल खर्च भागवणे कठीण झाले आहे. भाडेकरू नसले तरीही पूर्ण वर्षाची आकारणी केली जात असल्याने नागरिकांवर आर्थिक बोजा पडत आहे. ही पद्धत रद्द करून बांधकामाच्या क्षेत्रफळानुसार रास्त कर आकारणी करावी या मागणीसाठी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांच्यासह नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन दिले. तसेच या विषयावर स्थायी समितीची विशेष सभा बोलविण्याची मागणीही शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

  • 12 Mar 2026 04:15 PM (IST)

    12 Mar 2026 04:15 PM (IST)

    तनपुरेंना अधिकार काय? विलीनीकरण आणि प्रवेशावरून विखेंचे प्रश्नचिन्ह

    राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले आहे. यावर भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी विखे म्हणाले की, भाजपमध्ये कोणाला प्रवेश द्यायचा आणि उमेदवारी जाहीर करायची याचे अधिकार मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडे आहे. भाजप हा केवळ वैयक्तिक इच्छेवर चालणारा पक्ष नसून ग्राऊंड रिपोर्ट आणि सर्व्हेच्या आधारे निर्णय घेणारा पक्ष आहे. ज्या उमेदवाराला जनतेचे भक्कम समर्थन असेल आणि जो निवडून येऊ शकेल त्यालाच पक्ष संधी देईल असे सांगत त्यांनी तनपुरेंच्या विधानावर आपली भूमिका स्पष्ट केली.

  • 12 Mar 2026 04:08 PM (IST)

    12 Mar 2026 04:08 PM (IST)

    गॅस दरवाढीविरोधात पनवेलमध्ये काँग्रेसचा मोर्चा

    गॅस दरवाढीच्या निषेधार्थ पनवेलमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी निषेध म्हणून प्रतीकात्मक गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा काढत केंद्र व राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे, महिला आघाडी प्रभारी चंद्रकला नायडू, नगरसेवक हरेश केणी यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. मोर्चा प्रांत कार्यालयापर्यंत नेण्यात येत प्रशासनाला निवेदन देण्यात आले.यावेळी गॅस दरवाढ तात्काळ रद्द करावी तसेच गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

  • 12 Mar 2026 04:00 PM (IST)

    12 Mar 2026 04:00 PM (IST)

    Iran Leadership : इराणचा नवा वारसदार संकटात!

    Iran Political Crisis : २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायलने संयुक्तपणे इराणवर लष्करी हल्ला केला होता. यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेईंचा मृत्यू झाला. यामुळे इराणमध्ये राजकीय गोंधळ उडाला होता. तसेच इराणचे रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने आक्रमक होऊन अमेरिका-इस्रायल विरोधात युद्ध पुकारले होते. दरम्यान यानंतर इराणच्या नव्या सुप्रीम लीडरची नियुक्तही करण्यात आली होती. खामेनेईच्या मुलगा मोजतबा खामेनेईच इराणच्या सर्वोच्च नेतेपदी निवडून आले होते.

    वाचा सविस्तर 

  • 12 Mar 2026 03:50 PM (IST)

    12 Mar 2026 03:50 PM (IST)

    मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा किडनीच्या आरोग्यावर का होतो गंभीर परिणाम?

    किडनी हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा अवयव, आपल्याला निरोगी ठेवण्याचे काम अनेक प्रकारे करत असतो. किडन्या रक्तातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढतात, रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात, शरीरातील विविध क्षारांचे प्रमाण संतुलित ठेवतात आणि लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये मदत करतात.मधुमेह आणि उच्च रक्तदाब या संपूर्ण जगभरात भेडसावत असलेल्या दोन मोठ्या आरोग्य समस्या आहेत. हे दोन आजार किडनीच्या नुकसानासाठी थेट कारणीभूत ठरतात. मधुमेह आणि उच्च रक्तदाबामुळे किडनी हळूहळू खराब होऊ शकते आणि कालांतराने त्या व्यक्तीला किडनीचा तीव्र आजार (Chronic Kidney Disease – CKD) किंवा किडनी निकामी होणे (Kidney Failure) यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.डॉ निखिल शिंदे, कन्सल्टन्ट, नेफ्रॉलॉजी, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबई, यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)

    वाचा सविस्तर 
  • 12 Mar 2026 03:40 PM (IST)

    12 Mar 2026 03:40 PM (IST)

    पंचायत समिती सभापती निवडणुकीत भाजपचा झेंडा

    परभणी : बाळासाहेब काळे : जिल्ह्यातील परभणी, पूर्णा, गंगाखेड, सोनपेठ, जिंतूर, पाथरी, सेलू, मानवत या सात पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी (दि. १०) पार पडली. यातील चार सभापती पदांवर भाजपने तर चार सभापती पदांवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व राखले असून एका सभापती पदाचा मान अपक्षाला मिळाला आहे. भाजपने (BJP Politics) जिंतूर, सेलू, पालम, गंगाखेड पंचायत समिती तर राष्ट्रवादी सोनपेठ, पाथरी, काँग्रेसने परभणी, मानवत या पंचायत समितींचे सभापतीपद मिळवले आहे. पूर्णा पंचायत समिती सभापतीपदी अपक्ष सभापती पदी उज्ज्वला नारायणराव पिसाळ यांनी बाजी मारली आहे. परभणी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीत नाट्यमय राजकीय घडामोडी पहावयास पाहायला मिळाल्या. (Nanded News)

    वाचा सविस्तर 
  • 12 Mar 2026 03:30 PM (IST)

    12 Mar 2026 03:30 PM (IST)

    Chhatrapati Sambhajinagar: रिक्षाचालक संकटात! गॅस दरवाढीमुळे उत्पन्नाचा ताळमेळ बिघडला

    LPG CNG Price Hike Sambhajinagar: ऑटो रिक्षांसाठी एलपीजी आणि सीएनजी गॅस मिळत आहे मात्र एजन्सीजकडून तुटवडा असल्याचा भ्रम निर्माण करत आहेत. यामुळे रिक्षा चालकांमध्ये संभ्रम पसरत आहे. गॅसचा तुटवडा नाही मात्र दरवाढ झाल्याने रिक्षाचालक त्रस्त झाले आहेत. हे दर कमी करण्यासाठी तसेच मीटरचे दर वाढविण्यासाठी आम्ही प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला निवेदन देणार असल्याची माहिती ऑटोरिक्षा चालक महासंघ अध्यक्ष निसार अहमद खान यांनी दिली.

    वाचा सविस्तर 

  • 12 Mar 2026 03:20 PM (IST)

    12 Mar 2026 03:20 PM (IST)

    Haj House Kharghar: हज यात्रेकरूंसाठी गुड न्यूज!

    Haj House Kharghar: भारतीय हज समितीने हज यात्रेकरूंच्या सुविधेसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. नवी मुंबईतील खारघर येथे नवीन ‘हज हाऊस’ उभारण्यासाठी भारतीय हज समितीने केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागासोबत (CPWD) सामंजस्य करार (MoU) केला आहे. सीपीडब्ल्यूडीच्या कार्यालयात या करारावर औपचारिक स्वाक्षरी करण्यात आली. हे नवीन हज हाऊस केवळ निवासासाठी नसेल, तर ते ट्रान्झिट-कम-ट्रेनिंग (Transit-cum-Training) आणि सुविधा केंद्र म्हणून काम करेल. यात्रेला जाण्यापूर्वी यात्रेकरूंना आवश्यक असलेले तांत्रिक आणि धार्मिक प्रशिक्षण येथे दिले जाईल. नवी मुंबईतील खारघर हे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ असल्याने या केंद्राचा यात्रेकरूंना मोठा फायदा होणार आहे.या केंद्रामध्ये यात्रेकरूंसाठी विश्रांती कक्ष, माहिती केंद्र आणि इतर आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

    वाचा सविस्तर 

  • 12 Mar 2026 03:10 PM (IST)

    12 Mar 2026 03:10 PM (IST)

    Fire News: नोएडामधील फॅक्टरीला भीषण आग; श्वास गुदमरला अन्…

    Noida Fire: उत्तर प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. दरम्यान नोएडामधील सेक्टर 4 परिसरात एका इलेक्ट्रॉनिक मीटर तयार करणाऱ्या फॅक्टरीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. क्षणार्धात आगीने अक्राळविक्राळ रूप धारण केले. फॅक्टरीमध्ये खळबळ उडाली. आज सकाळी सुमारे 200 ते 250 कर्मचारी त्यांची नाइट शिफ्ट संपवून घरी जाण्याच्या तयारीत होते. मात्र त्यांच्यासाठी आजची पाहत भीषण ठरली. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसर हडरून गेला. धुराचे लोट, आणि आग एवढ्या वेगाने पसरल्याने नेमके काय झाले आहे हे कोणालाच काळात नव्हते.

    वाचा सविस्तर 

     

  • 12 Mar 2026 03:01 PM (IST)

    12 Mar 2026 03:01 PM (IST)

    Jobs In Mumbai/Thane: मुंबईकरांनो! तयारीला लागा, नोकरीची संधी!

    MBPA ने भरतीला सुरुवात केली आहे. मुंबई पोर्ट अथॉरिटीने या भरतीला सुरुवात केली आहे. ही भरती प्रथम श्रेणी पदांसाठी आयोजित करण्यात आली आहे. ही भरती थेट आहे. या भरतीच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. 6 मार्च 2026 पासून या भरतीसाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे तर ही भरती एका महिन्यासाठी खुली असून, अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांना 6 एप्रिल 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

    वाचा सविस्तर 
  • 12 Mar 2026 02:50 PM (IST)

    12 Mar 2026 02:50 PM (IST)

    घरातून बाहेर पडली, पण परतली नाही; वर्ध्यात रीलस्टार मुलीचा मृतदेह जलाशयात आढळला

    वर्धा: वर्धा येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय रीलस्टारचा मृतदेह जलाशयात सापडल्याने खळबळ उडाली आहे. काजल गजानन रोकडे (वय १७, रा. गजानन नगर आर्वी नाका वर्धा) असं या मुलीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसिद्ध रीलस्टार अरुण तुपे याचे निधन झाल्याचे समोर आले होते. आता वर्ध्यात एका १७ वर्षीय रीलस्टारचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

  • 12 Mar 2026 02:40 PM (IST)

    12 Mar 2026 02:40 PM (IST)

    यंदा गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी?

    मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचा सण यावर्षी गुरुवार 19 मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या दिवशी दारात उभारली जाणारी गुढी हे विजय आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते. गुढीला नेसवली जाणारी साडी हा या पूजेचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून, शास्त्राप्रमाणे विशिष्ट रंगांच्या निवडीला विशेष महत्त्व दिले गेले आहे. गुढीचे रूप खुलून दिसण्यासाठी आणि घरात सकारात्मकता येण्यासाठी योग्य रंगाची साडी निवडणे आवश्यक आहे.

  • 12 Mar 2026 02:35 PM (IST)

    12 Mar 2026 02:35 PM (IST)

    MMRDA वादग्रस्त वादग्रस्त पुलाचा प्रश्न अधिवेशनात पेटला

    भाईंदर/विजय काते : मिरा-भाईंदर मेट्रो प्रकल्पाचे काम करणाऱ्या जे. कुमार इन्फ्रास्ट्रक्चर या कंत्राटदाराने एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून राज्य शासनाची कोट्यवधी रुपयांची लूट केल्याचा गंभीर आरोप मिरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी विधानसभेत केला.

  • 12 Mar 2026 02:30 PM (IST)

    12 Mar 2026 02:30 PM (IST)

    “नमो नमो अन् जय श्रीराम म्हणा, गॅस आपल्या दारात

    आखाती देशांमध्ये युद्धस्थिती निर्माण झाल्यामुळे तेल आणि इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारतावर इंधनच्या तुटवड्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एलपीजी गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder) मिळणे मुश्कील झाले असून याचा फटका सामान्य लोकांना बसला आहे. व्यावसायिक गॅस मिळत नसून यामुळे हॉटेल, मेस आणि खानावळींवर परिणाम झाला आहे. यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. नमो नमो म्हणा किंवा जय श्रीराम म्हणा गॅस आपल्या दारामध्ये येईल अशी टीका खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.

  • 12 Mar 2026 02:25 PM (IST)

    12 Mar 2026 02:25 PM (IST)

    खड्डेमुक्त रस्त्यांसाठी महापालिकेचे PMC Road Mitra अॅप बंद

    PMC Road Mitra App: शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून महापालिका प्रशासनाच्या कारभारावर सातत्याने टिका केली जात होती. त्यातच राज्य शासनानेदेखील खडसावल्यानंतर महापालिका प्रशासनाला खडबडून जाग आली. महापालिकेने शहरातील रस्त्यांची थेट तक्रार महापालिकेला मिळावी, यासाठी PMC Road Mitra या मोबाईल अॅपची सुरूवात केली,पण अवघ्या सहा महिन्यातच हे अॅप बंद पडल्याची माहिती समोर आली आहे.

  • 12 Mar 2026 02:20 PM (IST)

    12 Mar 2026 02:20 PM (IST)

    इराकजवळ अमेरिकेच्या तेल टँकरवर इराणचा घातक हल्ला

    मध्यपूर्वेतील युद्ध (US-Israel Iran War) आता अधिक भीषण आणि वैयक्तिक स्तरावर वेदनादायक होऊ लागले आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाची झळ आता थेट भारतीय कुटुंबांना बसू लागली आहे. ११ मार्च रोजी इराकच्या बसरा बंदराजवळ एका अमेरिकन तेल टँकरवर झालेल्या इराणच्या हल्ल्यात एका निष्पाप भारतीय क्रू मेंबरला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा संपूर्ण जगाचे लक्ष या युद्धाकडे लागले असून इंधनाच्या किमती गगनाला भिडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • 12 Mar 2026 02:14 PM (IST)

    12 Mar 2026 02:14 PM (IST)

    ‘धुरंधर’मधील रणवीर सिंहच्या अभिनयाची चर्चा; ‘धुरंधर: द रिवेंज’साठी वाढली प्रेक्षकांची उत्सुकता

    ‘धुरंधर’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चेचा विषय ठरला आहे. चित्रपटातील अ‍ॅक्शन, भावनिक क्षण आणि थरारक कथानकामुळे प्रेक्षकांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला. विशेषतः रणवीर सिंहने साकारलेला हमझा हे पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला आहे. त्याच्या तीव्र आणि प्रभावी अभिनयामुळे चित्रपटातील अनेक सीन प्रेक्षकांच्या अजूनही आठवणीत आहेत.

  • 12 Mar 2026 02:00 PM (IST)

    12 Mar 2026 02:00 PM (IST)

    मॅच फिक्सिंग प्रकरणात मोठी कारवाई, IPL 2026 पूर्वी केकेआरच्या माजी खेळाडूवर आयसीसीची बंदी

    भारत आणि श्रीलंकेने अलीकडेच २०२६ चा टी२० विश्वचषक आयोजित केला होता. भारताने २०२६ च्या विश्वचषकात शानदार कामगिरी केली आणि विजेतेपद जिंकले. विश्वचषक जिंकल्यानंतर आता भारतामध्ये क्रिकेटच्या मोठ्या उत्सवाला सुरूवात होणार आहे. आता आयपीएलमध्ये खेळलेला आणि केकेआरचा माजी खेळाडू संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. आता, विश्वचषकानंतर, आयसीसीने महत्त्वपूर्ण कारवाई करत वेस्ट इंडिजचा खेळाडू जेवॉन सिएर्ल्सवर बंदी घातली आहे.

  • 12 Mar 2026 01:55 PM (IST)

    12 Mar 2026 01:55 PM (IST)

    एलपीजी सिलिंडर बुक करत आहात का? मग ‘या’ सोप्या पद्धतीने करा झटपट बुकींग

    तुम्हीही गॅस एजन्सीच्या फेऱ्या मारून एलपीजी सिलिंडर बुक करत आहात का? कॉल करण्याव्यतिरिक्त, तुम्ही चार इतर सोप्या पद्धतींद्वारे सिलिंडर बुक करू शकता. यामध्ये व्हॉट्सअॅप, मिस्ड कॉल, एसएमएस आणि अॅप्स किंवा पोर्टलचा समावेश आहे. तुम्ही चार पद्धतींद्वारे सिलिंडर डिलिव्हर होत नसल्याबद्दल तक्रार करू शकता: सरकारी टोल-फ्री नंबरवर कॉल करणे, वेबसाइटवर तक्रार करणे, उमंग अॅपद्वारे तक्रार करणे आणि सोशल मीडियावर तक्रार करु शकता.

  • 12 Mar 2026 01:50 PM (IST)

    12 Mar 2026 01:50 PM (IST)

    ‘झी चित्रगौरव पुरस्कार २०२६’च्या मंचावर घुमणार मराठीचा हुंकार; गाजणार मराठीचा सन्मान!

    मराठी चित्रपटसृष्टीचा सर्वात मानाचा आणि दिमाखदार सोहळा म्हणून ओळखला जाणारा ‘झी चित्र गौरव पुरस्कार 2026’ यंदा नव्या जोमाने आणि मराठमोळ्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे. “मराठी गाजलंच पाहिजे” या घोषवाक्यासह साजरा होणाऱ्या या सोहळ्यात मराठी संस्कृतीचा अभिमान, परंपरेचा ठसा आणि आधुनिकतेची झलक यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार आहे. झी चित्रगौरवच्या मंचावर मराठीचा अभिमान दुमदुमणार असून, मराठीचा हुंकार घुमणार आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कर्तृत्ववान कलाकारांचा सन्मान केला जाणार आहे.

  • 12 Mar 2026 01:45 PM (IST)

    12 Mar 2026 01:45 PM (IST)

    मध्यपूर्व युद्धाचा भारतावर परिणाम; विदेशी गुंतवणूकदारांनी काढले तब्बल ‘इतके’ कोटी

    पश्चिम आशियातील संघर्ष सुरू झाल्यापासून पूर्णपणे प्रवेश योग्य मार्ग (एफएआर) अंतर्गत जारी केलेल्या सरकारी सिक्युरिटीज (जी-सेक) मध्ये परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (एफपीआयएस) सुमारे ४,६३४ कोटींनी कमी झालेत. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत होत चाललेला रुपया आणि वाढत्या बाँड उत्पन्नामुळे परदेशी गुंतवणूकदारांमध्ये वाढलेल्या सावधगिरीमुळे ही घसरण झाली आहे. क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी एफएआर सिक्युरिटीजमध्ये एकूण परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूक अंदाजे ३.२६ लाख कोटी होती, जी २७फेब्रुवारी रोजी संघर्ष सुरू होण्यापूर्वी अंदाजे ३.३१ लाख कोटी होती.

  • 12 Mar 2026 01:40 PM (IST)

    12 Mar 2026 01:40 PM (IST)

    सर्वात महागड्या लेझर सिस्टीमचा हिजबुल्लाहच्या ड्रोन आर्मीने उडवला धुव्वा

    इस्रायलने जगाला असा दावा केला होता की, त्यांच्याकडे आता एक अशी ‘लेझर’ शक्ती आहे जी कोणत्याही रॉकेट किंवा ड्रोनला काही सेकंदात भस्म करेल. मात्र, लेबनान सीमेवर हिजबुल्लाहसोबत सुरू असलेल्या युद्धात या ‘आयर्न बीम’ (Iron Beam) सिस्टीमचे पितळ उघडे पडले आहे. ज्या तंत्रज्ञानावर इस्रायलने १० वर्षे मेहनत घेतली आणि अब्जावधी रुपये खर्च केले, ते तंत्रज्ञान आता युद्धभूमीवर सर्वात कमकुवत दुवा ठरत आहे.

  • 12 Mar 2026 01:35 PM (IST)

    12 Mar 2026 01:35 PM (IST)

    विरोधकांनी संसदेत मांडली चूल! गॅस तुटवड्यावरुन सरकारवर आगपाखड

    अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. यंदाचे अधिवेशन हे आखाती देशांमधील युद्धामुळे (Iran-Israel War) भारतामध्ये निर्माण झालेल्या इंधन टंचाईवरुन गाजले आहे. विरोधकांनी यावरुन सत्ताधाऱ्यांना जोरदार धारेवर धरले आहे. तसेच लोकसभा अध्यक्ष ओम बिरला (Om Birla) यांच्याविरोधात देखील अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे. या मुद्द्यावरुन संसदेतील वातावरण तापले आहे.
  • 12 Mar 2026 01:25 PM (IST)

    12 Mar 2026 01:25 PM (IST)

    होर्मुझ संकटात धावून आले रशियन तेल; भारताने खरेदी केले तब्बल ३ कोटी बॅरल

    इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या तणावाचा परिणाम आता जागतिक तेल पुरवठ्यावर स्पष्टपणे होत आहे. होर्मुझ सामुद्रधुनी मार्गावर परिणाम झाल्यानंतर परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की अनेक देशांना त्यांच्या ऊर्जा धोरणांमध्ये बदल करावे लागत आहेत. दरम्यान, असे वृत्त आहे की भारत रशियाकडून अंदाजे ३० दशलक्ष बॅरल कच्चे तेल खरेदी करण्याची तयारी करत आहे.

  • 12 Mar 2026 01:20 PM (IST)

    12 Mar 2026 01:20 PM (IST)

    राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने ‘हा’ नाराज नेता सोडणार काँग्रेसचा ‘हात’?

    गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच पुण्यातील काँग्रेस नेते आणि टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. रोहित टिळक हे टिळक कुटुंबातील राजकीय वारसा असलेले नेते म्हणून ओळखले जातात. लवकरच ते काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

  • 12 Mar 2026 01:15 PM (IST)

    12 Mar 2026 01:15 PM (IST)

    PMPML म्हणजे ‘बदल्यांचे आगार’; ६ वर्षांत ८ अध्यक्ष बदलले

    पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आयएएस पंकज देवरे यांची बदली कऱण्यात आली आहे. पंकज देवरे यांच्याकडील अध्यक्षपदाची सुत्रे आता आयएएस महेश आव्हाड यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. लक्षणीय बाब म्हणजे गेल्या सहा वर्षात पीएमपीच्या अध्यक्षपदावर नियुक्त झालेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला आपला कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. मागील सहा वर्षात तब्बल आठ अध्यक्षांची नियुक्ती आणि बदली करण्यात आली आहे.

  • 12 Mar 2026 01:05 PM (IST)

    12 Mar 2026 01:05 PM (IST)

    30 दिवस तेल पुरवठा बंद! होर्मुझमध्ये इराणची प्रलयकारी सापळ्यांची उभारणी

    जागतिक अर्थव्यवस्थेची ‘जीवनरेखा’ मानली जाणारी होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) आता मृत्यूचा सापळा बनली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध आता अशा वळणावर आले आहे जिथे संपूर्ण जगाचा इंधन पुरवठा धोक्यात आला आहे. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या ताज्या अहवालानुसार, इराणने या अरुंद समुद्री मार्गाच्या तळाशी मोठ्या प्रमाणावर भूसुरुंग बसवले आहेत. हे सुरुंग इतके घातक आहेत की ते शोधून नष्ट करण्यासाठी किमान ३० दिवसांचा कालावधी लागू शकतो. या एका निर्णयामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीने प्रति बॅरल १०० डॉलर्सचा टप्पा ओलांडला असून, येत्या काळात हा भडका उडण्याची शक्यता आहे.

  • 12 Mar 2026 01:00 PM (IST)

    12 Mar 2026 01:00 PM (IST)

    कुलदीप यादवच्या लग्नाचे बजेट 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त, जाणून घ्या शाही मेजवानीची संपूर्ण माहिती

    भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादव त्याच्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाला सुरुवात करणार आहे. हा त्याच्या आयुष्यातील एक खास क्षण आहे कारण तो त्याची बालपणीची मैत्रीण वंशिका सिंगशी शनिवारी, १४ मार्च रोजी लग्न करणार आहे. हे लग्न केवळ वैयक्तिक कार्यक्रम नाही तर क्रिकेट आणि समाजासाठीही चर्चेचा विषय बनले आहे. कुलदीपचे कुटुंब आणि जवळचे नातेवाईक आधीच कानपूरहून मसूरीला रवाना झाले आहेत, जिथे हा भव्य आणि शाही विवाह होणार आहे.

  • 12 Mar 2026 12:55 PM (IST)

    12 Mar 2026 12:55 PM (IST)

    “त्यांना 20 वर्षापासून मारण्याचा प्रयत्न…; फारुख अब्दुल्लांवर हल्ला करणाऱ्याचे धक्कादायक विधान

    जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला, एका लग्नसमारंभमध्ये सहभागी झालेल्या फारुख अब्दुल्लांवर जवळच उभ्या असलेल्या व्यक्तीने गोळीबार केला. मात्र दैव बलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचला. मात्र या हल्ल्यामुळे जम्मू काश्मीरसह राजकीय वर्तुळातून नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराने 20 वर्षापासून त्यांना मारण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा धक्कादायक दावा केला आहे.

  • 12 Mar 2026 12:50 PM (IST)

    12 Mar 2026 12:50 PM (IST)

    पीएमपीच्या एक हजार बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेच नाहीत; प्रवाशांची सुरक्षा धोक्यात?

    पीएमपीएमएलसाठी घेण्यात येणाऱ्या एक हजार बसेसमध्ये एलएडी सिस्टिम आणि कॅमेरे नाहीत, असा आरोप आपला परिसर या संस्थेचे उज्वल केसकर यांनी केला आहे. यासंदर्भात केसकर यांनी पीएमपीएमएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज बी. पी. यांना निवेदन दिले आहे.

  • 12 Mar 2026 12:45 PM (IST)

    12 Mar 2026 12:45 PM (IST)

    ‘धनुष्यबाण आणि शिवसेना’ कुणाची? साडे तीन वर्षांच्या संघर्षाचा शेवट आज होणार का? सुप्रीम कोर्टात सुनावणी

    १९६६ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाच्या नावावरून (जो २०२२ मध्ये फुटला) आणि धनुष्यबाण चिन्हावर आज (12 मार्च 2026) सुप्रीम कोर्टात सु्नावणी होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेला हा खटला मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सुनावणीला येणार आहे. उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केल्यानंतर, धनुष्यबाण चिन्हावर कोणाचा हक्क असेल हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून निश्चित होईल. हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाकडेच राहणार की उद्धव ठाकरेंना परत केले जाईल? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

  • 12 Mar 2026 12:40 PM (IST)

    12 Mar 2026 12:40 PM (IST)

    Volkswagen घेऊन येत आहे Taigun Facelift; क्लासी बदल

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, फोक्सवॅगन भारतात टायगुनची फेसलिफ्ट आवृत्ती लाँच करण्याची तयारी करत आहे. याआधी, एसयूव्ही अलीकडेच चाचणी करताना दिसली आहे. यादरम्यान कोणती माहिती आढळली? तर  तपासणी केली जात असलेल्या युनिटमध्ये बाह्य आणि आतील दोन्ही बाजूंनी अनेक मोठे बदल होऊ शकतात असे अहवालात म्हटले आहे. चाचणी दरम्यान आढळलेल्या युनिटमध्ये सध्याच्या आवृत्तीच्या तुलनेत अधिक आक्रमक हेडलाइट्स, कनेक्टेड एलईडी डीआरएल आणि कनेक्टेड टेललाइट्स असू शकतात. त्यात पुन्हा डिझाइन केलेले फ्रंट ग्रिल, नवीन बंपर आणि स्किड प्लेटदेखील असू शकते. त्यात १७-इंच अलॉय व्हील्स देखील असू शकतात.

Web Title: Maharashtra breaking news 12th march live updates maharashtra national international politics crime cricket sports entertainment war world war3 us israel iran war updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 08:52 AM

Topics:  

  • international news
  • maharashtra breaking news
  • Maharashtra Politics
  • national news

संबंधित बातम्या

‘मी काँग्रेसचा…’, शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार यांनी सोडले मौन, म्हणाले- ‘बदनामीचे राजकारण थांबवा’
1

‘मी काँग्रेसचा…’, शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार यांनी सोडले मौन, म्हणाले- ‘बदनामीचे राजकारण थांबवा’

Stamp Duty Scam: नवी मुंबईत हजारो कोटींचा दस्त नोंदणी घोटाळ्याचा पर्दाफाश! दोषी अधिकाऱ्याला थेट सेवेतून बडतर्फ करणार
2

Stamp Duty Scam: नवी मुंबईत हजारो कोटींचा दस्त नोंदणी घोटाळ्याचा पर्दाफाश! दोषी अधिकाऱ्याला थेट सेवेतून बडतर्फ करणार

EPFO च्या ‘या’ सेवा पुढील तीन दिवस राहणार बंद; नवीन Claim येणार नाही करता
3

EPFO च्या ‘या’ सेवा पुढील तीन दिवस राहणार बंद; नवीन Claim येणार नाही करता

Sanjay Dina Patil: पत्रकारांना धमकावणारे खासदार संजय दिना पाटील यांचा माफीनामा! अखेर व्हिडिओ जारी करत स्पष्ट केली बाजू; म्हणाले…
4

Sanjay Dina Patil: पत्रकारांना धमकावणारे खासदार संजय दिना पाटील यांचा माफीनामा! अखेर व्हिडिओ जारी करत स्पष्ट केली बाजू; म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.