Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘…नाहीतर चिन्ह गोठेल’; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

ग्रामपंचायत निवडणुकांवर लक्ष केंद्रित करून पक्षबांधणी मजबूत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. 8 ऑगस्टपर्यंत एसआयआर नोंदणी मोहीम प्रभावीपणे पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 02, 2026 | 08:37 AM
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

Follow Us
Follow Us:

मुंबई : शिवसेना पक्ष व ‘धनुष्यबाण’ चिन्हासंदर्भातील न्यायालयातील प्रलंबित वादावर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठा दावा केला. सर्वोच्च न्यायालय मूळ शिवसेना आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह आपल्यालाच देईल, असा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. तसे न झाल्यास हे चिन्ह विरोधकांनाही वापरता येणार नाही आणि ते गोठवले जाईल, असेही ते म्हणाले.

शिवसेना भवनात जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठाकरे बोलत होते. ग्रामपंचायत निवडणुकांवर लक्ष केंद्रित करून पक्षबांधणी मजबूत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. 8 ऑगस्टपर्यंत एसआयआर नोंदणी मोहीम प्रभावीपणे पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. आगामी निवडणुकांचे ‘मिशन 2029’ लक्षात ठेवून आतापासूनच कामाला लागा, काम करणाऱ्यांनाच पक्षात स्थान असेल, अन्यथा पद सोडा, असा रोखठोक इशाराच उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हाप्रमुख व संपर्कप्रमुखांना दिला. पक्ष संघटना मजबूतीसह आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ठाकरे यांचा हा स्पष्ट संदेश मानला जात आहे.

Uddhav Thackeray हाजीर हो ! 5 ऑगस्टला कल्याण कोर्टात हजर राहण्याचे समन्स,नेमकं प्रकरण काय?

आगामी ग्रामपंचायत व स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीवर बैठकीत भर देण्यात आला. तर नीट पेपरफुटी प्रकरणावरून ठाकरे यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांची सरकारने माफी मागावी, तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईबद्दलही दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी त्यांनी केली.

कपिल सिब्बल यांनी मांडली बाजू

सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेचे नाव व अधिकृत निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या खटल्यावर सुनावणी पार पडली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांनी न्यायालयात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. ठाकरे गटाच्या वतीने बाजू मांडताना कपिल सिब्बल म्हणाले, जर बंडाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच या प्रकरणाची सुनावणी त्वरित आणि निष्पक्षपणे झाली असती, तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नसते. त्यामुळे या संपूर्ण वादावर कोणताही विलंब न लावता अंतिम निर्णय द्यावा,” अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.

निवडणूक आयोग आणि अध्यक्षांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह

कपिल सिब्बल यांनी भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) भूमिकेवरही टीका केली. ते म्हणाले की, निवडणूक आयोगाने २०१८ मध्ये दुरुस्त केलेल्या शिवसेनेच्या घटनेतील तरतुदींकडे दुर्लक्ष केले आणि केवळ आमदार व खासदारांच्या संख्याबळावर अवलंबून राहिले. याच्या आधारावर शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह देण्यात आले, जे प्रशासकीय आणि कायदेशीरदृष्ट्या सदोष होते.

Web Title: Uddhav thackeray major statement regarding the shiv sena party and the bow and arrow symbol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 08:37 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Shivsena Politics
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल
1

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार
2

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
3

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

‘…पण महाराष्ट्र सरकार शुभ तारखा तपासण्यात व्यस्त’; दुष्काळ जाहीर करण्यावरून उद्धव ठाकरेंचा टोला
4

‘…पण महाराष्ट्र सरकार शुभ तारखा तपासण्यात व्यस्त’; दुष्काळ जाहीर करण्यावरून उद्धव ठाकरेंचा टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.