Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल

KDMC Politics: भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार वरुण सरदेसाई यांनी केली आहे. कल्याण दौऱ्यादरम्यान त्यांनी या प्रकरणासह केडीएमसीमधील राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 20, 2026 | 03:26 PM
बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल

बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल

Follow Us
Follow Us:
  • भाजपचे आहेत म्हणून संरक्षण नको,
  • नरेंद्र पवारांना तात्काळ अटक करा
  • वरुण सरदेसाईंची मागणी
KDMC Politics: भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या अटकेची मागणी जोर धरू लागली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी या प्रकरणावरून भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर टीका करत, “बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या माजी आमदार नरेंद्र पवार यांना अटक कधी होणार?” असा सवाल उपस्थित केला आहे.

पडघा पोलिसांनी नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांच्याविरोधात २२ वर्षीय विवाहित महिलेच्या तक्रारीवरून सामूहिक बलात्कारासह विविध आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

KDMC Mayor: कल्याण-डोंबिवलीत सत्तावाटप निश्चित! महापौरपद शिंदे सेनेकडे, तर उपमहापौरपद भाजपला; मनसेचा मोठा पाठिंबा

‘भाजपचे आहेत म्हणून संरक्षण देऊ नका’

कल्याणमध्ये पक्षाच्या आढावा बैठकीसाठी आलेल्या वरुण सरदेसाई यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. विरोधी पक्षातील एखाद्या नेत्यावर छोटासा गुन्हा दाखल झाला तरी सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आक्रमक होतात आणि त्यानंतर मीडिया ट्रायल सुरू होते. मात्र, गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही संबंधित व्यक्ती भाजपशी संबंधित असल्यामुळे त्यांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला. नरेंद्र पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असल्याने त्यांना कोणतेही राजकीय संरक्षण न देता तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी सरदेसाई यांनी केली.

नेमके प्रकरण काय?

पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, पीडित महिलेचा तिच्या पतीसोबत कौटुंबिक वाद सुरू होता. या वादात मध्यस्थी करून मदत करण्याच्या बहाण्याने तिला बोलावण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिला भिवंडी तालुक्यातील बापगाव परिसरातील एका फार्महाऊसवर नेण्यात आले. तेथे शस्त्राचा धाक दाखवून मद्य पाजण्यात आले आणि लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप महिलेने केला आहे. या आरोपांच्या आधारे पडघा पोलिसांनी नरेंद्र पवार आणि शैलेश पाटील यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

नरेंद्र पवारांनी आरोप फेटाळले

दरम्यान, नरेंद्र पवार यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. आपल्याविरोधातील आरोप खोटे असून बदनामी करण्यासाठी षडयंत्र रचण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी भाजपमधील सर्व पदांचा राजीनामा दिला. या प्रकरणामुळे पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होऊ नये म्हणून आपण पदे सोडत असल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटलं आहे.

पीडितेला संरक्षण देण्याचीही मागणी

या प्रकरणात पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली आहे. केडीएमसीतील काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी आरोपींना अटक करण्याची मागणी केली असून, अटक न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

केडीएमसीच्या राजकारणावरही सरदेसाईंचे भाष्य

दरम्यान, वरुण सरदेसाई यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेतील राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. केडीएमसीमध्ये अद्याप विरोधी पक्षनेत्याची निवड झालेली नसल्याचे तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांच्या नियुक्त्यांबाबत ठोस निर्णय झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादावरूनही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. दोन्ही पक्षांमधील वाद सुरूच राहणार असेल, तर नागरिकांची कामे कधी होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गटाची आढावा बैठक

पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी वरुण सरदेसाई कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर आले होते. कल्याण पश्चिमेतील मंगेशी हॉलमध्ये आयोजित बैठकीला सरदेसाई यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे केडीएमसी गटनेते उमेश बोरगावकर, पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना सरदेसाई यांनी नरेंद्र पवार प्रकरणासह केडीएमसीतील राजकीय घडामोडींवर भाष्य केले. नरेंद्र पवार प्रकरणाचा तपास सुरू असून, त्यांच्यावरील आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत.

Raj Thackeray on KDMC: कल्याण-डोंबिवलीच्या स्थितीवरून राज ठाकरेंचा संताप; “बाळासाहेब आज असते तर…”

Web Title: Varun sardesai demands arrest of former mla narendra pawar in alleged gang rape case kalyan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • BJP
  • KDMC
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक
1

KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक

Devendra Fadnavis : ‘कासव माझी प्रेरणा, पण चाल कासवाची नाही’; समृद्धी महामार्गावरुन फडणवीसांचा विरोधकांना टोला
2

Devendra Fadnavis : ‘कासव माझी प्रेरणा, पण चाल कासवाची नाही’; समृद्धी महामार्गावरुन फडणवीसांचा विरोधकांना टोला

PDCC Bank Election : पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीत ठरावांचा धुरळा; राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचीही जोरदार फिल्डिंग
3

PDCC Bank Election : पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीत ठरावांचा धुरळा; राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचीही जोरदार फिल्डिंग

‘दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार द्या, नाहीतर मंत्र्यांना फिरू देणार नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारला इशारा
4

‘दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार द्या, नाहीतर मंत्र्यांना फिरू देणार नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.