Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘राम मंदिर तुमच्या बापाची जहागीर नाही’; नागपुरातील रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ नागपुरात झालेल्या रामरक्षा आंदोलनात उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. राम मंदिरावरील कथित गैरव्यवहाराची निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी करण्याची मागणी केली.

  • By विवेक
Updated On: Jul 18, 2026 | 06:35 PM
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

Follow Us
Follow Us:
  • “राम मंदिर तुमच्या बापाची जहागीर नाही,” म्हणत उद्धव ठाकरेंचा घणाघात
  • राम मंदिरातील कथित चोरीची निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी करण्याची मागणी
  • सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या समर्थनार्थ आंदोलन करणार असल्याची घोषणा
 

अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात रामरक्षा पठण आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका करत राम मंदिरातील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.

ठाकरे म्हणाले की, राम मंदिर कोणाच्या मालकीचे नसून ते संपूर्ण देशातील रामभक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. कथित चोरीप्रकरणी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच रामभक्तांच्या श्रद्धेचा अपमान झाल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

‘जनाब’ ते ‘बारा बुद्धीचे साहेब’; गोपीचंद पडळकरांचे संजय राऊतांना जहरी खुले पत्र, सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

पेपरफुटी, हिंदुत्व आणि महाविकास आघाडीवर भाष्य

भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी नीट आणि इतर पेपरफुटीच्या घटनांचा उल्लेख करत तरुणांना न्याय मिळणे हेच खरे हिंदुत्व असल्याचे म्हटले. तसेच बाबरी मशिद प्रकरण, महाविकास आघाडीची स्थापना आणि भाजपसोबतचे संबंध यावरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

मोहन भागवत रामभक्तांच्या बाजूने आहेत की मंदिर चोरांच्या ?

नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्याचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले की, “भागवत साहेबांना विचारायचं आहे की, मंदिर लुटलं जात आहे, पेपर फुटत आहेत, पक्ष फोडले जात आहेत आणि आता मंदिरातील तिजोऱ्याही फोडल्या जात आहेत. हेच हिंदू राष्ट्र तुम्हाला अपेक्षित होतं काय?” यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, त्यांची हिंदू राष्ट्राची कल्पना ही न्याय, समानता आणि रामराज्याच्या तत्त्वांवर आधारित आहे. “आमच्या हिंदू राष्ट्रात गोरगरीबांना, विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे. कंत्राटदारांना संरक्षण देणारी व्यवस्था हे आमचं हिंदू राष्ट्र असू शकत नाही,” असे ते म्हणाले.

मोहन भागवत यांनी हिंदू समाजाने दोन ते तीन अपत्य जन्माला घालावीत, असे केलेल्या वक्तव्याचाही उद्धव ठाकरे यांनी उल्लेख केला. त्यावर ते म्हणाले, “मुलं जन्माला घालायला सांगता, पण त्यांच्यासाठी सुरक्षित शिक्षण व्यवस्था देणार कोण? पेपरफुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त झाले, काहींनी आत्महत्याही केल्या. अशा परिस्थितीत आणखी मुलं जन्माला घालून त्यांनाही याच व्यवस्थेत चिरडायचं का?”

सोनम वांगचुक प्रकरणावर सुषमा अंधारे आक्रमक; ‘सरकार पुरस्कृत गुंड’ म्हणत भाजप आणि पोलिसांवर निशाणा

सोनम वांगचुक आंदोलनालाही पाठिंबा

उद्धव ठाकरे यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत त्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्याची घोषणा केली. सर्व विरोधी पक्षांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. हे स्पष्ट करावे, अशी मागणी करत त्यांनी आगामी काळात देशभर हा मुद्दा घेऊन जाण्याचा निर्धार व्यक्त केला.

Web Title: Uddhav thackeray nagpur ramraksha andolan bjp attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • Ayodhya ram mandir
  • BJP
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Drought Hit Farmers Diwali 2026:  शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
1

Drought Hit Farmers Diwali 2026: शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Ambadas Danve : ‘भाजपने दिलं तेच घ्यावं लागतं’; अंबादास दानवेंचा शिंदेसेना-राष्ट्रवादीला जोरदार टोला
2

Ambadas Danve : ‘भाजपने दिलं तेच घ्यावं लागतं’; अंबादास दानवेंचा शिंदेसेना-राष्ट्रवादीला जोरदार टोला

दुष्काळात शेतकरी हवालदिल, भाजप नेत्यांची १०० कोटींची उधळपट्टी? काँग्रेस आक्रमक; शेलार-चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी
3

दुष्काळात शेतकरी हवालदिल, भाजप नेत्यांची १०० कोटींची उधळपट्टी? काँग्रेस आक्रमक; शेलार-चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी

भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केले दाखल
4

भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केले दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.