Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जनाब’ ते ‘बारा बुद्धीचे साहेब’; गोपीचंद पडळकरांचे संजय राऊतांना जहरी खुले पत्र, सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

रामरक्षा आंदोलनावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर उपरोधिक आणि जहरी शब्दांत टीका करणारे खुले पत्र प्रसिद्ध केले आहे. पत्रात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वासह विरोधी पक्षांवरही निशाणा साधला असून, हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 18, 2026 | 05:13 PM
'जनाब' ते 'बारा बुद्धीचे साहेब'; गोपीचंद पडळकरांचे संजय राऊतांना जहरी खुले पत्र, सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

'जनाब' ते 'बारा बुद्धीचे साहेब'; गोपीचंद पडळकरांचे संजय राऊतांना जहरी खुले पत्र, सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

Follow Us
Follow Us:

पंढरपूर/शिवाजी हळणवर : भाजपचे फायर ब्रँड नेते,आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांना उद्देशून एक आक्रमक खुले पत्र लिहिले असून, त्यातील उपरोधिक, जहरी आणि राजकीय टीकेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

प्रिय जनाब संजय राऊत, जय श्रीराम! जय महाराष्ट्र! अशा शब्दांत पत्राची सुरुवात करत पडळकर यांनी संजय राऊत यांच्या ‘रामरक्षा आंदोलनावर’ जोरदार हल्लाबोल केला आहे. राऊत हे नेहमीच आक्रमक भूमिका घेत असल्याचा आरोप करत त्यांनी त्यांच्या वक्तव्यशैलीवरही उपरोधिक टीका केली आहे.

‘भरत गोगावले पालकमंत्री झाले तरी..,’, रायगडच्या पालकमंत्रीपदावर आदिती तटकरेंचं मोठं विधान

पत्रात पडळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सध्याच्या राजकीय स्थितीवर टीका केली आहे. तसेच, शरद पवार यांचे नाव न घेता “बारा बुद्धीचे साहेब” असा उल्लेख करत त्यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

प्रिय जनाब संजय राऊत जय श्रीराम जय महाराष्ट्र!

तुमच्या रामरक्षा आंदोलनाच्या माध्यमात बातम्या पहिल्या, आपण नेहमीसारखे रडके आणि चिडके वाटलात. जनम तुमच्यासमोर माइक चा दांडू आणि कोरा कागद द्यावयाचा अवकाश, तुम्ही ना रहे तकबीर, अशी भुवई उडवत आरोळी देता, आणि लेखणीचा दांडपट्टा आणि तोंडाचा तोंडपट्टा चालू करता… का अवघा महाराष्ट्र कौतुक आणि बघत असतो. पण हे बघा फारसे नवीन राहिले नसल्याने महाराष्ट्र फार गांभीर्याने घेत नाही. तुमच्या या चिडक्या जहरीवाणीमुळे आपण मिया उद्धव यांच्या शिल्लक राहिलेल्या पक्षाला ज्या उंचीवर नेऊन ठेवले आहे त्याबद्दल तुमचे जाहीर अभिनंदन मनसे मुबारकबात..!

तुमच्या या कामगिरीमुळे आज उरली सुरली उद्धवसेना अगदी बदहाल अवस्थेत पोचली आहे. अशा या आनंदी समयी तुम्हाला प्रभू श्रीरामाची आठवण व्हावी हाच मोठा अजूबा आहे. हाय कमांडची भाटगिरी आणि चापलुसी करण्यात तुम्ही तुमची लेखणी आणि जीभ पार झिजवून टाकलीत. बाळासाहेबांचे कडवट हिंदुत्व तुम्ही हिरव्या चादरीत गुंडाळून तुम्ही मातोश्रीच्या कोपऱ्यात गुंडाळून ठेवून दिले.आणि ‘बारा बुद्धी’चे भलतेच साहेब धरून उध्दवबाबुंचा पार ‘राम नाम सत’ करून टाकलात.आमच्याकडे एक म्हण आहे. ‘आंब्याच्या झाडाला पाणी अन् कुञ्याच्या खांबाला माळ’ स्वतःचे घर जळताना पाहून स्वतःचे घर जळताना पाहून विजवायचे करायचे सोडून दुसऱ्याच्या अंगणात तमाशा करायला निघालात. ही बेगण्या अब्दुल्लाची नाचकाम सवई बरी नाही.

तुम्ही औरंग्याला ‘अबू’ आणि टिपूला ‘चाचा’ मानलेच आहे. तर मग हा आंदोलनाचा राजकीय मोहरम कशासाठी साजरा करत आहात.? हाच सवाल आज सकल हिंदू समाजाला पडला आहे. खरंतर ज्याच्या मांडीवर बसून शिरखुरमा आणि बिर्याणी ओरपत आहात. ते पाहता तुमची पुढची मंजिल फौतशुदा मुजरीम याकुब मेमनच्या कबरीवर रेशमी चादर चढवण्याचीच असेल. यात तीळ मात्र शंका नाही!

प्रभू श्रीरामाच्या पुण्यभूमीत पाप करणाऱ्यांला कठोर शासन होणारच.हि खऱ्या कडवट हिंदूची खाञी आहे.त्यासाठी आमचे हिंदुत्ववादी सरकार कटिबद्ध आहे.तुमच्या सारख्या खानमार्टेक गॅग च्या रिचार्जवर चालणाऱ्या पोकळ आंदोलनाचे ढोंग आणि अय्याशपणा जनतेने केव्हाच ओळखला आहे.

ज्या उद्धव बाबूंनी घरात बसून वर्क फ्रॉम होम करत महाराष्ट्रातील वारीची महान परंपरा बंद पाडण्याचे पाप केले होते. त्या वारीचे प्रस्थान आता मोठ्या दिमाखात झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात भक्ती आणि शक्तीचा संगम सुरू आहे. पण नेमक्या या पवित्र वेळेला तुमच्या सुपिक डोक्यातून हा ‘आंदोलनाचा सुलेमानी किडा ‘ वारी परंपरेला गालबोट लावण्यासाठीच वळवळा असणार यात काही शंका नाही!

‘घरचे झाले थोडे अन् व्याहानी धाडले घोडे’अशी तुमची आणि तुमच्या पक्षप्रमुखांची अवस्था झाली आहे.आदी उरलेला स्वतःचा गट सांभाळा, आंदोलनाचं फारच उधाण आलं असेल तर थेट पुढच्या रमजानची वाट पहा !…जनाब

कळावे

आ.गोपिचंद पडळकर

या पञामध्ये, हिंदुत्व, औरंगजेब, टिपू सुलतान, रामभक्ती, पंढरपूर वारी, महाविकास आघाडीच्या काळातील निर्णय आणि सध्याच्या आंदोलनावरूनही पडळकर यांनी राऊत यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली आहे. आंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप करत त्यांनी विविध उपमा आणि बोचऱ्या शब्दांत आपली भूमिका मांडली आहे.

सोनम वांगचुक प्रकरणावर सुषमा अंधारे आक्रमक; ‘सरकार पुरस्कृत गुंड’ म्हणत भाजप आणि पोलिसांवर निशाणा

पत्राच्या शेवटी पडळकर यांनी संजय राऊत यांना आधी स्वतःचा पक्ष सावरण्याचा सल्ला देत, आंदोलन करायचे असेल तर “पुढच्या रमजानची वाट पाहा” असा उपरोधिक टोला लगावला आहे.

दरम्यान, हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, समर्थक आणि विरोधकांकडून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पत्रातील आक्रमक भाषा आणि राजकीय आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Web Title: Gopichand padalkar open letter to sanjay raut ramraksha andolan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 05:13 PM

Topics:  

  • gopichand padalkar
  • sanjay raut
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

‘मतपेढी सुधारण्यासाठी प्रभू श्रीरामाचा आधार’; चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंच्या ‘रामरक्षा’ पठणाला म्हटले ‘ढोंगीपणा’
1

‘मतपेढी सुधारण्यासाठी प्रभू श्रीरामाचा आधार’; चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंच्या ‘रामरक्षा’ पठणाला म्हटले ‘ढोंगीपणा’

जयंत पाटील-एकनाथ शिंदे भेटीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; ‘रामदास आठवलेंना भेटले तर…’
2

जयंत पाटील-एकनाथ शिंदे भेटीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; ‘रामदास आठवलेंना भेटले तर…’

राम मंदिर प्रकरणात गोविंद गिरींचीही चौकशी व्हावी; संजय राऊत यांची मागणी
3

राम मंदिर प्रकरणात गोविंद गिरींचीही चौकशी व्हावी; संजय राऊत यांची मागणी

Maharashtra Politics : ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांच्या अडचणींत होणार वाढ; शिवसेनेने थेट खासदारांना…
4

Maharashtra Politics : ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांच्या अडचणींत होणार वाढ; शिवसेनेने थेट खासदारांना…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.