Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अजितदादांनंतर जयंत पाटीलच अर्थखातं सांभाळू शकतात, पण..,’ सुषमा अंधारेंचं मोठं विधान; तटकरे, प्रफुल्ल पटेलांवर सडकून टीका

जयंत पाटील यांच्याकडे अर्थखातं जाण्याच्या चर्चांदरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांनंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटील यांच्यात असल्याचं त्यांनी म्हटलं असून राष्ट्रवादीतील घडामोडींवरही भाष्य केलं.

  • By विवेक
Updated On: Jul 17, 2026 | 07:22 PM
Sushma Andhare

Sushma Andhare

Follow Us
Follow Us:
  • ‘अजित पवारांनंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटील यांच्यात,’ सुषमा अंधारे यांचे वक्तव्य
  • सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भूमिकेवर अंधारेंची टीका
  • राष्ट्रवादीच्या एनडीए प्रवेशाच्या चर्चांदरम्यान राजकीय हालचालींना वेग
 

राज्यात अर्थखात्याबाबतच्या चर्चांना वेग आला असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. जयंत पाटील यांना अर्थखात्याची जबाबदारी मिळण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी त्यांच्या प्रशासकीय क्षमतेचे कौतुक केले.

‘जयंत पाटील अर्थखातं सांभाळण्यास सक्षम’

प्रसारमाध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, “पक्ष कोणताही असो, अजित पवारांनी अर्थखातं अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळलं. त्यांच्या नंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटील यांच्यात आहे. मात्र, जयंत पाटील आमच्यासोबत आहेत.”

‘केवळ सत्तेच्या एखाद्या तुकड्यासाठी..,’ राष्ट्रवादीच्या एनडीए प्रवेशाच्या चर्चांवर अंबादास दानवे यांचे परखड मत

जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याबाबत त्या म्हणाल्या की, “ते भाजपच्या नेत्याला नव्हे, तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते. त्या भेटीचं कारण त्यांनी स्वतः स्पष्ट केलं आहे.”

सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका

सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरही निशाणा साधला. त्यांनी तटकरे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत, त्यांच्या विविध वक्तव्यांमध्ये विसंगती असल्याचा आरोप केला. तसेच, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाबाबतही भाष्य करत, त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न झाला पण तो यशस्वी ठरला नसल्याचा दावा त्यांनी केला.

एनडीए प्रवेशाच्या चर्चांवर काय म्हणाल्या?

राज्यात सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चांवर अंधारे यांनी थेट भाष्य केले नसले तरी, जयंत पाटील यांच्या भूमिकेवर विश्वास व्यक्त केला. दरम्यान, काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या भाजप नेत्यांसोबतच्या भेटींमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Supriya Sule: ‘दादांना जे हवं होतं ते झालं नाही..’, अजित पवार यांची आठवण काढून सुप्रिया सुळे भावुक, म्हणाल्या…

जयंत पाटलांना अर्थखाते मिळणार?

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. याला काही काही तास उलटत नाहीत तोच ते आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. विशेषतः, संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलात जयंत पाटील यांना महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते, याची चर्चा सुरू आहे. पण जयंत पाटील यांना अर्थमंत्रीपद मिळणार असल्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा पुष्टी करण्यात आलेली नाही. सध्या या संदर्भात फक्त राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कच काढले जात आहे.

Web Title: Sushma andhare on jayant patil finance minister nda speculation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 07:22 PM

Topics:  

  • jayant patil
  • NCP Sharad Pawar
  • Shivsena UBT
  • sushma andhare

संबंधित बातम्या

Operation Tiger : ‘एजंटचा फोन आला तर रेकॉर्ड करा,’ ऑपरेशन टायगरच्या चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे अलर्ट
1

Operation Tiger : ‘एजंटचा फोन आला तर रेकॉर्ड करा,’ ऑपरेशन टायगरच्या चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे अलर्ट

Maharashtra Politics: ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का? १४ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचा बड्या नेत्याचा दावा
2

Maharashtra Politics: ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का? १४ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचा बड्या नेत्याचा दावा

Eknath Khadse: ‘नाथाभाऊंनी पक्ष उभा केला’ शरद पवारांकडून एकनाथ खडसेंचं कौतुक; भाजपला दाखवला आरसा
3

Eknath Khadse: ‘नाथाभाऊंनी पक्ष उभा केला’ शरद पवारांकडून एकनाथ खडसेंचं कौतुक; भाजपला दाखवला आरसा

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 10 प्रवक्त्यांची नवी टीम जाहीर; जितेंद्र आव्हाडांसह ‘या’ नेत्यांवर मोठी जबाबदारी
4

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 10 प्रवक्त्यांची नवी टीम जाहीर; जितेंद्र आव्हाडांसह ‘या’ नेत्यांवर मोठी जबाबदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.