Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation Tiger : उज्ज्वल निकम यांचे मोठे भाष्य; ठाकरे गटातील 6 खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार?

Operation Tiger : ठाकरे गटातील सहा खासदारांनी स्वतंत्र गटाची मागणी केल्यानंतर कायदेतज्ञ तथा खासदार उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयावरच या प्रकरणाचे राजकीय आणि कायदेशीर भवितव्य ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • By विवेक
Updated On: Jun 18, 2026 | 03:59 PM
Operation Tiger : उज्ज्वल निकम यांचे मोठे भाष्य; ठाकरे गटातील 6 खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार?

Operation Tiger : उज्ज्वल निकम यांचे मोठे भाष्य; ठाकरे गटातील 6 खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार?

Follow Us
Follow Us:
  • शिवसेना ठाकरे गटाने बोलावलेल्या संसदीय दलाच्या बैठकीत सहा फुटीर खासदारांनी दांडी
  • कायदेतज्ञ आणि खासदार उज्ज्वल निकम यांची याबाबत महत्वपूर्ण प्रतिक्रिया
  • लोकसभा अध्यक्ष नेमका काय निर्णय घेतात यावरच पुढील राजकीय, कायदेशीर घडामोडी अवलंबून – उज्ज्वल निकम
Operation Tiger: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत. ऑपरेशन टायगरमधील (Operation Tiger) चर्चेत असणारे 6 खासदार गैरहजर राहिल्याने एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे.  या पक्षफुटीनंतर राज्यभरात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ठाकरे गटाने बोलावलेल्या संसदीय दलाच्या बैठकीत या सहा खासदारांनी दांडी मारल्यानंतर ठाकरे गटाचे हे सहा खासदार फुटल्याचा स्पष्ट झालं आहे. हे खासदार फुटल्याने आज त्यांना कायदेशीर नोटीस बजावली जाणार आहे. अश्यातच कायदेतज्ञ आणि खासदार उज्ज्वल निकम यांनी याबाबत महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले उज्ज्वल निकम ?

कल्याणमध्ये कायदेतज्ञ आणि खासदार उज्ज्वल निकम यांनी ठाकरे गटातील सहा खासदारांच्या ‘मिशन टायगर’वर महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गटाची मागणी केली असली, तरी त्यांनी मूळ पक्ष सोडल्याचे कुठेही जाहीर केलेले नाही, असे निकम यांनी स्पष्ट केले.

मात्र या सहा खासदारांवर कोणाचा व्हिप लागू होणार, त्यांना स्वतंत्र गटाचा नेता मान्यता मिळणार का आणि लोकसभा अध्यक्षांनी नेमका काय निर्णय घेतला आहे, यावरच पुढील राजकीय आणि कायदेशीर घडामोडी अवलंबून असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे ठाकरे गटातील या घडामोडींची लढाई आता राजकारणापेक्षा अधिक कायद्याच्या चौकटीत लढली जाणार असल्याचे संकेत निकम यांनी दिले आहेत.

Satara Politics: ठाकरे गटाला साताऱ्यात खिंडार? २० ते २५ नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर; शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा

सहा खासदारांच्या विलीनीकरणाची शनिवारी होणार घोषणा

फुटीर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना सह्यांचे पत्र दिले असून त्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची भीती त्यात व्यक्त केली आहे. हे पात्र 48 तासांपूर्वी दिले गेले असले तरीही शिवसेनेच्या वर्धापनदिनी म्हणजेच 20 जून रोजी याची घोषणा शिवसेनेकडून करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्याच दिवशी बुलेटिन जारी करण्यात येणार असून त्यामध्ये या खासदारांचे शिवसेनेत विलीनीकरण होत असल्याचं जाहीर कारणात येण्याची शक्यता आहे.

Shivsena Opration Tiger : 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? ‘…म्हणून शिवसेना सोडली’, समोर आलं धक्कादायक कारण

संजय राऊत आक्रमक

यावेळी संजय राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला. फुटीर खासदारांवर टीका करत ते म्हणाले, “लोकांनी मतदान भाजपच्या विरोधात केलं. एकनाथ शिंदेच्या विरोधात केलं, लोकांनी मशाल चिन्हाला मतदान केलं. हे सर्व लोक एकनाथ शिंदेंच्या पक्षविरोधात जिंकून आले आहेत. शिर्डीच्या खासदारने दोनवेळा गद्दारी केली. तरीही त्याला तिकीट दिल. काही लोकांना पक्षात घ्यायला माझा विरोध होता. ते पुन्हा पुन्हा बेईमानी करतील, असं मी सांगत होतो. पण, उद्धव ठाकरे दयाळू आहेत. त्यांनी या लोकांना संधी दिली. आता या लोकांना वाटतंय त्यांनी फार मोठा तिर मारलाय, पण हा तिर त्यांच्याच ***” असे म्हणत राऊतांनी आपला संताप व्यक्त केला.

Web Title: Ujjwal nikam on operation tiger shiv sena ubt six mps disqualification row

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 03:59 PM

Topics:  

  • Operation Tiger
  • Ujjwal Nikam

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.