Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: वडगाव मावळमध्ये अनोखा अंदाज; एकूण 15 जागांवर ‘मविआ’ म्हणून ‘हे’ पक्ष लढणार

जागावाटपाची प्रक्रिया सुमारे ८० टक्के पूर्ण झाली असून उर्वरित जागांवर लवकरच सहमती होईल. निवडणुका संबंधित पक्षांच्या अधिकृत चिन्हांवरच लढवण्यात येणार असून, आघाडीतील सर्व घटक पक्ष परस्पर समन्वयाने प्रचार करणार आहेत. 

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 19, 2026 | 09:29 PM
Maharashtra Politics: वडगाव मावळमध्ये अनोखा अंदाज; एकूण 15 जागांवर 'मविआ' म्हणून 'हे' पक्ष लढणार

Maharashtra Politics: वडगाव मावळमध्ये अनोखा अंदाज; एकूण 15 जागांवर 'मविआ' म्हणून 'हे' पक्ष लढणार

Follow Us
Close
Follow Us:

वडगाव मावळमध्ये एकत्र आले 5 पक्ष
जिल्हा परिषद, पंचायत समितीसाथी मोर्चेबांधणी
15 जागांवर होणार आघाडी

वडगाव मावळ: मावळ तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे आणि वंचित बहुजन आघाडी या पाच पक्षांनी तालुक्यातील एकूण १५ जागांवर आघाडी म्हणून निवडणूक लढवण्यावर एकमत केले आहे.

यासंदर्भात वडगाव मावळ येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे तालुकाध्यक्ष अशोक कुटे, गटनेते भारत ठाकूर, मनसेचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, शिवसेना (उबाठा)चे तालुकाप्रमुख उमेश गावडे तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष लोखंडे उपस्थित होते.

नेत्यांनी सांगितले की, शाहू–फुले–आंबेडकरांच्या विचारधारेवर आधारित राजकारण करत लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी ही आघाडी स्थापन करण्यात आली आहे. अलीकडे झालेल्या नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये तालुक्यात आघाडीला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेता, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाही एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय पक्का करण्यात आला आहे.

Maharashtra Politics: जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांची फिल्डिंग; राजकीय हालचालींना वेग

जागावाटपाची प्रक्रिया सुमारे ८० टक्के पूर्ण

जागावाटपाची प्रक्रिया सुमारे ८० टक्के पूर्ण झाली असून उर्वरित जागांवर लवकरच सहमती होईल. निवडणुका संबंधित पक्षांच्या अधिकृत चिन्हांवरच लढवण्यात येणार असून, आघाडीतील सर्व घटक पक्ष परस्पर समन्वयाने प्रचार करणार आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्यास तालुक्यात लोकशाही अधिक मजबूत होईल आणि विकासाभिमुख पर्याय मतदारांसमोर ठेवता येईल, असा विश्वास यावेळी नेत्यांनी व्यक्त केला.

Sangali Municipal Election 2026: ‘जय-वीरू’ची जादू! विशाल पाटील आणि विश्वजीत कदमांच्या एकजुटीने भाजपचा वारू रोखला

निवडणुकीसाठी इच्छुकांची फिल्डिंग

मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेचे पाच गट आणि पंचायत समिती मावळचे दहा गण अशा एकूण पंधरा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवार (दि. १६) पासून सुरू झाली आहे. मात्र, पहिल्या दिवसानंतर दुसऱ्या दिवशीही एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी विक्रम देशमुख यांनी दिली. उमेदवारी अर्ज अद्याप दाखल झाले नसले तरी अर्ज विक्रीला मात्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी ७४ तर दुसऱ्या दिवशी ४१ असे एकूण ११६ उमेदवारी अर्जांची विक्री झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Vadgav maval ncp ubt mns and vba election under mva zp and panchayat samiti election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 09:29 PM

Topics:  

  • MVA
  • Panchayat Samiti Elections
  • Wadgaon Maval
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

Chiplun News: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीसाठी काँग्रेसची भूमिका गुलदस्त्यात; तर राष्ट्रवादी…
1

Chiplun News: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीसाठी काँग्रेसची भूमिका गुलदस्त्यात; तर राष्ट्रवादी…

ZP Election 2026 : निवडणुकीचा रणसंग्राम; रत्नागिरीत निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर
2

ZP Election 2026 : निवडणुकीचा रणसंग्राम; रत्नागिरीत निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर

अफवांना थारा देऊ नका, संघटनात्मक ताकदीवरच…; आमदार रोहित पाटील यांचा निर्धार
3

अफवांना थारा देऊ नका, संघटनात्मक ताकदीवरच…; आमदार रोहित पाटील यांचा निर्धार

एमआयएमचा मोठा निर्णय! १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद निवडणूक लढवणार; आजपासून उमेदवारी अर्ज वाटप
4

एमआयएमचा मोठा निर्णय! १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद निवडणूक लढवणार; आजपासून उमेदवारी अर्ज वाटप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.