आघाडी आणि विधानसभेला भाजपा विरोधी मताची काठावरील बेरीज है काँग्रेस, राष्ट्रवादीचे बळ वाढवणारे गणित
केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असतना महापालिका निवडणूक जाहीर होईपर्यंत काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला चांगले उमेदवार हाती लागतील का?, अशी चर्चा होती. या दोन्ही पक्षांनी नगरपालिका निवडणुकीत समन्वयाने काम करत एकीचा नव्या पॅटर्नची ‘लिटमस टेस्ट’ घेलली, ती यशस्वी झाल्यानंतर तोच प्रयोग महापालिकेत केला. आ. जयंत पाटील, आ. विश्वजित कदम आणि ख. विशाल पाटील यांच्या एकजुटीने भाजपाविरोधात लढायचे बळ उभे केले. आघाडीला २१ जागा मिळाल्या, शिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत अघोषित तडजोड केली, त्यामुळे मतविभागणी टाळण्यात आलेले यश वामुळे भाजपचा चौफेर उधळलेला वारू सतेच्या उंबरठ्यावर रोखता आला.
Mayor reservation draw date : महापौर पदासाठी आरक्षण सोडत ‘या’ दिवशी होणार जाहीर; तारीख आली समोर
सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, मात्र देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर सन २०१८ मध्ये पहिल्यांदा भाजाचा झेंडा फडकला, मात्र यावेळी पहिल्यांदा कॉग्रेसला अवघड परिस्थिती होती, कारण काँगेसच्या ज्येष्ठ नेत्या जयश्री पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता, तर सांगली विधानसभा लढलेले काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला होता, माजी महापौर किशोर जामदार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मनोज सरगर सारखे तगडे नगरसेवकांनी देखील भाजपात प्रवेश केला. यामुळे कॉंगेसने निवडणूक लढायची कशी असा प्रश्न होता, मात्र तरही विशाल पाटील, विश्वजीत कदम यांनी जयंत पाटील यांच्या सोचतीने व्यूदरचना आखल्या, राष्ट्रवादी अजितपवार पक्षासोबत देखील समजोता केला. त्यांनी महापलिका क्षेत्रात तळ ठोकून तगडी लढत दिली.
लोकसभेला अपक्ष उभे राहिलेल्या विशाल पाटील यांना मिळालेली दणदणीत आघाडी आणि विधानसभेला भाजपा विरोधी मताची काठावरील बेरीज है काँग्रेस, राष्ट्रवादीचे बळ वाढवणारे गणित होते. फक्त विभागणी टाळण्याचे आव्हान होते. ते आधी जयंतरावांशी जुळवून घेत जमवले होते, त्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने हात पुढे केला आणि सर्वच नेत्यांनी दोन पावले मागे घेतली. तसेच ‘चाट लावली सांगलीची, गाठ आहे महाआघाडीशी’ हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून आघाडीने प्रचाराचे रान तापवले.
एमआयएमचा मोठा निर्णय! १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद निवडणूक लढवणार; आजपासून उमेदवारी अर्ज वाटप
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने २० जागांवर लढत्त दिली. त्यांनस तीन जागांवर यश मिळाले. यशाचा टक्का कमी असला तरी आघाडीच्या रचनेतील, प्रचारातील जयंत पपाटील यांचा सहभाग विरोधकांची खरी ताकद ठरला. जयंतरावांच्या भाषणांनी वातावरण तापवलं.






