Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाकरेंना आणखी एक धक्का! कल्याणच्या बड्या महिला पदाधिकाऱ्याचा राजीनामा; नव्या राजकीय चर्चांना उधाण

ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला असून कल्याण लोकसभा महिला जिल्हा संघटक वैशाली दरेकर राणे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणांचा उल्लेख करत त्यांनी पद सोडल्याचे सांगितले असले तरी त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत चर्चा रंगल्या आहेत.

  • By विवेक
Updated On: Aug 03, 2026 | 05:30 PM
ठाकरेंना आणखी एक धक्का! कल्याणच्या बड्या महिला पदाधिकाऱ्याचा राजीनामा; नव्या राजकीय चर्चांना उधाण

ठाकरेंना आणखी एक धक्का! कल्याणच्या बड्या महिला पदाधिकाऱ्याचा राजीनामा; नव्या राजकीय चर्चांना उधाण

Follow Us
Follow Us:
  • वैशाली दरेकर राणे यांनी ठाकरे गटाच्या महिला जिल्हा संघटकपदाचा दिला राजीनामा
  • राजीनाम्यामागे वैयक्तिक कारणे असल्याचे पत्रात नमूद
  • पुढील राजकीय वाटचालीबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण
 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील संघटनात्मक घडामोडी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. कल्याण लोकसभा महिला जिल्हा संघटक वैशाली दरेकर राणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ठाकरे गटाला आणखी एक धक्का मानला जात आहे. अलीकडच्या काळात पक्षातील काही नेत्यांच्या निर्गमनानंतर आता या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

महिला पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याने मोठा धक्का

वैशाली दरेकर राणे यांनी मागील लोकसभा निवडणुकीत कल्याण मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांची लढत खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात झाली होती. निवडणुकीनंतरही त्या पक्ष संघटनेत सक्रिय होत्या. मात्र, आता त्यांनी महिला जिल्हा संघटक पदाचा स्वेच्छेने राजीनामा दिला आहे.

राजीनामा पत्रात त्यांनी स्पष्ट केले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून त्या महिला जिल्हा संघटक म्हणून कार्यरत होत्या. मात्र, सध्या वैयक्तिक जबाबदाऱ्या वाढल्यामुळे पक्षाच्या कामाला आवश्यक वेळ देता येत नसल्याने पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. पक्षाने हा राजीनामा स्वीकारावा, अशी विनंतीही त्यांनी पत्रातून केली आहे.

‘पंकजा मुंडे रिटायर झाल्या तर, हा सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल…’; मनोज जरांगे पाटील यांचा धनंजय मुंडेंवर गंभीर निशाणा

वैशाली दरेकर राणे यांनी राजीनाम्यामागे केवळ वैयक्तिक कारणांचा उल्लेख केला असला, तरी त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत विविध स्तरांवर तर्कवितर्क सुरू झाले आहेत. त्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार का किंवा काही काळ सक्रिय राजकारणापासून दूर राहणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

‘मातोश्री’वर वातावरण तापले

दरम्यान, ठाकरे गटातील अंतर्गत घडामोडीही चर्चेचा विषय ठरत आहेत. ठाणे जिल्ह्यातील पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी आणि नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत ‘मातोश्री’वर आयोजित बैठकीत दोन गटांतील पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाल्याची माहिती समोर आली. सूत्रांच्या माहितीनुसार, कल्याणमधील काही पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीच्या मुद्द्यावरून वातावरण तापले होते.

‘भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा’; पंकजा मुंडेंना काँग्रेसची थेट ऑफर, वडेट्टीवारांचे मोठे विधान

या प्रकारामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्याची चर्चा आहे. अशा पार्श्वभूमीवर वैशाली दरेकर राणे यांच्या राजीनाम्यामुळे ठाकरे गटासमोरील संघटनात्मक आव्हाने पुन्हा अधोरेखित झाली आहेत. मात्र, त्यांच्या पुढील राजकीय निर्णयाबाबत त्यांनी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नसल्याने येत्या काही दिवसांत त्यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Vaishali darekar rane resigns uddhav thackeray shiv sena kalyan news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • kalyan
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Sushma Andhare : ‘शेतकरी उपाशी मरतोय, नेते काजू-बदामावर ताव मारतायत,’ सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल
1

Sushma Andhare : ‘शेतकरी उपाशी मरतोय, नेते काजू-बदामावर ताव मारतायत,’ सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल

KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक
2

KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक

Disha Salian Case : सतीश सालियान वकिलांसह मातोश्रीवर, वरुण सरदेसाईंचा पलटवार; ‘पुरावे असतील तर द्या’
3

Disha Salian Case : सतीश सालियान वकिलांसह मातोश्रीवर, वरुण सरदेसाईंचा पलटवार; ‘पुरावे असतील तर द्या’

Disha Salian Case : ‘मातोश्री’बाहेर हायव्होल्टेज ड्रामा; आदित्य ठाकरेंना 500 कोटींची नोटीस, सतीश सालियन वकिलांसह दाखल
4

Disha Salian Case : ‘मातोश्री’बाहेर हायव्होल्टेज ड्रामा; आदित्य ठाकरेंना 500 कोटींची नोटीस, सतीश सालियन वकिलांसह दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.