Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

वाराणसी विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान माजी नगरसेवक कमलेश राय यांच्या पिस्तुलातून दोन राउंड फायरिंग झाल्याची माहिती आहे. गोळी रिकोशेट होऊन दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांना दुखापत झाली असून पोलिसांनी राय यांना ताब्यात घेतले आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 16, 2026 | 05:48 PM
वाराणसी विमानतळावर शिंदे गटाच्या नेत्याकडून फायरिंग

वाराणसी विमानतळावर शिंदे गटाच्या नेत्याकडून फायरिंग

Follow Us
Follow Us:
  • वाराणसी विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान दोन राउंड फायरिंग झाल्याची माहिती.
  • गोळी रिकोशेट होऊन दोन सुरक्षा तपासणी कर्मचारी जखमी झाले.
  • माजी नगरसेवक कमलेश राय यांना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी सुरू केली.
 

वाराणसी विमानतळावर रविवारी सकाळी शस्त्र तपासणीदरम्यान गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली. शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक कमलेश राय हे पत्नीसमवेत वाराणसीहून मुंबईला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते. यावेळी त्यांच्या परवानाधारक पिस्तुलाच्या तपासणीदरम्यान अचानक दोन राउंड फायरिंग झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राय यांच्याकडे 7.62 मिमी पिस्तुल होते. शस्त्र लॉक करण्याची प्रक्रिया सुरू असताना बंदुकीतून गोळ्या सुटल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर विमानतळ परिसरात काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

बंदूक लॉक करताना दोन राउंड फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

गोळी रिकोशेट होऊन विमानतळावरील सुरक्षा तपासणी करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना दुखापत झाल्याची माहिती आहे. रोहित राज आणि सुमन कुमारी अशी जखमी कर्मचाऱ्यांची नावे सांगण्यात येत आहेत. दोघांनाही तातडीने न्यू लक्ष्मी ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टच्या आंदोलनाचा निर्धार; ‘जीव गेला तरी चालेल, आंदोलनावर ठाम’

दरम्यान, कमलेश राय हे एअर इंडिया एक्स्प्रेसच्या IX 1810 विमानाने मुंबईला जाणार होते. शस्त्र तपासणीदरम्यान ही घटना सकाळी साडेनऊच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. त्यांच्या पिस्तुलासोबत 21 जिवंत काडतुसे असल्याचेही समोर आले आहे.

कमलेश राय पोलिसांच्या ताब्यात; चौकशी सुरू

घटनेची माहिती मिळताच विमानतळ सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने कारवाई केली. कमलेश राय यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाची BCAS अर्थात ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीच्या माध्यमातूनही चौकशी केली जात असल्याची माहिती आहे.

शस्त्र हाताळताना निर्धारित सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, तसेच फायरिंग नेमक्या कोणत्या परिस्थितीत झाले, याचा तपास केला जात आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर संबंधित नियमांनुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

‘तुम्ही दोन हात केले तर आम्हीही चार हात करू’; भाजपचा शशिकांत शिंदेंवर हल्लाबोल

या घटनेनंतर विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, परिस्थिती नियंत्रणात असून विमानतळाचे नियमित कामकाज सुरू असल्याची माहिती आहे.

Web Title: Varanasi airport kamlesh rai firing shiv sena shinde faction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 05:48 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • shivsena
  • varanasi

संबंधित बातम्या

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास
1

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
2

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?
3

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
4

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.